' “काहीही केलं तरी ढेरी कमीच होत नाही!” ही आहेत अदृश्य कारणं! – InMarathi

“काहीही केलं तरी ढेरी कमीच होत नाही!” ही आहेत अदृश्य कारणं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मित्रांनो, ‘MEN WILL BE MEN’ ही टॅगलाइन असलेली एक जाहिरात खूपच प्रसिद्ध आहे. लिफ्टमध्ये आधीच उभे असलेल्यांमध्ये ‘ती’ येते आणि मग तिला सौजन्य दाखवून जागा करून देताना बाकीचे सगळे ‘पुरुष’ आपले श्वास रोखून ती जाईपर्यंत आपले वाढलेले पोट आत घेऊन उभे राहण्याचा प्रयत्न करतात.

जाताना ती मागे वळून बघते आणि मंद स्मित करून निघून जाते…कारण या पुरुषांनी निश्वास सोडलेला असतो आणि त्यांचे पोट बाहेर डोकावत असते. लगेच टॅगलाईन येते,’MEN WILL BE MEN” जाहिरात संपते.

 

men will be men IM

 

मित्रांनो आपले सुटलेले पोट आपले सुखवास्तूपण कितीही दाखवत असले तरी आजकालच्या ट्रेंडिंग फॅशन नुसार ‘आऊटडेटेड’ तर आहेच पण तुमचे तुमच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष दर्शवणारे आहे. सुटलेले पोट तुमच्या व्यक्तिमत्वाचे तीन तेरा वाजवते. अशावेळी नक्कीच तुम्ही निराश होता आणि पोट कमी करण्याच्या अगदी हात धूऊन मागे लगता.

मित्रांनो हे मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढणारे पोट हळूहळू तुमची तहानभूक,तुमची झोप सगळे काही तुमच्यापासून हिरावून घेते याचीही काही गंभीर कारणे आहेत याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नाही ना? मग आमच्यासोबत जाणून घ्या ही कारणं जी तुमची ढेरी वाढण्यासाठी कारणीभूत आहेत.

१. चुकीचा आहार :

 

junk food IM

 

आपल्या आरोग्याला पूरक असा आहार न घेता जर तुम्ही जंकफूड जास्त खात असाल तर ते तुमच्या पोटाची चरबी वाढण्याचे मुख्य कारण होऊ शकते. आपल्या कॅलरीजचे सेवन कमी करण्याच्या प्रयत्नात, आपण आपल्या आहारातून आवश्यक सूक्ष्म आणि मॅक्रोन्युट्रिएंट्स देखील काढून टाकण्याची शक्यता आहे.

कमी खाण्यामुळे शरीरातील ऊर्जा योग्य प्रमाणात वापरली जात नाही आणि ती पोटाच्या बाजूने साठू लागते, पर्यायाने पोटाचा आकार वाढतो. अति तेलकट, तिखट, खारवलेले पदार्थ खाणे, जेवणाच्या वेळा न पाळणे यामुळे होणारे मंद पचन देखील पोटाची चरबी वाढवते.

२. तणाव :

 

stress IM 2

 

आजकालच्या धावपळीच्या आणि घड्याळाच्या तालावर नाचणार्‍या जीवन शैलीमुळे एकूणच आपल्या मानसिक तणावात वाढ झाली आहे. तणावामुळे तुमच्या शरीरात कॉर्टिसोल हार्मोनचा स्राव होतो.

२०१२ मध्ये केलेल्या अभ्यासानुसार, हा संप्रेरक तुमची चयापचय क्रिया कमी करू शकतो, अशा प्रकारे, तुम्ही तुमच्या वास्तविक क्षमतेपेक्षा कमी कॅलरी बर्न करता आणि स्वत:ला लठ्ठपणाकडे नेता.

३. अति मद्यपान :

 

alcoholism IM

 

जर्नल करंट ओबेसिटी रिपोर्ट्समध्ये प्रकाशित झालेल्या एका सर्वेनुसार वजन आणि पोटाचा घेर वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे तुम्ही अतिप्रमाणात करत असलेले मद्यपान आणि स्मोकिंग. तुम्ही तुमच्या मद्यपानावर आणि स्मोकिंगवर नियंत्रण ठेवले नाही तर ते नक्कीच तुमच्या पोटाचा आकार वाढवू शकते.

