' माउंट एव्हरेस्ट नाही तर ‘हा’ आहे जगातील सर्वात उंच पर्वत – एक माहित नसलेलं सत्य! – InMarathi

माउंट एव्हरेस्ट नाही तर ‘हा’ आहे जगातील सर्वात उंच पर्वत – एक माहित नसलेलं सत्य!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

१९५३ मध्ये सर एडमंड हिलरी यांनी माउंट एव्हरेस्टचा माथा गाठला, जगाच्या सर्वोच्च टोकावर पोचण्याचा भीमपराक्रम त्यांनी केला. आजही कोणालाही हा प्रश्न विचारला की जगातील सर्वात उंच शिखर कोणते? किंवा जगातील सर्वात उंच जागा कोणती? तर एकमुखाने सगळ्यांच उत्तर एकच असेल- माउंट एव्हरेस्ट!  पण सत्य मात्र वेगळेच आहे. माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच शिखर नाहीच मुळी! काय? विश्वास बसत नाहीये. चला तर मग जाणून घ्या.

mount-everest-marathipizza01
everest1953.co.uk

जगातील सर्वात उंच पर्वत हा प्रत्यक्षात चिमबोराझो हा आहे. चिमबोराझो हा अँडयुझ पर्वत रांगेचा भाग असलेल्या इक्वाडोर मध्ये स्थित आहे. हा पर्वत म्हणजे एक स्ट्रॅटव्होल्कानो आहे. या पर्वताची पृथ्वीच्या केंद्रापासूनची उंची सर्वोच्च आहे, म्हणूनच उंचीच्या दृष्टीने चिमबोराझो हे पृथ्वीवरील सर्वोच्च ठिकाण ठरते.

chimborazo-marathipizza
alpineinstitute.com

एली रोसेनबर्ग यांनी द न्यूयॉर्क टाइम्समध्ये दिलेल्या माहितीमध्ये,

चिमबोराझो याच्या माथ्याची उंची समुद्रसपाटीपासून २०५०० फुट आहे, म्हणजेच ६२४८ मीटर आहे. त्याचा माथा माउंट एव्हरेस्टपेक्षा ८५२९ फूट (२६०० मीटर) छोटा आहे. पण जेव्हा हेच मोजमाप आपण पृथ्वीच्या मध्य केंद्रामधून करतो तेव्हा मात्र माउंट एव्हरेस्ट हा चिमबोराझो पेक्षा छोटा ठरतो.

विषुववृत्त हा पृथ्वीचा मध्यभाग आहे. माउंट एव्हरेस्ट हा विषुववृत्तापासून २८ अंश उत्तरेला आहे. तर चिमबोराझो हा पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या पर्वतीय रांगांमध्येच आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या तो इतर भागातील पर्वतांपेक्षा मोठा मानला जातो.

mount-everest-marathipizza04
youhiker.com

एका अहवालाच्या निष्कर्षानुसार,

माउंट एव्हरेस्ट हा पृथ्वीच्या मध्यापासून ३९६५ मैल म्हणजेच ६३८२ किलोमीटर उंच आहे. चिमबोराझो हा पृथ्वीच्या मध्यापासून ३९६७ मैल म्हणजेच ६३८४ किलोमीटर उंच. या दोघांमध्ये फक्त २ मैल म्हणजेच ३.२ किलोमीटरचा फरक आहे. या २ मैलांच्या फरकामुळे चिमबोराझो हा सर्वोच्च पर्वताचा मान पटकावतो.

mount-everest-marathipizza02
youtube.com

पण या सत्य गोष्टीला जगभरातील गिर्यारोहकांकडून मात्र एकमताने मंजुरी मिळत नाही आहे. कारण माउंट एव्हरेस्ट पेक्षा चिमबोराझो वर चढाई करणे सोपे आहे. माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत पोहोचण्यासाठी १० दिवस लागतात, तेथील हवामानात स्वत:ला तयार करण्यासाठी ६ आठवडे लागतात तर माउंट एव्हरेस्टच्या माथ्यापर्यंत जाण्यासाठी ९ दिवस लागतात. तर चिमबोराझो पर्वतावर चढाई करताना, दोन आठवडे तेथील हवामानात स्वत:ला तयार करण्यासाठी लागतात आणि चिमबोराझोच्या माथ्यावर पोचण्यासाठी केवळ दोन दिवस लागतात. याच कारणामुळे गिर्यारोहण प्रेमींच्या मनात माउंट एव्हरेस्टच जगातील सर्वात उंच पर्वत म्हणून घर करून आहे.

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे समुद्रसपाटीपासूनची उंची मोजल्यास माउंट एव्हरेस्टच जगातील सर्वात उंच पर्वत ठरतो, पण चिमबोराझो पर्वत मात्र पहिल्या १० पर्वतांमध्ये देखील येत नाही.

mount-everest-marathipizza03
businessinsider.in

तर मित्रहो, जगातील सर्वत उंच पर्वताला गवसणी घालायची तुमचीही इच्छा असेल तर सर्वात कमी कष्टप्रद असलेल्या चिमबोराझोचा माथा गाठून तुम्ही जगातील सर्वात उंच पर्वत सर केल्याचा आनंद मिळवू शकता.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?