चमत्कार की विज्ञान? या मंदिरातील ७ किलोची मूर्ती पाण्यावर तरंगून देते विशेष संकेत!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारत हा जसा इतिहासाचा देश आहे, मिथकांचा देश आहे, कथा-कहाण्यांचा देश आहे तसाच तो चमत्कारांचा देश आहे. मग ते चमत्कार दंतकथेतील असो की एखाद्या ठिकाणचे भौगोलिक माहात्म्य असो ती प्रत्येक गोष्ट एकमेवाद्वितीय असते.
जसा चमत्कारांचा तसाच तो अद्भुत मंदिरांचा देश आहे. अशी अनेक चमत्कारी आणि अनोखी मंदिरे आपल्याला भारतात अनेक ठिकाणी पाहावयास मिळतात. या मंदिरांमध्ये घडणार्या अनोख्या घटनानमागील गूढ आजही विज्ञानाला सोडवता आलेले नाही.
या मंदिरांसोबत जोडल्या गेलेल्या काही कहाण्या, दंतकथा देखील असतात त्यामध्ये धार्मिक आस्था जोडल्या गेलेल्या असतात. अशीच एक कथा आहे मध्यप्रदेश मधील देवास पासून ४५ किलोमीटरवर असलेल्या हातपिंपळी गावाची आणि तिथे असलेल्या नृसिंह मूर्तीची.
काय आहे ही कहाणी? आस्था की काही वैज्ञानिक चमत्कार? चला जाणून घेऊ.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
दरवर्षी मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यापासून ४५ किमी अंतरावर असलेल्या हातपिपल्या गावातील नृसिंह मंदिरातील मूर्ती केवळ भामरी नदीत तरंगते.
भाद्रपद महिन्यातील एकादशीला हा चमत्कार पहाण्यासाठी अनेक भाविक लाखोंच्या संख्येने गर्दी करतात. एकादशीच्या दिवशी विधिवत प्रार्थना करून ही मूर्ती नदीत सोडली जाते.
तेथील एक स्थानिक रहिवासी सोहनलाल सुतार आपला अनुभव सांगताना म्हणाले, की गेल्या २०-२५ वर्षांपासून आपण भगवान नृसिंह मूर्तीच्या पोहण्याचा चमत्कार पाहत असून या मूर्तीवर गावकऱ्यांचा अतूट विश्वास आहे.
मंदिराच्या आणखी एका पुजाऱ्याने सांगितले, की देवाचा हा चमत्कार आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे आणि आम्ही मंदिराचे पुजारी पाण्यात पोहण्यासाठी ती मूर्ती खाली उतरवतो. त्या वेळी लाखोंची गर्दी असते.
वास्तविक, मूर्ती तरंगवण्यामागे एक श्रद्धा आहे. त्यानुसार देवाच्या मूर्तीला तीनदा पाण्यात सोडून येत्या वर्षभरातील समृद्धीचा अंदाज लावला जातो.
ज्येष्ठांच्या मते, भगवान नरसिंहाच्या या दगडी मूर्तीचा इतिहास सुमारे ११५ वर्षांचा आहे. सन १९०२ पासून दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजेच डोल ग्यारस या दिवशी भगवान नृसिंहाची मूर्ती तरंगवण्याची परंपरा आहे.
नृसिंह पर्वताच्या चार धामांची यात्रा केल्यानंतर बागली संस्थानातील पंडित बिहारीदास वैष्णव यांनी पिपळ्या गढीमध्ये या मूर्तिची प्रतिष्ठापना केली असे सांगितले जाते.
हातपिपल्यातील स्थानिक मंदिरापासून ढोल-ताशांच्या गजरात दुपारी ४ वाजल्यापासून मंदिरातील नृसिंहाची मूर्ती घेऊन मिरवणूक निघते. या दिवशी, संपूर्ण शहरातील प्रत्येक घरात लवंगाचा प्रसाद वाटला जातो आणि तेथील स्थानिक रहिवाशांचा सन्मान केला जातो.
