' सूर्यावर पाणी अस्तित्वात आहे, ही बातमी म्हणजे अफवा आहे का? – InMarathi

सूर्यावर पाणी अस्तित्वात आहे, ही बातमी म्हणजे अफवा आहे का?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

तुमच्या हे कानी पडलंय का माहित नाही, पण सूर्यावर पाण्याचे अस्तित्व असल्याची माहिती मध्यंतरी आली होती. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा त्यावर विश्वास बसला नसेल, तर बऱ्याच विज्ञान प्रेमींना त्यात काहीतरी तथ्य वाटले असेल. पण मनात असाही प्रश्न आला असेल की आगीचा गोळा वगैरे आपण ज्या सूर्याला म्हणतो त्याच्या महाप्रचंड उष्णतेमध्ये पाणी कसं काय टिकत असेल? त्यामुळे ही बातमी म्हणजे बऱ्याच जणांना अफवा वाटली असेल आणि त्यांनी ती हसण्यावारी नेली असेल. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ही गोष्ट खरी आहे. अहो खरंच सूर्यावर पाणी आहे. चला तुम्हाला स्पष्ट करूनच सांगतो.

sun-marathipizza01
vvcat.com

सूर्यावर प्रत्येक घटकाचे अस्तित्व आहे मग तो ऑक्सिजन असो व हायड्रोजन…आणि सूर्याचा काहि भाग असा आहे जेथे ऑक्सिजन आणि हायड्रोजन मिळून H2O अर्थात पाणी तयार होते.

सूर्याचे तापमान किती उच्च आहे ते तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही. तेथे इतकी उष्णता आहे की ऑक्सिजन आणि हायड्रोजन आणि सर्वच अॅटॉम्स, एकमेकांना जोडले गेल्याशिवाय (मोड्यूल्समध्ये रुपांतर झाल्याशिवाय) तरंगतात.

सूर्यावर काही भाग असे आहेत जेथे इतर भागांपेक्षा कमी तापमान असते, यांनाच सनस्पॉट्स (सूर्यावर दिसणारे काळे काळे डाग) म्हणतात. आता तुम्ही विचार करत असाल की इतर भागांपेक्षा हे सनस्पॉट्स कमी उष्ण का असतात, तर त्याचं उत्तर आहे त्यांच्या अतिशय प्रभावी मॅग्नेटिक फिल्ड्स.

sunspot-marathipizza

या मॅग्नेटिक फिल्ड्स वातावरणातील वायु दूर ढकलतात. यामुळे होतं काय तर सनस्पॉट्सच्या  मध्ये कमी उष्ण असलेली पोकळी तयार होते. आणि हि अशी जागा असते जी ऑक्सिजन आणि हायड्रोजनसह सर्वच अणूंमध्ये, रासायनिक बंध निर्माण करून त्यांचे रेणू (मॉड्यूल्स) मध्ये रूपांतर करण्यास पूरक असते. म्हणजेच येथे ऑक्सिजन आणि हायड्रोजन मिळून H2O अर्थात पाणी तयार होते.

पण याचा अर्थ असा नाही की सूर्यावर द्रव रुपात पाणी अस्तित्वात आहे, किंवा तेथे मोठे मोठे समुद्र आहेत, पाणी द्रव स्वरुपात टिकून राहील असे सनस्पॉट्स तापमान नाहीच मुळी! या सनस्पॉट्समध्ये जर एखादा लोखंडाचा तुकडा फेकला तर तो क्षणात फेकल्या फेकल्या हवेत विरून जाईल. त्यामुळे कोणताही H2O रेणू त्या वातावरणात जास्त वेळ टिकत नाही.

sunspot-marathipizza01
qrznow.com

या सनस्पॉट्स मध्ये केवळ बाष्पाच्या रुपात काही प्रमाणात पाणी आढळते आणि हेच आहे सूर्यावरचे पाणी!

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?