४. आनुवंशिकता :

 

heridiatery IM

 

कधी कधी लठ्ठपणा तुम्हाला तुमच्या आई-वडिलांकडून देखील गुणसूत्रांच्या रूपात मिळू शकतो. ज्यामुळे तुम्ही तुमचे रुटीन थोडे जरी बदलले तरी तुमची जाडी वाढू शकते. तेव्हा या कारणावर मात करण्यासाठी तुमचा आहार आणि सवयींवर तुम्हाला खूपसारे नियंत्रण ठेवावे लागते.

५. अपुरी झोप आणि जागरण :

 

sleepless IM

 

जर तुम्हाला कोणत्याही कारणाने जागरण करावे लागत असेल आणि त्यामुळे तुमची झोप पुरेशी किंवा पूर्ण होत नसेल तर ते तुमच्या पाटाचा घेर वाढण्याचे आणखी एक कारण होऊ शकते.

याचा तुमच्या पचन संस्थेवर परिणाम होऊन चरबी साठण्याचा दर जास्त असतो. तेव्हा जागरण जितके जास्त तेवढा पोटाचा आकार वाढण्याचे प्रमाण जास्त हे लक्षात असू द्या.

६. व्यायामाचा अभाव :

 

actress workout inmarathi

 

बैठ्या जीवन शैलीमुळे किंवा कामाच्या बैठ्या स्वरूपामुळे आजकाल व्यायाम न करण्याकडे सर्वांचा कल वाढला आहे आणि याचा परिणाम निश्चितच तुमच्या शरीरावर होतो आहे. यामुळे देखील पोटाचा आकार वाढत आहे. कामाच्या व्यापामुळे टाळला जाणारा व्यायाम लठ्ठपणाला आमंत्रण देतो.

७. चुकीची व्यायाम पद्धती :

 

workout wrong IM

 

चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या वेळी केलेला व्यायाम तुमच्या शरीराचा आकार बेढब करू शकतो आणि तुमचे वजनही वाढवू शकतो. आणि हे खरे आहे. तेव्हा व्यायामातील सातत्य न राखणे आणि व्यायामासाठी चुकीची वेळ निवडणे यामुळे तुम्ही गमावलेले वजन पुन्हा दुप्पटीने पूट ऑन करू शकता.

८. स्पोर्ट्स आणि एनर्जी ड्रिंक्सचे अतिसेवन :

 

enegry drink IM

 

तुमचा फ्रीज जर सॉफ्ट ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्सनी भरलेला असेल तर वेळीच सावध व्हा. कारण या प्रकारच्या पेय किंवा सरबतामध्ये असलेली अतिरिक्त साखर तुमच्या पोटाभोवतीची चरबी वाढवू शकते.

९. पाणी कमी पिणे :

 

drinking water IM

 

ठराविक अंतराने पाणी पिण्यामुळे तुमचे वजन आटोक्यात यायला मदत होते,पण जर तुम्ही पाणी कमी प्रमाणात पित असाल तर तुमचे वजन कमी होणार नाही. पाणी कमी प्रमाणात प्यायले जाणे हे देखील एक महत्वाचे कारण आहे ज्यामुळे तुमच्या पोटाचा घेर वाढतो.

याखेरीज सतत खात राहणे, एका जागी बसून राहणे, सततचे नकारार्थी विचार करणे, बाळंतपणानंतर (स्त्रियांमध्ये) व मेनोपॉज नंतर येणारे हार्मोनल चेंज, थायरोईड सारख्या समस्या, अपचन यांमुळे देखील तुमच्या पोटाचा घेर वधू शकतो.

तेव्हा मित्रांनो काही केले तरी तुमची ढेरी का कमी होत नाही याची ही काही छोटी पण महत्वाची कारणे होती. तेव्हा यावर उपाय शोधून स्वस्थ व निरामय आयुष्य जगाने तुमच्याच हातात आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

महत्वाची सूचना : सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?