याप्रसंगी या पुतळ्याला हार घालण्यासाठी बोली लावली जाते. या दिवशी महिला या नृसिंह मूर्तिची पूजा करतात. सायंकाळी ही मिरवणूक नृसिंह घाटावर पोहोचते. नृसिंह घाटावर डोल स्नान केले जाते. त्यानंतर पाण्याची पूजा केली जाते.
त्यानंतर मुख्य पुजारी गोपालदास वैष्णव, रमेशदास, विष्णुदास वैष्णव जाळी टाकून पाण्याचा प्रवाह पाहतात. कारण मूर्ती एका मर्यादेपर्यंत तरंगल्यानंतर ती बुडू लागली तर जाळीने तिचे संरक्षण केले जावे असा त्यामागे उद्देश असतो.
त्यानंतर साडेसात किलो वजनाची ही मूर्ती नृसिंह मंदिराचे पुजारी मंत्रोच्चार करून नदीत सोडतात. हे सर्व दृश्य पाहून भाविक जयजयकार करतात. मूर्ती फक्त तीन वेळा पाण्यात सोडली जाते. गेल्या वर्षी मूर्ती दोनदा तरंगली होती.
याविषयी एक कथा देखील प्रचलित आहे, अनेक वर्षांपूर्वी तत्कालीन होळकर महाराजांच्या सांगण्यावरून मूर्ती चौथ्यांदा पाण्यात सोडली असता ही मूर्ती पाण्यात गायब झाली. तेव्हा मंदिराच्या पुजाऱ्याला स्वप्न पडले, की नदीत ठिकाणी पाण्यात ती मूर्ती आहे. खूप प्रयत्नांनंतर त्यांना मूर्ती मिळाली.
असे अनेक चमत्कार या मूर्तीशी जोडलेले आहेत. नदीवरील या विधीनंतर रात्री तीनच्या सुमारास ही मूर्ती पुन्हा नृसिंह मंदिरात आणली जाते.
मंदिरात स्थापित नृसिंहाची मूर्ती नरसिंह पर्वतावरून आणण्यात आली आहे. यापूर्वी ही मूर्ती नरसिंह गढी येथील खेडापती मंदिरात बसवण्यात आली होती, मात्र गेल्या ८५ वर्षांपासून या मूर्तीसाठी वेगळे मंदिर बांधून नरसिंह मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.
उन्हाळ्यात नदीतील पाणी पूर्णपणे आटले तरी डोल ग्यारस येण्यापूर्वीच पावसामुळे नदीत पुन्हा पाणी भरते, अशी येथील लोकांची धारणा आहे. पुतळा ज्यादिवशी तरंगतो त्या दिवशी नदीत पाणी नव्हते असे आत्तापर्यंत कधीच घडलेले नाही.
—
- ११ व्या शतकापासून उभं असलेलं हे मंदिर अजूनही भल्याभल्या इंजिनियर्ससाठी एक कोडंच आहे!
- डच लुटारु, त्सुनामीवर मात करत अनेक शतकांपासून उभे असलेले कार्तिकेय मंदिर!
—
विचार करण्याची ही गोष्ट आहे की शेवटी, पुतळा तरंगण्यामागचे कारण काय असू शकते… ज्या दगडातून मूर्ती बनवली आहे त्या दगडाचा गुणधर्म की खरोखर दैवी चमत्कार?
प्रभू रामाने पाण्यावर तरंगणारे विशिष्ट गुणधर्मांचे दगड वापरुन लंकेपर्यंत जाणारा पूल बांधला होता, अशी मान्यता आहे. ही नरसिंह मूर्ती त्याच गुणधर्माची असावी का? हे मूर्तीविज्ञान अभ्यासकच सांगू शकतील. कारण काही असो पण जिथे परमेश्वरावरील आस्था आणि श्रद्धा असते तिथे चमत्कार होतातच नाही का?
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.