' डायबेटिस, बीपी, हृदयविकार : औषधांच्या गोळ्यांपेक्षा कितीतरी गुणकारी ५ घरगुती गोष्टी – InMarathi

डायबेटिस, बीपी, हृदयविकार : औषधांच्या गोळ्यांपेक्षा कितीतरी गुणकारी ५ घरगुती गोष्टी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अलीकडच्या जीवनशैली मध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या व्यावसायिक संधी तरुण वयातच मिळत असल्यामुळे कमी वयातच भरपूर पैसा हाती खुळखुळू लागतो. त्यातच कामाचा ताण देखील भरपूर असतो. हा ताण कमी करण्यासाठी दारू –सिगरेट सारख्या व्यसनांचा आधार घेतला जातो.

बैठी जीवनशैली ,कामाचा अतिरिक्त ताण आणि व्यसन यामुळे मधुमेह, ह्रदयविकार यासारख्या व्याधी तरुण वयातच मागे लागतात. त्यामुळे रक्ताच्या गाठी तयार होणं आणि त्यापायी ह्रदयविकार किंवा स्ट्रोक येऊन मृत्यू होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.

 

heart-attack-inmarathi

 

म्हणूनच आपला रक्त प्रवाह वाहता ठेवणं हे गरजेचं बनत चाललं आहे. रक्तात सतत गाठी होण्याचं प्रमाण वाढतच असेल तर वेळीच सावध होऊन डॉक्टरी उपाय सुरु करावेत.

त्याच बरोबरीने आहारात अशा गोष्टींचा समावेश करावा, जेणेकरून रक्त पातळ रहाण्यास मदत होईल. कोणत्या आहेत या गोष्टी ते पाहू या-

१) हळद 

हळद ही बहुगुणी अशा औषधी गुणधर्मानी युक्त असते. त्यामुळे बहुतांश विकारामध्ये हिचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो.

यात असलेल्या अॅटीकोएगुलंट घटकांमुळे रक्त पातळ होण्यास मदत होते.

 

turmeric inmarathi

 

या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या एका वैद्यकिय अहवालात हळद ही उपयुक्त असली तरी तिचे थेट सेवन न करता ती गरम पाण्यात, सूपमध्ये किंवा एखाद्या पदार्थात टाकून खाण्याचा सल्ला दिला आहे.

२) लसूण 

यात असलेल्या उग्र वासामुळे अनेकदा त्याचा वापर पदार्थांची चव वाढविण्यासाठी केला जातो.

 

eating garlic inmarathi

 

लसणात असलेल्या अँटीथ्रोम्बोटीक या घटकांमुळे रक्त गोठण्यास आळा बसतो. त्यामुळे रोजच्या आहारात लसूणाचा वापर पुरेश्या प्रमाणांत असणे गरजेचे आहे.

३) आलं 

हा उष्ण रसानी युक्त असा पदार्थ आहे. यात असलेल्या नैसर्गिक आम्लामुळे रक्त पातळ रहाण्यास मदत होते. हे नैसर्गिक आम्ल आरोग्यदायी असल्यामुळे, वाळवलेले अथवा ताज्या आल्याचा समावेश आपल्या आहारात असावा.

 

ginger inmarathi

 

जसे नुसतंच आलं खाण्यापेक्षा कोशिंबीर ,सॅलड किंवा आमटी –सूप यासारख्या द्रवयुक्त पदार्थांमध्ये ते टाकून त्याचं सेवन करावं.

४) लाल मिरची 

मिरची ही गुणाने जरी जहाल असली तरी तिच्यात असलेल्या नैसर्गिक घटकांमुळे ती रक्त पातळ ठेवण्यास नेहमीच मदत करीत असते.

 

red mirchi im

 

प्रत्येक मिरचीमध्ये काही ना काही गुण असले तरीही लाल मिरची मध्ये सॅलिसलेटस नावाचा घटक मोठ्या प्रमाणावर आढळतो. आणि याच घटकामुळे रक्त पातळ रहाण्यास मदत होत असते. त्यामुळे वेगवेगळ्या मसाल्या किंवा चटणीच्या स्वरुपात लाल मिरचीचे सेवन करावे.

५) व्हिटामिन ई 

रक्त पातळ करण्यास हा पूरक असा घटक आहे. असे असले तरी व्हिटामिन ई चा वापर माफक प्रमाणात असावा. जर या घटकाचा ओव्हर डोस झाला तर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.

वरील गोष्टी या परिणामकारक असल्या तरी त्यांचे नियमित व पुरेश्या प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे. आहाराबरोबर नियमित व्यायाम ,अथवा योगासने किंवा किमान ४५ मिनिटे तरी शारीरिक हालचाल होणे गरजेचे आहे.

यासह नियमित ध्यान धारणा करणे हे देखील सध्याच्या ताणयुक्त जगात महत्वाचं आहे.

 

yoga inmarathi

 

तरुण वय असल्यामुळे पैसा कमविणं आणि रहाणीमान उंचविण्यासाठी आवश्यक असलेल्या भौतिक सुखसोयी मिळविण्यासाठी धडपडत सुरुच राहते.’ मी अजून तरुण आहे. मला काय होतय. योगासन –ध्यान करू म्हातारपणी ‘ असा एक समज करून घेतात.

आरोग्य सांभाळण हे पैसा कमविण्या इतकेच महत्वाचे असून त्याकडे वेळीच लक्ष दिल्यास आयुष्य सुखाने जगता येईल.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?