' “लग्नमंडप” फक्त सोय नव्हे – त्यामागे आहेत हिंदू धर्मशास्त्रातील खास कारणं! – InMarathi

“लग्नमंडप” फक्त सोय नव्हे – त्यामागे आहेत हिंदू धर्मशास्त्रातील खास कारणं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आता लग्नसराई सुरु आहे. रोज रस्त्याने एखादी तरी वरात दिसते. घोड्यावर बसून जाणारा नवरा दिसतोच. त्याच्यापुढे नाचणारे मित्र, करवल्या बघून एक उत्साहाची लहर येते.

एखादी तरी सजवलेली कार नवरा नवरीला घेऊन जाताना दिसतेच. कार्यालयाच्या बाहेर मांडव दिसतो. फुलांचा दरवळ, सनई बँड, हे सारे बघताना माहोल कसा प्रसन्न होऊन जातो.

आपल्या हिंदू धर्मात मानवी जीवनात एकूण सोळा संस्कार सांगितले आहेत. माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत वेगवेगळे संस्कार करत मानवी जीवन चालते. या सोळा संस्कारांपैकी एक महत्वाचा संस्कार म्हणजे विवाह.

 

wedding 1 im

 

दोन जीव, दोन परिवारांना एकत्र आणणारा हा सोहळा दिसताना एकाच दिवसाचा दिसत असला तरीही तो किती वेगवेगळ्या विधींनी परिपूर्ण असतो बघा.

मुहूर्तमेढ, घाणा भरणे, हळदी समारंभ असे टप्पे पार करत वधू वर विवाह वेदीवर चढतात आणि एकमेकाला वरमाला घालतात. सप्तपदी चालून गळ्यात मंगळसूत्र, पायाच्या बोटात जोडव्या विरुद्या घातलेली, हातात हिरवा चुडा आणि कंकण बांधलेली वधू किती सुंदर दिसू लागते. एक मंगळसूत्र बांधल्यावर किती रूप पालटते तिचे!

पूर्वी हे विवाहसोहळे आठ आठ दिवस चालत. घर रंगवलं जायचं, घराच्या भिंतीवर बोहलं काढून ठळक अक्षरात शुभविवाह लिहिलं जायचं.

लग्न जवळ आलं, की दारात मांडव उभारला जायचा. साधासाच असायचा, पण तो असायचा. गावच्या गाव जेवायला असायचं. कुणाचंही कार्य असो गावातील लोक हौसेने, प्रेमाने, हक्काने मदतीला यायचे. ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार कमी जास्त प्रमाणात लग्न झोकात किंवा साधेपणाने पार पडायचं.

आता कालमानाप्रमाणे वेळेची कमी, जागेची कमतरता या कारणाने बहुतेक विवाह एका दिवसात मंगल कार्यालयातच पार पडले जातात. खूप हौशी लोकांत डेस्टिनेशन वेडिंग, प्री वेडिंग फोटो शूटची क्रेझ आहे, तरीही लग्न अगदी हौसेने विधिवत करण्याकडे या पिढीचाही कल आहेच.

डेस्टिनेशन वेडिंग करताना एखाद्या दूरवरच्या ठिकाणी सुंदर मंडप उभारला जातो. अगदी मोजक्या खूप जवळच्या नातेवाईकांना आमंत्रण दिलं जातं.

तो उभारलेला मंडप किती शोभिवंत केलेला असतो बघा….वेगवेगळ्या फुलांनी, रेशमी कपड्यांनी, शोभेचे खांब, बघायला पण किती छान वाटतात ना?

 

mandap im 1

 

एक गोष्ट बारकाईने बघा… इतक्या गोष्टी बदलल्या. कितीतरी नवं काही काही आलं. कितीतरी गोष्टीत काटछाट केली. पण पारंपारिक गोष्टी मात्र जास्तीत जास्त तशाच ठेवायचा प्रयत्न करतो.

मंडप, सनई चौघडे आपण लग्नात ठेवतोच. एकवेळ नातेवाईक कमी बोलावतो पण विधी नीट पार पडतील याची मात्र काळजी घेतो. मांडव कसा छान दिसेल हे बघतो. तो पण वेगवेगळ्या प्रकारे, झुरमुळ्या वगैरे लावून शोभिवंत करतो. मांडवाशिवाय लग्न ही गोष्ट पण जरा वेगळी वाटते ना?

