नळातून संथ गतीने पाणी येतंय? प्लंबर शिवाय ही समस्या दुरुस्त करता येईल
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
पूर्ण फोर्सने सुरुवातीला नळाला येणारं पाणी एक दिवस अचानक कमी फोर्सने यायला लागतं आणि पाईप लाईन किंवा नळाच्या वायसरची काही समस्या झालीये की काय अशी शंका लगेच आपल्या मनात येते.
विशेषतः जर हे सकाळी घडलं तर चांगलीच धांदल उडते. पुढल्या संबंध दिवसाचे विचार डोक्यात ठेवून सकाळी घाईगडबडीत कराव्या लागणाऱ्या कामांपैकी एक काम म्हणजे पाणी भरणं! त्यावेळेसही पाण्याला म्हणावा तसा फ्लो नसेल तर भराभर पाणी भरून होत नाही आणि कधीकधी पाणी भरून व्हायच्या आधीच जातं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
पण नळातून संथ गतीने पाणी येण्यामागे वॉटर पाईप खराब झाला असणं किंवा पाण्याच्या लाईनमध्ये बिघाड झालेला असणं, नळाचा वायसर खराब झालेला असणं अशा मोठ्या समस्याच असतील असं नाही.
आपण नीट लक्ष दिलं तर बऱ्याचदा ज्या नळातून संथ गतीने पाणी येत असतं त्याचा पाईप वरून खराब झालेला असतो. त्यावर डाग पडलेले असतात. त्यामुळे तुमच्या घराच्या नळांमधून पाणी संथ गतीने येत असेल तर लगेच प्लंबरला बोलवायची गरज नाही.
काही सोप्या घरगुती उपायांनीही तुमचा नळ दुरुस्त होऊन पाणी पुन्हा फोर्सने वाहू शकतं. ते झालं नाही तर अर्थात प्लंबरला बोलवावंच. पण पुढच्या वेळी तुमच्या घरातल्या नळाला जेव्हा संथ गतीने पाणी येईल तेव्हा आधी हे घरगुती उपाय ट्राय करून बघा.
१. नळाला खाली असणारी जाळी साफ करा
नळाच्या खालच्या भागातून जिथून पाणी येतं ती जाळी (नोझल) साफ करता येण्यासाठी नळाला खाली फिरकी असते. जेव्हा नळातून संथ गतीने पाणी येतं तेव्हा ती फिरकी उघडा आणि नळाच्या त्या जाळीवर काही घाण साचलीये का बघा.
घाण साचली असेल तर पाण्याने ती जाळी व्यवस्थित धुवून घ्या आणि पुन्हा नळाला लावा. त्यानंतर जर फोर्सने पाणी आलं तर ते आधी ती जाळी आतून खराब झाल्यामुळे येत नव्हतं हे लक्षात घ्या.
२. वरून खराब झालेला नळ स्वच्छ करा
साधारणपणे बाथरूममधल्या नळातून पाणी संथ गतीने येत असेल तर नळ स्वच्छ आहे की खराब झालाय याकडे लक्ष द्या. कधीकधी नळाभोवती, पाईपभोवती घाणीचा थर तयार झालेला असतो.
बऱ्याचदा आपण आपले जे अस्वस्च्छ हात नळाला लावलेले असतात, त्यानंतर साबणाचे हात लावलेले असतात त्याची घाण नळामध्ये जमा होते. तुमच्या घरचं पाणी जर खारट असेल तर त्यामुळे नळामध्ये पांढरे डाग तयार होऊ शकतात. अशा प्रकारच्या समस्येला ‘लिमस्केल बिल्डअप’ असं म्हणतात.
या सगळ्या कारणामुळे नळातून संथ गतीने पाणी येऊ शकतं. लिंबाची साल, बेकिंग सोडा, हार्पिक, व्हिनेगर यांपैकी कशानेही तुम्ही तुमचे खराब झालेले नळ स्वच्छ करू शकता.
३. मिठाच्या पाण्याचे डाग स्वच्छ करा
तुमच्या नळावर जर मिठाचे डाग पडले असतील तर बेकिंग सोडा आणि व्हिनेगर एकत्र करून त्यावर ते मिश्रण लावा किंवा स्प्रे मारा. मग २० मिनिटं ते तसंच राहू द्या आणि त्यानंतर कोमट पाण्याने नळावरचे ते खाऱ्या पाण्याचे डाग स्वच्छ करा.
४. गंजाचे डाग स्वच्छ करा
नळ जर गंजला असेल तर त्यामुळेही नळातून पाणी येऊ शकत नाही किंवा संथ गतीने येतं. असं पाणी दूषित झालं असेल तर आपल्यासाठीही ते योग्य नसतं. गंज चढल्यामुळे नळ दिसताना वाईट दिसतोच पण तेवढं एकच कारण नसल्यामुळे ही गोष्ट अजिबात दुर्लक्ष करण्यासाठी नाही.
त्यामुळे नळाला गंज चढला असेल तर वेळच्यावेळी नळावरचे गंजाचे डाग स्वच्छ करावेत. त्यासाठी समप्रमाणात बेकिंग सोडा आणि व्हाईट व्हिनेगर घ्या आणि ते मिश्रण जिथे जिथे गंजाचे डाग असतील तिथे लावा.
घरातल्या एखाद्या जुन्या टूथब्रशवरही ही पेस्ट घेऊन ती नळाच्या नोझलमध्ये लावा आणि तिथे स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. हे १० मिनिटं असंच राहू द्या. मग कापड आणि पाण्याने नळ साफ करा. गंजाचे डाग उरणार नाहीत.
नळ जर फक्त खराब झाले असतील तर असे साधेसोपे घरगुती उपाय करून ते नक्कीच स्वच्छ करता येऊ शकतात. पुन्हा फ्लोने पाणी सुरू होऊ शकतं. त्यामुळे पुढच्या वेळी नळातून संथ गतीने पाणी येऊ लागल्यावर लगेचच प्लंबरला बोलवायची घाई करण्याआधी हे लक्षात घ्या आणि तुमचा अनावश्यक खर्चही टाळा.
—
- महागड्या क्लीनर्स शिवाय घरातल्या घरात उत्कृष्ट स्वच्छता ठेवण्याच्या ८ टिप्स जाणून घ्या
- स्वयंपाकघरात एकाच वेळी अनेक कामं करताना ऊर्जा आणि वेळ वाचवण्याच्या स्मार्ट टिप्स वाचाच
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.