कोई भी काम छोटा नही होता!! इथं कचरा उचलणारे कर्मचारी कमवतात करोडो रुपये
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मित्रांनो आपल्याकडे भारतात प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी अशा काही सरकारी किंवा अगदी खाजगी कंपन्यांमध्ये काम करणार्या कर्मचार्यांच्या श्रेणी आहेत. यात स्वच्छता कर्मचारी हे चतुर्थ श्रेणीमध्ये येतात. त्यांना मिळणारा पगार किंवा सवलती देखील तशाच श्रेणीच्या असतात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की परदेशात मात्र हे स्वच्छता कर्मचारी इन डिमांड आहेत बर का!
मग ती अमेरिका असो, इंग्लंड असो की ऑस्ट्रेलिया, भारताबाहेरच्या अनेक देशांमध्ये या सफाई कामगारांचा बोलबाला आहे. कोई भी काम छोटा नाही होता असे आपल्याकडे म्हंटले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र ते परदेशातून अनुभवले जाते.
कारण त्या ठिकाणी या सफाई कामगारांना मिळणार्या वेतनाचा आकडा पाहिलात तर मित्रांनो तुमचे डोळे नक्कीच विस्फारतील. यामागे खरी परिस्थिति काय आहे? आणि या कामगारांना का एवढे मोठे वेतन दिले जाते? याची कारणे जाणून घेऊया.
सध्या कोरोंनाच्या उद्भवलेल्या संकटानंतर परदेशांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांना मोठी मागणी आहे. कर्मचार्यांच्या तीव्र कमतरतेमुळे, सफाईची सेवा देणार्या कंपन्यामध्ये कर्मचार्यांना नियुक्त करण्यावरून तीव्र स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या कंपन्या आपल्या सफाई कर्मचार्यांना प्रचंड पगार देत आहेत.
यासाठी कंपन्यांकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिलेला पगार तुम्हाला माहीत आहे का? वर्षाला १ कोटी रुपये! हे वेतन सॉफ्टवेअर इंजिनीअर आणि डॉक्टरांना जेवढे वेतन दिले जाते त्यापेक्षा जास्त आहे.
हे ऐकून आश्चर्य वाटत असले तरी, ऑस्ट्रेलियातील सफाई सेवा कंपन्या सफाई कर्मचाऱ्यांना मोठे पॅकेज देण्यास तयार आहेत कारण कोरोंना नंतर २०२१ पर्यंत संपूर्ण देशातील स्वच्छता क्षेत्रातील मागणी वाढली आहे.
पूर्वी म्हणजे; २०२१ पूर्वी, सफाई कर्मचाऱ्यांना प्रति तास २७०० रुपये पगार मिळत होता, परंतु आता ते ३६०० रुपयांपर्यंत वेतन देत आहेत. सिडनी मधील कंपनी ‘अॅब्सोल्युट डोमेस्टिक्स’ च्या मते, कंपन्या आपत्कालीन परिस्थितीत प्रति तास ४,७०० रुपये देण्यास तयार आहेत.
अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना तासाभराचा पगार देतात, जे लहान नाले आणि घरातील खिडक्या स्वच्छ करतात. त्या हिशेबानुसार दर महिन्याला कर्मचाऱ्यांना सरासरी आठ लाख रुपये पगार मिळतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे देशातील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे त्यांचे सरासरी वेतन पॅकेज वार्षिक ७२ लाख ते ८० लाख रुपये आहे.
काही कंपन्या तर एक कोटी रुपये एकरकमी पगार देत आहेत. ऑस्ट्रेलियातीलच नाही तर ब्रिटनमधील सफाई कर्मचाऱ्यांचे पगारही त्याच पातळीवर आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एका क्लिनरचा पगार भारतीय डॉक्टर आणि इंजिनिअरपेक्षा कितीतरी जास्त असतो. आणि, याचे मुख्य कारण अर्थातच देशात स्वच्छता कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.
नोकरीच्या संधी कमी असल्याने भारतात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या उलट परदेशात माणसं कमी आणि काम जास्त अशी स्थिती आहे.त्यामुळे जास्त पगार देऊनही एखाद्या साध्या कामासाठी तिकडे कामगार मिळत नाहीत.
कोणताही अनुभव नसलेल्या सफाई कामगाराला जो आठवड्यातून पाच दिवस आणि दिवसाचे आठ तास काम करतो त्याला वार्षिक ९३६०० डॉलर (अंदाजे ७५ लाख रुपये) पगार दिले जाईल. एवढा मोठा पगार असूनही ही कामं करायला लोक मिळत नाहीत.
—
- “स्वच्छतेचे बळी” – जातीयवाद आणि दुर्लक्षित सफाई कामगारांची करुण कहाणी
- प्रशासनाची इच्छा असेल तर काय घडू शकतं ह्याची साक्ष : कचरा मुक्त इंदौर
—
अॅब्सोल्युट डोमेस्टिक्सच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या मते, २०२१ च्या मध्यापासून त्यांना व्यावसायिक सेवेसाठी पुरेसे क्लिनर मिळू शकले नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार, नऊ महिन्यांपूर्वी त्यांनी तासाचा दर ३५ डॉलर पर्यंत वाढवला होता. पण त्याचाही काही चांगला परिणाम झाला नाही.
सिडनीच्या काही भागात अजूनही क्लिनर शोधण्यासाठी धडपड सुरू आहे. अॅबसोल्युट डोमेस्टिक्सचे व्यवस्थापकीय संचालक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अधिक तास काम करण्याची परवानगी देण्यासाठी सरकारला आवाहन करत आहेत. दरम्यान, इतर सफाई कंपन्याही जास्त पगार देत आहेत.
तिथली शहरी कंपनी एका तासाला ३५ डॉलर पगार देत होती, पण आता तिथे कर्मचाऱ्यांना ४० डॉलर ते ५४.९९ डॉलर प्रति तास पगार दिला जात आहे.
मात्र ही रक्कम लवकरच तासाला ६० डॉलर पर्यंत पोहचू शकते. याचा अर्थ असा की फर्मसाठी पूर्ण वेळ काम करणारा क्लिनर वार्षिक १२४८०० डॉलर कमवेल. भारतीय चलनात ही रक्कम सुमारे एक कोटी रुपये असेल.
मित्रांनो वेतनाचे हे आकडे पाहता आपल्याकडचे रस्त्याच्या कडेला गोळा करून ठेवलेले कचर्याचे डोंगर आणि परदेशातील स्वच्छ सुंदर रस्ते, घरे यांची नकळत तुलना सुरू होते.
अशावेळी कारण काही असो पण स्वच्छतेसाठी स्वच्छता कामगारांना दिले जाणारे करोडो रुपयांचे वेतन योग्यच आहे असे म्हणावे लागेल, नाही का?
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.