पण काय कारण आहे मांडव उभा करून लग्न करण्याचे?

आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक विधीला एक शास्त्रीय आधार आहे. प्रत्येक विधी अगदी विचारपूर्वक केलेला आहे. पूर्वी हे विवाह समारंभ घरात संपन्न होत. आठ आठ दिवस हे सोहळे चालत. तेव्हा मांडवात हे सारे विधी संपन्न होत. या प्रत्येक गोष्टीचे एक कारण होते.

लग्नात सर्व विधी मांडवात केले जातात याचे काही कारण असेल असं वाटतं? तर हो… याचं कारण आहेच.शुभ कार्य नेहमी मांडवात करावं त्यामुळे घरात समृद्धी येते असं मानलं जातं. हा मांडव चार खांबावर उभारलेला असतो.

 

mandap im

 

आपल्या हिंदू धर्मात चार स्तंभ आयुष्यातील चार टप्पे दर्शवतात.हे चार आश्रम मानले जातात. ते आहेत-

१. ब्रह्मचर्य आश्रम

२. गृहस्थाश्रम

३. वानप्रस्थाश्रम

४. संन्यासाश्रम.

लग्नानंतर ब्रह्मचर्य आश्रम संपून पुढील आश्रमांकडे वर वधू वाटचाल करू लागतात. थोडक्यात विवाह ही पुढच्या जीवनाकडे नेणारी पहिली पायरी आहे. आणि याची सुरुवात लग्न मंडपात होते.

मांडव हे ते स्थान आहे जिथे वर अर्थात नवरा मुलगा ब्रह्मचर्य संपवून गृहस्थ बनतो. त्याच्यावर आता घर सांभाळायची जबाबदारी येते. त्याच बरोबर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे मानवी जीवनाचे मुख्य पैलू आहेत.

सप्तपदी चालताना वधू वर जी वचने घेतात ती याच चार गोष्टींशी निगडीत असतात. त्याशिवाय लग्न करताना अग्नीभोवती फेरे घेतले जातात. तो अग्नी हे पावित्र्याचे आणि आध्यत्मिकतेचे प्रतिक मानले जाते.

याशिवाय ब्रह्मांड ज्या चार तत्वांनी बनले आहे ती म्हणजे अग्नी, जल,वायू,आणि अग्नी या चार तत्वांचे प्रतिक म्हणजे मांडव. म्हणूनच मांडव या लग्न सोहळ्यात खूप विशेष मानला जातो.

नीट लक्ष देऊन बघा, मांडव हा जास्तकरून लाल आणि पिवळ्या रंगाच्या कापडाचा वापर करून बनवलेला असतो. अर्थात हळदी कुंकू या पवित्र रंगाचं ते प्रतिक आहे. दक्षिणेत तर केळीची पाने, खुंट यांचा मुक्तहस्ते वापर मांडव सजवण्यासाठी केला जातो.

आपल्याकडे कोणत्याही विधीत पाण्याने भरलेला कलश ठेवला जातो. त्यावर आंब्याची पणे आणि मधोमध नारळ ठेवला जातो. हा कलश म्हणजे मानवी शरीराचं प्रतिक आहे.

 

kalash im

 

त्यावर असलेला नारळ हा बुद्धी तर आंब्याची पाच पाने ही पंचेंद्रीये दर्शवतात आणि अक्षता म्हणजे समृद्धीचे प्रतिक. म्हणजे नवरा नवरीच्या घरी धन धान्याची समृद्धी राहावी.

मांडवात होम केला जातो या होमात तूप, समिधा आणि औषधी वनस्पती हवि म्हणून दिल्या जातात. या होमकुंडाभोवतीच नवरा नवरी सात पाऊले सोबत चालून आजन्म सोबत राहण्याचे एकमेकांना वचन देतात ते अग्नीच्या साक्षीने!!!

त्या वचनांना सप्तपदीला अनन्यसाधारण महत्व आहे. त्याचे पावित्र्य, मांगल्य हे खूप मोठे मानले जाते. म्हणून तर देवा ब्रह्मणांच्या साक्षीने लग्न केलं आहे असं म्हणतात. वरवर साधा दिसणारा मंडप किती अर्थ घेऊन उभारला जातो ना.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?