' या १० साध्या गोष्टी न पाळणाऱ्याना लोक हमखास ”गबाळा” म्हणून ओळखतात…! – InMarathi

या १० साध्या गोष्टी न पाळणाऱ्याना लोक हमखास ”गबाळा” म्हणून ओळखतात…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

टीप टॉप दिसणं हा तर बायकांचा जन्मसिध्द हक्क असतो. मग तो समारंभ घरगुती स्वरूपाचा असो वा खास किंवा कुठली ही पार्टी असो वा पिकनिक. त्या त्या पेहरावात आपण नुसतेच शोभून नाही, तर उठून दिसलो पाहिजे,अशी सुप्त लालसा प्रत्येकीच्या मनात असते.

मग अशावेळी तुमच्या एखाद्या गबाळ्या सवयीमुळे तुम्ही चेष्टेचा विषय ठरू शकता. तुमचा पेहराव असो वा एखादी सवय…कोणत्या गोष्टींवरून तुम्ही विनोदांचा भाग ठराल याचा काही नेम नाही.

 

kabir im

 

त्यामुळे केवळ पेहराच नव्हे तर त्यासह तुमच्या सवयी, वागण्या-बोलण्याच्या पद्धती या सगळ्याच गोष्टी महत्वाच्या ठरतात.

काही बेसिक चुकांमुळे आपण हसण्याचा, थट्टेचा विषय ठरू नये असं वाटत असेल तर पुढील काही टिप्स नक्कीच विचारात घ्या.

१) तुमचं व्यक्तिमत्व नीट जाणून घ्या 

प्रत्येकाचे सौंदर्याच्या बाबतीत स्वत:चे असे काही ठोकताळे असतात. तुमचे व्यक्तिमत्व नेमके कशा स्वरूपाचे आहे, म्हणजेच त्यातल्या खुबी आणि उणीवा यांचा नीट अभ्यास करा.

 

mirror im

 

मग प्रसंग काय आहे त्यानुसार तुमचा पेहराव ठरवा. कधी कधी वन –पीस घालणे किंवा शोर्ट्स घालणे अशा काही थीम्स असतात. अशावेळी वयाचा विचार न करता तुम्ही त्यात कितपत सहजतेने वावरू शकाल हे पहा.

२) डोळे उघडे ठेऊन वावरा 

हे वाचून कदाचित तुम्हाला हसू आलं असेल ना! पण हे खरंच आहे. अलिकडेच यासंदर्भात केलेल्या एका पाहणीमध्ये असे आढळून आले की डोळे जितके जास्त खोल गेलेले असतील अथवा त्या भोवती काळी वर्तुळे असतील तर अशी व्यक्ती नैराश्याची शिकार असते.

त्यामुळे तुमचे डोळे कायम सजग आणि टवटवीत दिसतील याकडे आवर्जुन लक्ष द्या. त्यासाठी डोळ्यांच्या स्वच्छतेसह काजळासारख्या सौंदर्य प्रसाधनांचा वापरही करू शकता.

 

kajal inmarathi

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

३) चेहऱ्यावर हास्य असू द्या 

याचा अर्थ असा नाही की ,गरज असो वा नसो तुम्ही कायम हसतच राहिले पाहिजे.

सांगण्याचा मुद्दा हा आहे की, शक्यतो हसतमुखाने वावरा. यामुळे एक प्रकारची सकारात्मक उर्जा तुमच्या अवतीभवती राहते.

 

laughing inmarathi

 

परिणामी इतर लोकांना देखील तुमच्या बरोबर वावरताना सहज सोपं वाटतं.

४) थेट नजरेला नजर भिडवून बोला 

नजर खाली झुकवून बोलण्याचे संस्कार लहानपणापासून आपल्यावर केलेले असतात. पण बाहेरच्या जगात वावरताना, समोरच्या व्यक्तीच्या थेट नजरेला नजर भिडवून बोला.

 

raazi couple inmarathi

 

यामुळे तुमच्यात एक आत्मविश्वास निमार्ण होतो. शिवाय समोरच्या व्यक्तीच्या स्वभावाचा देखील अंदाज घेता येतो.

