' कुठे फिरायला गेलात, तर “या” सर्व ठिकाणी अगदी मोफत राहू, खाऊ-पिऊ शकता…! – InMarathi

कुठे फिरायला गेलात, तर “या” सर्व ठिकाणी अगदी मोफत राहू, खाऊ-पिऊ शकता…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘मैं दौंडना चाहता हूं नैना, उडना चाहता हूं, गिरना भी चाहता हूँ, बस्स, रुकना नही चाहता’ ये जवानी है दिवानी या चित्रपटातील डायलॉग सगळ्यांचाच लाडका आहे. या चित्रपटातल्या बनीसारखं वेगवेगळे देश फिरण्याचं, बॅग भरो और निकल पडो असं वागण्याचं अनेकांचं स्वप्न असतं.

कोणताही ट्रॅव्हलिंगवर आधारित चित्रपट बघितला,की फिरण्याची आवड असलेल्या लोकांमध्ये एक वेगळीच ऊर्जा संचारते आणि मग कुठे कुठे फिरायला जायचं याचे प्लॅन्स सुरु होतात. यासगळ्यात दोन गोष्टी आड येतात, त्या म्हणजे ऑफिसची सुट्टी आणि फिरण्याचा खर्च. एकवेळ ऑफिसमधून सुट्टी मिळेलही, पण खर्चाचा प्रश्न कायमच सगळ्यांना सतावत असतो.

पण आता अजिबात टेन्शन घेऊ नका. या लेखात आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांची माहिती देणार आहोत जिथे तुम्ही फुकटात राहू शकता आणि तुमच्या जेवणाची सोयही एकही पैसा न देता होईल. बघूया, अशी कोणती ठिकाणं आहेत

भारत हेरिटेज सर्व्हिसेस

 

yoga im

 

ऋषीकेश जावं ही इच्छा प्रत्येकाच्याच मनात असते. उत्तराखंडात फिरायला गेलात, तर ऋषीकेशला निदान २-३ दिवस तरी आपण राहतोच, तिथे बरेच कॅफेज आहेत, देवस्थानं आहेत जिकडे तुम्ही जाऊ शकता, पण तुम्हाला एकही पैसा न घालवता राहायचं असेल, तर भारत हेरिटेज सर्व्हिसेसमध्ये तुम्ही जाऊ शकता.

इथे राहण्याची आणि जेवणाची सोय अतिथींकडून एकही पैसा न घेता केली जाते.

श्री रामनाश्रमम, तिरुवन्नामलई

 

ramnashram im

 

दक्षिण भारतात फिरण्यासारखं खूप काही आहे, आणि इथल्या जेवणासाठी अनेकजणं दक्षिण भारतात फिरण्यासाठी जातात. तमिळनाडूत भारतीय पर्यटक तर असतातच, पण विदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणात असतात. जर तुम्ही तिरुवन्नामलईला जाण्याचा विचार करत असाल, तर श्री रामनाश्रामम मध्ये नक्कीच राहू शकता.

इथे राहणाऱ्यांकडून एकही रुपया घेतला जात नाही. इथे एक मंदिर आहे, जे खूप प्रसिद्ध आहे. इथे राहायला जाणार असाल, तर तुम्हाला आधी तसं सांगावं लागेल.

परमार्थ निकेतन

 

parmarth niketan im

 

याठिकाणी सुद्धा तुम्ही मोफत जेऊ शकता आणि राहू शकता. हा आश्रम सुद्धा ऋषीकेशमध्येच आहे. इथलं वैशिष्ट्य असं, की इथे योगप्रेमी मोठ्या प्रमाणात येतात. तुम्हाला योग शिकायची इच्छा असेल, तर तुम्ही इथले क्लासेस जॉईन करू शकता. हे क्लासेस देखील विनामूल्य असतात.

तुम्हाला पैसे न देता राहण्याचं दडपण येत असेल, तर तुम्ही इथे काही समाजसेवादेखील करू शकता. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं, झाडांना पाणी घालणं, अशी कामं तुम्ही नक्कीच करू शकता.

गुरुद्वारा मणिकरण साहिब

 

manikaran im

 

हिमाचलला गेल्यानंतर बरेचजण सिमला- मनाली या ठिकाणांना भेट देतात. मनालीच्या जवळच मणिकरण नावाचं एक ठिकाण आहे. इथलं वैशिष्ट्य म्हणजे, बाजूला थंड- बर्फाचं पाणी वाहून नेणारी नदी तर गुरुद्वारा जवळ उकळत्या पाण्याचे झरे. या झऱ्यांमधील गरम पाण्याचा वापर करून इथे अन्न शिजवलं जातं.

इथे सकाळ – संध्याकाळ लंगरची सोय असते आणि इथे राहण्यासाठी तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.

याव्यतिरिक्त भारतात अनेक ठिकाणी धर्मशाळा आहेत, जिथे कमी पैशात तुम्ही राहू शकता.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?