संभाजीनगर असो किंवा धाराशिव, शहरांच्या नामांतराची प्रक्रिया जाणून घ्या
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कोणत्याही गावाचं शहराचं नाव पूर्वापार चालत आलेले असते.त्याला त्या ठराविक नावाने बोलवायची त्या गावाचं तेच नांव घेण्याची, लिहिण्याची सवय सर्वांना असते. पण अचानक नाव बदलले जाते. त्याचा परिणाम काय होतो?
नामांतर हा गेल्या काही वर्षात ऐरणीवर आलेला मुद्दा आहे. आपल्याकडे पण नुकतेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे नांव संभाजीनगर केलं, उस्मानाबाद धाराशीव मध्ये बदलले. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तर नामांतराचा सपाटाच लावला आहे.
अलाहाबादचे नांव बदलून प्रयागराज केले आहे, मुघल सराई या जंक्शनचे नांव त्यांनी दीनदयाल उपाध्याय जंक्शन असे केले. अजूनही बरीच नांवे ते बदलणार आहेत. केरळ राज्याची राजधानी त्रिवेन्द्रम, या गावाचे नांव पण मागेच तिरुअनंतपुरम केले होते. म्हणजेच गावांची नावंबदलणं किंवा नामांतर करणे हा काही आत्ता चालू केलेला ट्रेंड नाहीय. तो खूप आधीपासून सुरु आहे.
त्याकाळी त्याचे प्रमाण कमी होते. आणि मिडिया इतका व्यापक झाला नव्हता त्यामुळे त्यातील कितीतरी गोष्टी लोकांना फारशा समजत नसत. पण योगी आदित्यनाथ सत्तेत आल्यानंतर त्यांनी गावांची नावे बदलण्याचा धुमधडाका लावला. त्यामुळे ही गोष्ट लोकांना माहिती झाली. अन्यथा याबाबत फारसे काही माहीत असायची किंवा चर्चा करायची आवश्यकता वाटलीही नव्हती.
तुम्हाला माहीत आहे का? सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरला पण काही लोक इस्लामपूर म्हणत नाहीत ईश्वरपूर म्हणतात. पण कागदोपत्री त्याचे नांव बदललेले नाही . हे ईश्वरपूर म्हणणारे लोक अगदी पत्रात पत्ता लिहिताना सुद्धा ईश्वरपूर असेच लिहित. पण मग ते ओळखायचे कसे? तर पिनकोडवरून.
आत्ता पत्रे मोडीत निघाली आहेत. मोबाईलवरून संपर्क सोपा झाला आहे. त्यामुळे याची गरजच उरली नाही.. असे कुणीही एखाद्या गावाचे नामांतर करू शकते का?असे नामांतर करायचे असेल तर काय करावे लागते? त्याचे परिणाम काय होतात? सरकारला काही झळ लागते का? जनतेवर त्याचा काय बोजा पडतो का? असे नाना प्रश्न मनात उभे राहतात. त्यावरच हा आजचा लेख.
नामांतर काय आहे?
एखाद्या गावाचे, जिल्ह्याचे राज्याचे असलेले नांव बदलून दुसरं नाव ठेवणे म्हणजे नामांतर. ते असे एकाएकी होत नसते. त्याची एक विशिष्ट प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया केल्याशिवाय असे कुठलेही गावाचे नांव बदलता येत नाही. असा बदल करायचा असेल तर आधी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी सरकारने काही मार्गदर्शक तत्वे ठरवून दिली आहेत.
काय करावे लागतं नांव बदलण्यासाठी?
कोणत्याही गावाचं नांव बदलायचं असेल तर त्यासाठी प्रथम तशी मागणी करावी लागते. मागणी करणारा माणूस हा विधानसभेचा सदस्य असावा लागतो. मग सरकार जनमत घेते की, जनतेची पण तशी इच्छा आहे का? प्रशासनाकडून नामांतर करण्याबाबत सर्व मुद्दे तपशीलवार मागवले जातात. त्यानंतर प्रशासन त्या शहराचा इतिहास काय आहे हे पण तपासून बघते.
त्यात जर हे नामांतर करणं योग्य आहे असे दिसले तर त्या शहराचे किंवा जिल्ह्याचे नांव बदलण्याचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये ठेवला जातो. तिथे जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर नवीन नावाने राजपत्रात नोंदणी केली जाते. अशा नोंदीनंतर त्या नावाला अधिकृत मान्यता मिळते. आणि त्यानंतरच कागदोपत्री नाव बदलून टाकले जाते. आणि मगच त्या शहराचे जिल्ह्याचे नांव नवीन नावाने संमत होऊन व्यवहारात वापरायला सुरुवात करता येते.
गावाप्रमाणे राज्याचे पण नाव बदलता येते का?
हो.. अर्थातच येत, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कायदे हे माणसाने तयार केले आहेत, कायद्याने माणूस नाही तयार केला. त्यामुळे माणसाच्या पाहिजे त्या गोष्टी बदलण्याचा कायदा अर्थातच आहे. आपण जसे आपले नांव बदलू शकतो तसेच राज्याचे नांव ही बदलता येते. पण ती प्रक्रिया थोडी कठीण आहे.
भारतीय संविधानाच्या कलम ३ आणि ४ मध्ये याचा उल्लेख आढळतो. कोणत्याही राज्याचे नांव बदलण्याची प्रक्रिया संसदेतील किंवा राज्याच्या विधानसभेत सुरु होते. त्याशिवाय ही प्रक्रिया सुरु होतच नाही.
मग ते विधेयक संसदेत आणले जाते. ते विधेयक संसदेत आणताना राष्ट्रपतीनी मंजुरी देणे आवश्यक असते. संमती देण्यापूर्वी राष्ट्रपती त्या राज्याच्या विधानसभेत एका ठराविक मुदतीत मत देण्यास सांगतात.मात्र ते मत मानलेच पाहिजे अशी सक्ती राष्ट्रपती किंवा संसदेतील सदस्यांवर करता येत नाही. मग हे नाव बदलायचे विधेयक लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदनात मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवले जाते. राष्ट्रपतींनी त्या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर त्या राज्याचे नाव कागदोपत्री बदलण्यात येत.
–
ज्या नावावरून इतका गदारोळ सुरू आहे ते ‘औरंगाबाद’ नाव कसं पडलं ? वाचा!
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग महाराष्ट्रासाठी एक महत्त्वकांक्षी प्रकल्प का आहे, जाणून घ्या!
–
नामांतराचा जनजीवनावर परिणाम होतो का?
होय… सगळ्यात जास्त झळ बसते ती सामान्य लोकांनाच. त्यांच्यावरच नामांतराचा थेट परिणाम होतो. बँक, कार्यालये,रेल्वे स्टेशन, बस स्थानके,शाळा कॉलेज या सर्वांना आपल्या कागदपत्रावर, नामफलकावर, तसेच पत्त्यांवर हे नावे नांव लिहावे लागते. स्टेशनरी त्या नावाने बनवून घ्यावी लागते.
संस्थांशी संबंधीत वेबसाईटवर पण नवे नांव घ्यावं लागतं. त्या अनुषंगाने त्यातही बदल करावा लागतो. अगदी आपले छोटे छोटे दस्तावेज पण लोकांना बदलावे लागतात. नामांताराची प्रक्रिया अंमलात आणणे हे भयंकर कटकटीने भरलेले असते.
शेवटी नावात काय आहे असे शेक्सपिअर म्हणून गेला आहे पण तरीही नावातच सर्व काही आहे हे पण लोक ठोकून सांगतात. सिद्धही करतात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.