५) सरळ, सोप्या भाषेत संवाद साधण्यावर भर द्या 

बऱ्याचदा समोरच्याला प्रभावित करण्यासाठी तुम्ही अवघड आणि समजायला काहीशी कठिण अशा भाषेचा अवलंब करतात. त्या ऐवजी तुम्हाला नेमकं काय म्हणायचे आहे हे सहज, सोप्या भाषेत सांगा.

 

girl giving interview inmarathi

 

यामुळे नेमका संवाद होतो. अगदी समोरच्याचे म्हणणे तुम्हाला पटले नसेल तरीही ते नम्रपणे सांगितल्यास समोरची व्यक्ती ही तुमच्या मतांचा आदर करते. परिणामी कोणत्याही प्रकारचा गैरसमज मनात रहात नाही.

६) पेहेरावाला साजेश्या अश्या अॅक्सेसरिज वापरा 

प्रसंग काय आहे? समारंभ आहे की पार्टी का इतर आणखी काही त्यानुसार तुमचा पोशाख ठरवा आणि त्यावर शोभतील असेच दागिने वापरा.

 

prathana im

 

दरवेळी कानातले, बांगड्या, माळा घालयची गरज नसते. यापैकी एखादी गोष्ट नसली तरीही चालण्यासारखे असते. तेव्हा उगीच आहे म्हणून या गोष्टी वापरून स्वत:चे बुजगावणे करू नका.

७) पादत्राणाचा एखादा जोड ठेवा 

बऱ्याचदा समारंभासाठी जाताना हाय हिल्स घालणं गरजेचं असतं. अशावेळी खूप वेळ हिल्स घातल्यामुळे कंबरदुखी किंवा टाच दुखण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी तुम्हाला सोयीस्कर असलेल्या पादत्राणांचा जोड जवळ ठेवा.

 

high heels inmarathi1

 

जेणेकरून समारंभ संपताच तुम्ही तो घालू शकाल. आणि आरामदायी स्थितीत तुम्ही वावराल.

८) पाय स्वच्छ ठेवा 

जर तुमच्या पायाला शूज अथवा तत्सम स्वरूपाच्या चप्पला घातल्यावर घाम येण्याची प्रवृत्ती असेल तर घराबाहेर पडण्यापूर्वी पायांना डीओडरंट लावा.

 

leg deo im

 

यामुळे पायांना घामाची दुर्गंधी जाणविणार नाही.

९) नेलपेंट तपासा 

कोणत्याही समारंभासाठी तयार होताना हाता-पायावरील नेलपेंट तपासा. त्याचा रंग तुमच्या पोशाखाला साजेसा आहे का हे पहा.

कित्येकदा असं होतं की काही नखांवरचे नेलपेंट उडालेले असते. मग अशावेळी रीमुव्हरच्या सहाय्याने हे नेलपेंट साफ करून घ्या आणि मगच नवीन शेड लावा.

 

nailpolish remover inmarathi

 

आजकाल जास्त दिवस टिकते म्हणून बऱ्याच जणी जेल नेल पोलिशचा वापर करतात. पण त्यावर बऱ्याचदा भाजी तेलाचे डाग चिकटलेले दिसतात. अशावेळी हे डाग नेहमीच्या रिमूव्हर च्या सहाय्याने स्वच्छ करता येतात.

१०) डीप गळा सांभाळा 

कधी कधी फॅशन म्हणून तुम्ही डीप गळ्याचे पोशाख घालत असाल तर तुमच्या गळ्याला तुमच्या शरीरावर नीट बसवा. या गळ्याजवळ एक डबल टेप लावा. तिचे एक टोक कपड्याला आणि दुसरे टोक तुमच्या शरीराला चिकटवा.

जेणेकरून गळा शरीरावर योग्यरित्या बसून राहिल . यामुळे तुमचा लूक चीप वाटणार नाही.

 

tara im

 

जर या टिप्स लक्षात घेऊन तुम्ही समारंभात वावरलात तर निश्चितपणे पार्टीची शान बनाल यात शंकाच नाही .

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?