या न्यायालयात थेट देवांना कधी मृत्युदंड तर कधी तुरुंगवासाची शिक्षा केली जाते!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे की पृथ्वीवर केलेल्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट कृत्याची शिक्षा इथेच मिळेल. परंतु केवळ मानवानेच केलेल्या वाईट कृत्यांसाठी त्याला पृथ्वीवर शिक्षा भोगावी लागते असे नाही. यासाठी देवालाही गोत्यात उभे केले जाते. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू होते.
छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील केशकल नगरमध्ये भंगाराम देवीचे मंदिर आहे. भंगाराम देवी ही परिसरातील ५५ महसुली गावांमध्ये स्थापित शेकडो देवतांची आराध्य देवी आहे. दरवर्षी भरणाऱ्या या जत्रेत सर्व गावकरी आपापल्या गावातील देवतांसह येथे पोहोचतात. दरवर्षी या जत्रेत देव अदालत भरते. काय आहे या कहाणी मागची कहाणी?
तर या खास दरबारात आरोपी हे देव असतात आणि तक्रारदार हे गावकरी असतात.
या देवता दरबारात सर्व देवी-देवतांना हजर केले जाते. ज्या देवतेविरुद्ध तक्रार केली जाते, ती तक्रार भंगाराम देवीकडे केली जाते. या सर्व तक्रारी ऐकून भंगाराम देवी निर्णय सुनावतात, सर्वांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर भंगाराम देवी संध्याकाळी आपला निर्णय सुनावतात.
खरं तर, या संपूर्ण प्रक्रियेत भंगाराम देवीचा पुजारी बेशुद्ध होतो. लोकांच्या मते, देवी स्वतः पुजार्याच्या शरीरात प्रवेश करते आणि मग देवी आपले निर्णय देते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
देवतांनी केलेल्या गुन्ह्यावर शिक्षा अवलंबून असते. यात ६ महिन्यांच्या हकालपट्टी पासून अनिश्चित काळासाठी हकालपट्टीपर्यंतची शिक्षा आहे. देवालाही शिक्षेत मृत्युदंड मिळू शकतो. फाशीची शिक्षा झाल्यास मूर्ती नष्ट केली जाते.
दिवसभर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत गावकरी भंगाराम देवीसमोर तक्रार सांगतात. यानंतर हद्दपारीची शिक्षा झालेल्या देवतांच्या मूर्ती मंदिराजवळ बांधलेल्या खुल्या कारागृहात सोडल्या जातात. मूर्तीसोबत तिचे दागिने आणि इतर सर्व सामान तिथेच ठेवले जाते.
ठराविक कालावधीसाठी शिक्षा झालेली देवता मुदत पूर्ण झाल्यावर परत येते. परत येण्यापूर्वी देवतेची विधिवत पूजा केली जाते. आणि नंतर त्या देवाला आदरपूर्वक मंदिरात पुन्हा स्थापन केलं जातं.
देवी-देवतांवर केल्या जाणाऱ्या तक्रारींपैकी बहुतांश तक्रारी नवस न पाळल्याच्या असतात. याशिवाय पीक खराब आलं, जनावरांना कोणताही रोग झाला, गावात कोणताही रोग पसरला या स्वरुपाच्या असतात तर गावातील कुलदैवतालाही दोषी मानलं जातं.
दरवर्षी होणाऱ्या या जत्रेत महिलांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी असून, त्यांना जत्रेतील नैवेद्य खाण्यासही परवानगी नाही. याचे कारण स्थानिक लोक सांगतात की स्त्रिया सौम्य स्वभावाच्या असतात, त्यामुळे त्यांची उपस्थिती देवाविरुद्धच्या सुनावणीवर विपरीत परिणाम करू शकते.
असं म्हणतात की, देवीने बस्तरच्या राजाला स्वप्नात दृष्टान्त देवून सांगितले की मला तुझ्या राज्यात यायचं आहे, तेव्हा राजा मंत्र्यांसह, प्रजाजनांसह बस्तरहून देवीच्या स्वागतासाठी आला असता केशकल येथे मोठे वादळ आलं आणि देवी प्रथम पुरुषाच्या वेषात घोड्यावर स्वार होऊन आली.
जेव्हा लोकांनी तिला नमन केलं तेव्हा ती स्त्री वेशात बदलली. केसकलच्या खोऱ्यात रस्त्याच्या कडेला बांधलेले मंदिर हे देवीचे दर्शन घडवण्याचं ठिकाण आहे. या ठिकाणापासून २ कि.मी. अंतरावर दुसरं मंदिर बांधलं जाऊन तिथे देवीची स्थापना करण्यात आली आहे.
ही शिक्षा आर्थिक दंड, तात्पुरती निलंबन किंवा देवलोकातून कायमची निरोप देण्याच्या स्वरूपात असू शकते.
दरवर्षी भादोन जरता हा सण बस्तर जिल्ह्यातील केशकल शहरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. भादो महिन्याच्या शेवटच्या शनिवारी सर्व देवता भंगाराम देवीच्या दरबारात हजर असतात.
