एकीकडे प्रेषितांवरून मुस्लिम राष्ट्र एकत्र मात्र दुसरीकडे पाकिस्तानात हिंदू मंदिरावर हल्ला
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
धर्म, प्रांत, देश या बाबी इतक्या टोकदार झाल्या आहेत की कुणाच्या भावना कधी कशा दुखावल्या जातील… कोण ट्रोल होईल या कशाचाही अंदाज येणे तसे आता अवघड होऊन बसले आहे. जातीपातीच्या भिंती ढासळत आहेत असे म्हणत असतानाच सोशल मिडीयावर जर नजर टाकली तर जातीयवादाचे विखार जागोजागी दिसतात. नुकतंच भारतातील नुपूर शर्मा प्रकरण बघितलं तर त्याची प्रचिती आलेलीच आहे.
प्रसार माध्यमे कोणतंही वक्तव्य आगीसारखं पसरवतात. आणि त्याचं रुपांतर वणव्यात होऊन गंभीर पडसाद उठतात. नुपूर शर्मांच्या एका वक्तव्यावर सारी मुस्लीम आणि आखाती राष्ट्रे एक होऊन भारताचा निषेध करत होती. भारतीय उत्पादनांवर बंदी घाला अशी मागणी जोर धरत होती. नुपूर शर्मा यांना पदच्युत केलं गेलं.
प्रेषित महम्मद यांच्यावर आक्षेपार्ह विधाने केली म्हणून हे सारे एक झाले होते. पण आता पाकिस्तानातील हिंदूंच्या मंदिरावर हल्ला केला गेला, मूर्तींची तोडफोड झाली आणि अजूनही पोलिसांनी त्यावर काहीही कारवाई केलेलं नाही. सामान्य माणसाला एकच प्रश्न पडतो, यावेळी कुठे जाते सहिष्णुता? एकात्मता?
भारत पाकिस्तान फाळणीनंतर जे हिंदू पाकिस्तानात राहिले ते तिकडचे अल्पसंख्याक हिंदू आहेत. त्यांना वारंवार अशा गोष्टींना तोंड द्यावे लागते. सिंध प्रांतातील कराचीमधील बंदरागाह भागात कोरंगी नं. ५ येथील श्री मारी माता मंदिरावर बुधवारी कट्टरपंथीय लोकांनी रात्री हल्ला चढवला. मोटरसायकलवरून आलेले सहा ते आठ लोक या हल्ल्यातील संशयित आहेत.
आधी त्यांनी पुजाऱ्याच्या घरावर हल्ला केला. मग मंदिरातील मूर्तींची तोडफोड केली. आणि ते फरारी झाले. या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी काही दिवसापूर्वीच पुजाऱ्याने त्या मूर्ती आणल्या होत्या. मंदिराचे बांधकाम पण सुरु होते. ही घटना घडल्यानंतर पोलिस आले, त्यांनी झालेल्या घटनेची माहिती घेतली. आणि अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
या घटनेने पाकिस्तानातील कराचीमध्ये राहणारा हिंदू जनसमुदाय भीतीच्या छायेत आहे. कारण पाकिस्तानात नेहमीच अल्पसंख्यांक हिंदू मंदिरावर सारखेच हल्ले केले जातात. पाकिस्तानात जवळपास ७५ लाख हिंदू राहतात असं आकडेवारी सांगते. तर तेथे राहणाऱ्या हिंदूंच्या मते ही संख्या ९० लाखाहून अधिक आहे. आणि त्यातील बहुतांश हिंदू सिंध प्रांतात राहतात आणि त्यांना कट्टरपंथी लोक नेहमी त्रास देत असतात.
मध्यंतरी ऑक्टोबर महिन्यात कोटरी या सिंध प्रांतातील सिंधू नदीच्या काठावर असलेल्या एका ऐतिहासिक मंदिरावर असच कट्टरपंथी लोकांनी हल्ला करून त्याची तोडफोड केली होती. त्यावेळीही असच अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. आणि अजूनही त्याचे कसलेही धागेदोरे सापडलेले नाहीत.
२७ जानेवारीला पाकिस्तानातील हिंग्लज मातेच्या मंदिरात पण अशीच लूटमार केली होती. ऐन नवरात्रात अज्ञात संशयितांनी मूर्तीचे डोके फोडले होते.आणि तिच्या वाहनाचे तोंड मुरगाळून टाकले होते.
त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात रोहरी या सिंध प्रांतातील एका मंदिरावर हल्ला करून मूर्तींची तोडफोड केली.पाच मूर्तींचा विध्वंस केला. मंदिरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून नेली. या साऱ्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडीयावर व्हायरल झालं होतं. हे सारे वाचले की कुणाही संवेदनशील माणसाचे मन उद्विग्न होऊन जाते.
जेव्हा एखादी स्त्री चर्चासत्रा दरम्यान आपल्या देवी देवतांची टिंगल करतात म्हणून दुसऱ्या धर्मासाठी, त्यात असलेल्या काही रीतरिवाज याबाबत बोलते तेव्हा तिला बलात्काराच्या धमक्या येतात, खून करण्याच्या धमक्या दिल्या जातात. तिची जीभ कापून आणण्यासाठी १ कोटीचे बक्षीस देण्याची भाषा केली जाते. नेतेमंडळी पण तिला अटक करण्यासाठी आग्रही होतात. अगदी खुद्द राष्ट्रीय पक्ष पण त्या स्त्रीला पक्षातून काढून टाकतो.
–
“लग्नमंडप” फक्त सोय नव्हे – त्यामागे आहेत हिंदू धर्मशास्त्रातील खास कारणं!
जुलुमी शासकांनी पाडलेली तब्बल ३०० मंदिरं पुन्हा दणक्यात निर्माण होणार आहेत!
–
पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इतर आखाती देश एकत्र येऊन भारताच्या नेतृत्वाला आव्हान देतात, का? तर तिने प्रेषितांचा अपमान केला. पण इथे उघडउघड देवतांचा विध्वंस केला जातो त्यावर मात्र सारे मूग गिळून गप्प बसतात. मग तो राष्ट्रीय पक्ष असो, विरोधी पक्ष असो. जिथे देशांतील नेतेमंडळी यावर काही बोलत नाहीत तेथे पाकिस्तानकडून आपण काय अपेक्षा ठेवणार? नाही का?
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.