' शेताचं ग्राउंड – मंजुरांचे खेळाडू : रशियन पंटरांना चुना लावणारा गुजरातमधला “IPL Scam”…! – InMarathi

शेताचं ग्राउंड – मंजुरांचे खेळाडू : रशियन पंटरांना चुना लावणारा गुजरातमधला “IPL Scam”…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गुजरात राज्यात सध्या दोनच विषय चर्चेत आहेत एक म्हणजे पूरपरिस्थिती, गेल्या महिन्याभरापासून दडी मारलेल्या पावसाने आपली हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरातमध्ये देखील पावसाने हाहाकार माजवला आहे.

अहमदाबाद, वलसाड भागातील अनेकांना सुरक्षित स्थळी पोहचवण्यात आलं आहे. हे झालं एकीकडे दुसरीकडे गुजरात पोलिसांनी सट्टा लावणाऱ्या काहीजणांना अटक केली आहे.

तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं क्रिकेट असा खेळ आहे ज्यावर देशातच नव्हे तर जगभरातून सट्टा लावला जातो. खरं तर जुगार, सट्टा यावर बंदी असताना देखील सर्रासपणे तो खेळाला जातो. सट्टा आजवर सामन्यावर, एखाद्या खेळाडूवर लावलेला आपण ऐकला आहे. इथे मात्र चक्क IPL सारख्या लीगवर सट्टा लावला जातोय, काय आहे नेमकी भानगड जाणून घेऊयात…

 

ipl inmarathi

 

बनावट IPL चा सट्टा :

नुकतंच IPL चा सीजन होऊन गेला आहे. ज्याप्रमाणे क्रिकेटचे सामने मोठ्या स्तरावर खेळेल जातात त्याच पद्धतीने असे सामने तालुका, जिल्हा पातळीवर खेळले जातात.  IPL च्या धर्तीवर गुजरातमधील वडनगरमध्ये एक बनावट लीग चालवली जात होती. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी तातडीने यावर कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून तर घडलेला एक प्रकार म्हणजे एखाद्या वेबसिरीजसाठी एक उत्तम कन्टेन्ट आहे. पोलिसांच्या माहितीनुसार वडनगर जवळील मेहसाणा गावात काही लोकांनी शेत विकत घेतलं. त्याच शेतात क्रिकेटचं पीच बनवलं.

लाईट्स लावले, कॉमेंट्री बॉक्स अशी सर्व सोयीसुविधांनी ही लीग तयार करण्यात आली होती. म्हणजे खऱ्याखुऱ्या IPL सारखा माहोल करण्यात आला आणखीन महत्वाचं म्हणजे यातील सामने एका मोबाईल ऍपवर दाखवले जात होते.

 

ipl im 2

 

एवढा मोठा घाट घालायचा म्हणजे मनुष्यबळ हवं, म्हणूनच गावातील तरुण पोरांना या लीगच्या आयोजनात सामील करण्यात आलं होत. एका मॅचसाठी त्यांना ४०० रुपये दिले जात होते. एवढंच नाही तर खेळाडूंना चेन्नई सुपर किंग्स, गुजरात लायन्स या टीमच्या जर्सी देखील दिल्या होत्या. या बनावट IPL लीगची हवा इतकी केली की थेट रशियामधील मॉस्को, वोरोनेझ सारख्या शहरातून लोक यावर बेटिंग करत होते.

या सामन्यांचे प्रक्षेपण youtube चॅनेलवर दाखवण्यात आलं होत. सामान्यच प्रक्षेपण करताना ग्राउंड न दाखवता केवळ पिचवर फोकस करून दाखवले जात होते, बॅकग्राउंडला प्रेक्षकांच्या ओरडण्याचा आवाज टाकण्यात आला होता.

टेलिग्रामवर एक चॅनेल तयार करण्यात आलं होत. ज्याद्वारे सामन्यातील खोट्या पंचांना चॅनेलवरील माहिती कळत होती. ज्यात अशी माहिती असायची की खेळाडूने चौकार मारावा किंवा आउट व्हावे.

उपांत्यफेरी सुरु असतानाच पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीने आतापर्यंत ३००००० रुपये रशियाच्या लोकांकडून मिळवले आहेत.

आज भारताचा कॉमेंट्रीवीर म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं तो म्हणजे हर्षा भोगले. याच हर्षा भोगलेची मिमिक्री करणारा एक अवलिया  या सामन्याची कॉमेंट्री करत होता. पोलिसांनी केवळ आरोपीलाच नव्हे तर त्यांच्यासोबत असलेल्या सगळ्या वस्तू जप्त केल्या आहेत.

 

ipl im 1

‘सट्टा मटका’ हा खेळ नेमका कसा उदयास आला? वाचा यामागचा अज्ञात इतिहास

IPL मध्ये सट्टा बाजार कसा चालतो? चमकत्या दुनियेचा खरा गुन्हेगारी चेहरा..

घडलेला सगळा प्रकारात नाट्यमयता खूप होती, या अशाच धर्तीवर हॉलिवूडमध्ये १९७३ मध्ये स्टिंग नावाचा सिनेमा येऊन गेला आहे ज्याला ऑस्करदेखील मिळाला आहे. ज्यात असं दाखवलं होत की काही गुंडांची फसवणूक करण्यासाठी काही खोट्या कलाकारांनी एक बेटिंग ऑपरेशन सेट केलं होत.

आज क्रिकेटकडे खेळ म्हणून न बघता केवळ पैसे कमवण्याचे साधन म्हणून बघितलं जात आहे. ८० दशकांपासून क्रिकेटसारख्या खेळाला सट्ट्याची कीड लागली आहे. या सट्ट्यामध्ये केवळ लोकांचा समावेश नसून खेळाडूंचा देखील समावेश होता. मोहम्मद अझरुद्दिनसारखे खेळाडू यात अडकले आणि त्यांनी आपलं क्रिकेटमधलं करियर संपवून टाकल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?