' पृथ्वीराज सिनेमा फ्लॉप होण्यामागे या ५ चूका तर नाहीत ना? – InMarathi

पृथ्वीराज सिनेमा फ्लॉप होण्यामागे या ५ चूका तर नाहीत ना?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अलिकडेच अक्षय कुमारचा बहुचर्चित पृथ्विराज चौहान प्रदर्शित झाला आणि पब्लिकनं त्याकडे नुसती पाठच फिरवली नाही, तर अक्षय कुमारच्या चुकांचं माप त्याच्या खात्यात जमा करुन ‘पब्लिक को येडा बनाना अब आसान नहीं है’ दाखवून दिलं आहे. अशा कोणत्या चुका अक्षयनं केल्या ज्यामुळे पब्लिकनं त्याचा हा चित्रपट ट्रोल केला?

अक्षय कुमार हा कालपर्यंत हुकुमाचा एक्का मानला जात होता. मात्र कोविडनं जगाची उलथापालथ करुन टाकली त्यात अडकलेलं बॉलिवुड अजूनही गोते खात आहे. कोविड काळात पब्लिकनं मनोरंजनाची गणितंच बदलून टाकली आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

एकीकडे साऊथचे सिनेमे तिकिट खिडकीवर धो धो गल्ला जमवत आहेत तर दुसरीकडे कश्मिर फाईल्ससारखा सिनेमा बाजी मारुन जात आहे मात्र पब्लिकनं डोक्यावर घेऊन डीजे लावलेले नागराज आणि अक्षय सारखे हुकुमी एन्टरटेनर्स पब्लिकनं साफ नाकारले आहेत.

 

samrat im

 

बॉलिवूडचा सगळ्यात मोठा फ्लॉप म्हणून याची नोंद झालेली आहे. कलाकारांचं खाजगी आयुष्य, त्यात ते करत असलेली वक्तव्यं, वर्तन हे जसं चित्रपट हिट करायला मदत करत तसंच ते फ्लॉपचंही कारण ठरतं.

चित्रपट आणि क्रिकेट या दोन्ही गोष्टींच्या बाबतीत भारतीय पब्लिक एकदम इमोशनल आहे. अक्षयनं या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी काही विवादास्पद विधानं केली, त्याचा परिणामही या चित्रपटावर झाल्याच्या चर्चा आहेत. याशिवाय चित्रपट फसत गेल्याची कोणती कारणं आहेत ते पाहू.

फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इम्प्रेशन

असं म्हणतात की, तुमचं पहिलं इम्प्रेशन खूप महत्वाचं असतं. या चित्रपटाचा फ़र्स्ट लूक प्रदर्शित झाला तोच पब्लिकनं ट्रोल केला.

 

prithviraj im

 

पृथ्वीराज सारखा चित्रपट फारच हलक्यात घेतल्याचं पब्लिकचं मत होतं. अक्षयच्या दिसण्यापासून सगळंच अगदी सामान्य होतं. अनेकांनी तर हाऊसफूलमधल्या बालाच्या लूकशी अक्षयची तुलना करत नापसंती व्यक्त केली.

स्टोरी किधर है?

हा चित्रपट भारतातील एक महान योध्दा म्हणून परिचित पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारीत असताना प्रेक्षकांना एक ऐतिहासिक युध्दपट याखेरीज वेगळं काहीच बघायला मिळत नाही.

सामान्यांना माहित आहे त्याव्यतिरिक्त या चित्रपट दुसरं काहीही सांगत नाही. प्रेमकथेची पार्श्वभुमी असणारे असे भव्य युध्दपट यापूर्वीही जोधा अकबर, बाजीराव मस्तानी यांच्या रुपात प्रेक्षकांनी पाहिलेले आहेत त्यामुळे, तीच वेषभूषा, तोच खर्चिक लूक सगळंच शिळं वाटलं तर आश्चर्य नाही.

 

prithviraj film im

 

प्रमोशनला बगल

या चित्रपटाचं प्रमोशनही या चित्रपटाच्या निर्मिती संस्थेच्या लौकिकाला साजेसं नव्हतं. असं वाटलं की निर्मात्यांनाच फ्लॉपचा अंदाज आल्यानं त्यांनी प्रदर्शनापूर्वीच हत्यारं टाकली.

अक्षयची वक्तव्यं

या चित्रपटाला प्रपोगंडा चित्रपट म्हणून वाळीत टाकल्याच्याही चर्चा आहेत. समिक्षकांच्या मते हा चित्रपट देशात भाजप सरकार सत्तेवर असल्या कारणानं भारतातील मुस्लिम अल्पसंख्यांकांना “बाहेरचे” आणि “क्रूर आक्रमणकर्ते” म्हणून रंगविण्यासाठी बनविलेल्या चित्रपटांच्या यादीत नविन भर आहे.

काही पुरोगामी विचारवंतांच्यामते पृथ्वीराजचा लढा मुघलांशी कधीच नव्हता तर, आपल्या प्रदेशाच्या संरक्षणासाठी तो लढला.

एकीकडे अक्षय कुमारनं विधान केलं की सध्याच्या शालेय इतिहासात हिंदू राज्यकर्त्यांविषयी पुरेशी माहिती नसून सर्व इतिहास मुघल राज्यकर्त्यांच्या माहितीनं भरलेला आहे आणि म्हणूनच या पार्श्वभूमी॒वर पृथ्वीराज सारखा चित्रपट महत्वाचा ठरतो.

ट्विंकलही वादग्रस्त

तर दुसरीकडे त्याची पत्नी ट्विंकल जी तिच्या बेधडक बोलण्याबाबत तसेच डावीकडे झुकलेल्या विचासरणीबाबत परिचित आहे, तिचं अलिकडचं एक विधान अक्षयला अडचणीत आणणारं ठरलं आहे. तसेच अलिकडे भारतीय प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेल्या कश्मिर फाईल्स या चित्रपटाची थट्टा उडवून तिनं हिंदुत्ववादी प्रेक्षकांचा रोष ओढवून घेतला आहे.

अशा रितीनं पती पत्नी दोघांनी मिळून समाजातील दोन्ही बाजूंना दुखावल्यानं या दोन्ही गटांनी पृथ्वीराज चित्रपटाला फ्लॉपचा रस्ता दाखवला.

 

akshay kumar im

 

खरं तर नव्वदच्या दशकातल्या अमिर, सलमान, ह्रतिक, अजय, शाहरुख अशा फळीतल्या अक्षय कुमारनं सातत्यानं अनेक हिट चित्रपट दिलेले आहेत. अक्षयच्या चित्रपटात गुंतवणूक म्हणजे परताव्याची हमी समजली जाते.

बाकीचे अभिनेते वर्षातून एखाद दुसरा चित्रपट करतात मात्र अक्षय कुमार वयाची पन्नाशी पार करुनही आजही पूर्वीइतकाच जोशात काम करतो. विनोदीपट, ॲक्शनपट, प्रेमकथा, सामाजिकपट कोणत्याही प्रकारच्या चित्रपटात तो कायमच प्रेक्षकांनी स्विकारला आहे. त्याच्या इतक्या विविध जॉनर मधील भूमिका क्वचितच कोणा अभिनेत्यानं केल्या असतील,

मात्र कोविड काळानंतर अक्षयला सातत्यानं अपयशाचा सामना करावा लागत आहे आणि प्रेक्षकांनी त्यांच्या लाडक्या अभिनेत्याकडे पाठ फ़िरविली आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?