तुमचं साडीतलं सौंदर्य खुलून दिसण्यासाठी आधी “बॉडी शेप” समजून घ्या…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
तुम्ही कोणत्या ही वयातली स्त्री असा, भारतीय स्त्रीचे सोंदर्य खऱ्या अर्थाने खुलते ते साडीमध्ये. या साडीचे असंख्य मनमोहक, लोभसवाणे असे भरपूर प्रकार पहायला मिळतात.
बदलत्या काळानुसार यामध्ये देखील नवनवीन ट्रेण्ड येताना दिसतात. जसे खणाची साडी, नेटवाली, पार्टी वेअर साडी असे नवनवीन ट्रेण्ड येताना दिसतात. त्या त्या ट्रेण्ड नुसार साडी घेण्याची सवय बऱ्याच स्त्रियांना असते.
जर तुमची शारीरिक ठेवण अर्थात तुमचा बॉडी शेप लक्षात घेऊन त्यानुसार साडीची निवड केल्यास त्यात तुमचे सोंदर्य अधिक खुलून दिसेल यात शंकाच नाही, पण त्यासाठी लक्षात घ्यायला हवा तुमचा बॉडी शेप नेमका कोणत्या स्वरूपाचा आहे ते. यासाठी जाणून घ्या पुढील गोष्टी –
अॅपल शेप बॉडी – ज्या स्त्रियांची छाती व कंबरेकडचा भाग पुष्ट किंवा भारदस्त स्वरूपाचा असून बाकी बांधा सडपातळ स्वरूपाचा असेल तर ती ठेवण अॅपल शेप बॉडी म्हणून ओळखली जाते.
एमब्रोयडरी असलेली सिल्कची साडी या ठेवणीच्या स्त्रियांना अधिक शोभून दिसते. त्यात ही जर बनारसी सिल्क साडी ती ही उलट्या पदराच्या स्टाइलने नेसली, तर त्याचा एक फायदा असा होतो, की यात तुमच्या भरीव भागाकडे नजर न जाता साडीच नजरेत भरते. अशा साडीवर छोट्या सिल्व्ह्ज पेक्षा लॉन्ग सिल्व्ह्जचे ब्लाउज छान खुलून दिसतात.
पिअर शेप बॉडी – या प्रकारात छातीकडील भाग लहान असून कंबर आणि त्याखालचा भाग पुष्ट स्वरूपाचा असतो. जोर्जेट किंवा शिफोनच्या साड्या या ठेवणीच्या स्त्रियांसाठी परफेक्ट पर्याय आहे. कारण ही साडी अंगाला चांगली चिकटून बसते. शिवाय फिकट रंगापेक्षा गडद रंगाची, एमब्रोयडरी असलेली साडी नेसल्यास ती छान उठून दिसते.
या ठेवणीच्या स्त्रियांनी सहसा एक पदरी अथवा मर्मेड स्टाइल ची साडी नेसू नये. कारण या प्रकरच्या साडीमध्ये दोष झाकण्यापेक्षा ते अधिक दिसून येतात. म्हणून हे प्रकार टाळावेत.
स्कीनी बॉडी – साधारणपणे सडपातळ बांध्याची ठेवण या प्रकरात येते. योग्य ठिकाणी भरीवपणा व सडपातळ शरीरयष्टी या रचनेमुळे या बांध्यावर कोणतीही साडी शोभून दिसते.
कॉटन, खादी किंवा सिल्क या प्रकारातील कोणतीही साडी तुम्हाला शोभून दिसेल. नेहमीच्या पद्धतीने साडी नेसून पदर पिन अप न करता तो खांद्यावरून ओघळता ठेवल्यास त्यात तुमच्या शारीरिक ठेवणीमुळे साडीची नजाकत अधिक खुलून येईल.
मोठ्या काठपदर असलेल्या साड्यांपेक्षा प्रिंटेड साड्या नेसाव्यात आणि अशा साड्यांवर हाय नेक स्टाईल असलेला ब्लाउज घातल्यास साडीला एक स्टाईलिश लुक मिळेल.
सुबक ठेंगणी ठेवण – बुटक्या बांध्याच्या स्त्रीला साडी ची फॅशन अजिबात शोभत नाही असा एक गैरसमज आहे, पण अशा बांध्याच्या स्त्रियांनी सौम्य रंगाच्या, मोठ्या काठ असलेल्या साड्या आणि त्यावर लॉन्ग स्लीव्हज असलेला ब्लाउज घातल्यास यात त्या तितक्याश्या बुटक्या दिसणार नाही.
अशा ठेवणीच्या स्त्रियांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, ती म्हणजे साडी नेसल्यावर इतर अॅक्सेसरीज जसे, मोठाले कानातले अथवा गळ्यातला नेकलेस यापैकी एक घालण आवश्यक आहे. अन्यथा नुसतेच साडीमध्ये लुक खुलून दिसणार नाही.
—
- पुस्तकांची नव्हे, साड्यांची लायब्ररी जिथे फक्त ५०० रुपयांत मिळतील भारीतल्या साड्या
- आज प्रसिद्ध ब्रँड बनलेल्या या साड्या, फक्त खास पाहुण्यांना भेट म्हणून दिल्या जायच्या!!
—
वरील गोष्टी विचारात घेऊन जर साडीची निवड केल्यास, खऱ्या अर्थाने साडीत सुबक दिसाल.
प्लस साइज बॉडी शेप – नावावरूनच समजले असेल की यात लठ्ठ किंवा अति लठ्ठ बांधा असलेल्या स्त्रियांचा समावेश होतो. अशा स्त्रियांनी वजनाने हलक्या असलेल्या जसे क्रेप, शिफोन या प्रकारातील साड्या नेसाव्यात.
यातही प्लेन रंगाच्या साडीवर सिल्कचा ब्लाउज घालावा आणि पदर पिन अप न करता मोकळा सोडावा. असा साधा सिम्पल लुक या ठेवणीच्या स्त्रियांना खूप शोभून दिसतो. त्याचबरोबरीने अशा पद्धतीने साडी नेसल्यास त्यांचा जाडेपणा ही बघणाऱ्याच्या अंगावर येत नाही.
थोडक्यात, काय तर स्त्री कोणत्याही बांध्याची असो साडी ही प्रत्येकीलाच शोभून दिसते. साडी नेसण्यापेक्षा ती कशा पद्धतीने कॅरी केली जाते, यालाही तितकेच महत्व आहे. साडीवर थोडासा मेकअप आणि काही मोजकेच दागिने यांच्या सहाय्याने साडीची नजाकत अधिक खुलविता येते. फक्त गरज आहे ती अशा सोंदर्य खुलविणाऱ्या नजरेची.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.