येथील पुजारी सरजू राम गौर सांगतात की, याआधी सलग सहा शनिवारी भंगारम देवीची पूजा केली जाते. या महिन्यात भेट देणाऱ्या देवतांचे परंपरेनुसार स्वागत करून त्यांना त्यांच्या पद आणि प्रतिष्ठेनुसार स्थान दिले जाते. त्यांच्यासोबत पुजारी, गायता, सिरहा, गावप्रमुख मांझी, मुखिया आणि पटेल हे प्रतिनिधी म्हणून येतात. पूजेनंतर वर्षभर प्रत्येक गावात सुख, शांती, निरोगी जीवन, चांगले उत्पन्न आणि कोणत्याही प्रकारच्या दैवी आपत्तीपासून प्रत्येक जीवाचे रक्षण होण्यासाठी प्रार्थना केली जाते.
जातीय सलोख्याचे उदाहरण भादो जरतामध्येही आढळते. भंगाराम देवीच्या मंदिराजवळ, डॉक्टर खान देव नावाची एक देवता देखील आहे, जी रोगराई, अरिष्ट यांपासून रक्षण करते.
जाणकार सांगतात की, अनेक वर्षापूर्वी या परिसरात एक डॉक्टर खान होते, ते निस्वार्थ भावनेने आजारी लोकांवर उपचार करायचे. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या सेवेच्या भावनेमुळे येथील लोकांनी त्यांना देव म्हणून स्वीकारले आणि त्यांची पूजाही केली.
बस्तरच्या जमाती मुळात कष्टकरी आदीवासी आहेत, म्हणून त्यांच्या पूज्य देवी-देवतांवर आंधळेपणाने विश्वास ठेवण्याऐवजी ते त्यांची परीक्षा घेतात. वेळोवेळी या देवतांच्या शक्तीचेही मूल्यमापन हे आदिवासी करतात. बेजबाबदार देवी-देवतांना साफसफाईची संधी दिली जाते आणि त्यांना जनअदालतमध्ये शिक्षाही होते.
देवतांना शिक्षा करणारे दुसरे कोणी नसून त्यांचे भक्तच असतात. शिक्षा झालेल्या देवतांना परत येण्याचीही तरतूद आहे, मात्र त्यांनी चुका सुधारून भविष्यात जनकल्याणाच्या कामांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले की मगच त्यांचे पुन्हा स्वागत केले जाते. ज्या देवदेवतांनी हे वचन पूर्ण केले आहे ते पुजाऱ्याला स्वप्नात येतात.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देवाला नवीन रूप दिले जाते. म्हणजेच देवतेच्या प्रतिकांना नवे रूप देऊन, भंगाराम देवी आणि तिचा उजवा हात कुनरपत देव यांच्या संमतीनंतर त्यांच्या त्यांच्या द्देवलात या देवतांची स्थापना केली जाते.
विशेष म्हणजे भंगाराम देवी या परिसरातील प्रमुख देवता असूनही जोरता उत्सवात महिलांनाआणि प्रसाद घेण्यास पूर्णपणे बंदी आहे. नारना गावातील सिरहा रूपसिंग मांडवी यांच्या म्हणण्यानुसार, महिला भावनिक असतात, त्यामुळे जौर्तामध्ये होणाऱ्या जनअदालतीमध्ये देवतांच्या विरोधात घेतलेल्या निर्णयांचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
तुम्ही कधी ऐकले आहे की देवालाही कोर्टात हजर केले जाते, त्याच्या गुन्ह्यांची सुनावणी होते आणि दोषी ठरल्यावर देवाला शिक्षा होते जी मंदिरातून हद्दपार करण्यापासून मृत्यूदंडापर्यंत काहीही असू शकते.
देवतांना मानवी नियमात बसवून त्यांनाही शिक्षा देण्याचे किंवा कौतुक करण्याचे काम त्यांची भक्त मंडळी करतात. शिक्षा ही देवतांनी केलेल्या गुन्ह्यावर अवलंबून असते, जी ६ महिन्यांच्या हकालपट्टीपासून ते अनिश्चित काळासाठी हकालपट्टीपर्यंत आणि अगदी मृत्यूदंडापर्यंत असू शकते.
फाशीची शिक्षा झाल्यास, मूर्तीचे विघटन केले जाते तर हद्दपारीची शिक्षा झालेल्या देवतांना मंदिराजवळ बांधलेल्या खुल्या तुरुंगात सोडले जाते. मूर्तीसोबत तिचे दागिने आणि इतर सर्व वस्तू ठेवल्या जातात.
या ठिकाणी जे काही साहित्य नैवेद्य म्हणून आणले जाते, ते प्राणी असेल तर गावातील लोक प्रसाद म्हणून स्वीकारतात आणि इतर वस्तू येथेच सोडून देतात. येथून एखादी वस्तु परत नेल्यास गावावर संकट कोसळेल असा समज आहे.
मित्रांनो धर्म आणि संस्कृती या मानवनिर्मित गोष्टी आहेत तशाच देवी-देवता या देखील अशाच मानव निर्मित आहेत असेच हा भांगाराम देवीचा न्यायदरबार पाहून म्हणावे लागेल…तुमचे यावर काय मत आहे आम्हाला जरूर कळवा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.