एक्सप्रेसचे डब्बे निळे-लाल किंवा हिरव्या रंगाचेच असण्यामागे आहे एक खास कारण
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
रेल्वेशिवाय मुंबईकरांच्या आयुष्याची कल्पनाच करता येणार नाही इतकी ती मुंबईकरांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे, पण मुंबईव्यक्तिरिक्तही भारतभर सगळीकडे रेल्वे, एक्सप्रेसचं जाळं पसरलेलं आहे.
लोकलपेक्षा एक्सप्रेसने प्रवास करण्याचा अनुभव वेगळा असतो. लोकलमध्ये सीट मिळवण्यासाठीची आपली रोजची कसरत असते तसा प्रकार एक्सप्रेसच्या सीटच्या बाबतीत होत नाही कारण, एक्सप्रेसने प्रवास करण्यापूर्वी आपल्याला आपल्या सीटचं आधीच रिझर्वेशन करावं लागतं.
एक्सप्रेसचे डब्बे नेहमी निळे, लाल किंवा हिरव्या रंगाचेच असतात हे तुमच्या लक्षात आलंय का? ते नेमक्या याच रंगांचे का असतात? त्यापेक्षा वेगळ्या रंगांचे का नसतात?
एक्सप्रेसच्या डब्ब्यांना असे विशिष्ट रंग दिले जाण्यामागे काही कारण असेल का? असे प्रश्न तुम्हाला पडलेत का? कदाचित हे आजवर तुमच्या लक्षातही आलं नसेल पण हे वाचताना एकदम लक्षात येईल. चला तर मग जाणून घेऊ याविषयी.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
निळ्या रंगाचे एक्सप्रेसचे डब्बे :
बऱ्याचशा एक्स्प्रेसेसचे डबे निळ्या रंगाचे असतात. पॅसेंजर आणि एक्सप्रेस अशा दोन्हींचा यात अंतर्भाव होतो. या दोन्हींमधल्या सुविधाही साधारण सारख्याच असतात. एक्सप्रेसच्या डब्ब्यांचा रंग त्या एक्सप्रेसचा वेग दर्शवतो.
ज्या ज्या एक्सप्रेस, सुपरफास्ट एक्सप्रेसेसच्या डब्ब्यांचा रंग निळा असतो त्या ताशी ७० ते १४० किलोमीटरच्या वेगाने धावतात. हे डब्बे लोखंडापासून बनवलेले असतात आणि त्यांच्यात एअर ब्रेक्स लावलेले असतात त्यामुळे त्यांचा वेग इतका असतो.
त्यांचा वेग यापेक्षा जास्त वाढवता येत नाही. अशा एक्सप्रेसेसचा वेग जर एका मर्यादेपेक्षा जास्त वाढवला तर त्या स्वतःला तितकं खेचून नेऊ शकत नाहीत किंवा जरी त्यांनी तसंच स्वतःला खेचून पुढे नेलं तरी त्यामुळे एक्सप्रेस थांबवताना समस्या निर्माण होऊ शकते.
लाल रंगाचे एक्सप्रेसचे डब्बे :
ज्या एक्सप्रेस गाड्या सगळ्यात जास्त वेगाने धावणाऱ्या असतात त्यांच्या डब्ब्यांना लाल रंग असतो. २००० मध्ये या एक्सप्रेसेसचे डब्बे जर्मनीहून बनवून आणले होते. आता हे डब्बे पंजाबच्या कपूरथला येथे बनवले जातात.
या एक्सप्रेसचे डब्बे ऍल्युमिनियमपासून बनवलेले असतात आणि बाकी एक्सप्रेसेसच्या डब्ब्यांच्या मानाने हलके असतात. यांची ब्रेक सिस्टीमही वेगळी असते आणि त्यांच्यात डिस्क ब्रेक्स असतात.
या एक्सप्रेसेसचे डब्बे हलके असल्यामुळे ते सहज खेचून नेता येतात. या एक्सप्रेस गाड्या ताशी २०० किलोमीटरच्या वेगाने धावतात.
राजधानी आणि शताब्दीसारख्या भरघाव वेगाने धावणाऱ्या एक्सप्रेसेसना असे डब्बे असतात आणि या एक्सप्रेस गाड्या इतक्या वेगाने जात असल्या तरी त्या थांबवायच्या असतील तरी पटकन थांबवताही येतात.
हिरव्या रंगाचे एक्सप्रेसचे डब्बे :
काही काही एक्सप्रेस गाड्यांचे डब्बे हिरव्या रंगाचे असतात. काही काही एक्सप्रेसेच्या डब्ब्यांना हिरवा आणि तपकिरी असे दोन्ही रंग असतात.
देशातल्या सगळ्या गरीब रथ एक्सप्रेसेसच्या डब्ब्यांचा रंग हिरवा असतो. यातल्या बहुतेक एक्सप्रेस गाड्या वातानुकूलित असतात आणि त्यातून आरामशीरपणे प्रवास करता येतो.
पिवळ्या/नारिंगी रंगाचे एक्सप्रेसचे डब्बे :
पिवळ्या रंगाच्या डब्ब्यांच्या एक्सप्रेसेस सहसा आढळत नाहीत. मात्र, तेजस एक्सप्रेसचं वेगळेपण लक्षात यावं म्हणून त्या एक्सप्रेसच्या डब्ब्यांना पिवळा किंवा नारिंगी रंग दिलेला असतो.
डबल डेकर ट्रेन्समध्येही नारिंगीमिश्रित रंगाचा वापर केलेला असतो. दुरांतो एक्सप्रेसमध्येही नारिंगी आणि हिरव्या रंगाचा वापर केला जातो.
छोट्या ट्रेन्सचे डब्बे :
टॉय ट्रेन्स किंवा नॅरोगेज ट्रेन्सची ओळख म्हणून त्यांच्या डब्ब्यांना हलका तपकिरी रंग असतो. हल्ली नॅरोगेज ट्रेन्स दिसत नाहीत. मात्र, टॉय ट्रेन्स आजही आहेत.
याखेरीस, महात्मना एक्सप्रेससारख्या विशेष गाड्यांच्या डब्ब्यांचा रंग जांभळा असतो. यात एलइडी लाईट्स, बायो टॉयलेट्ससारख्या सुविधा असतात.
—
- रेल्वे स्टेशनच्या बोर्डवर समुद्रसपाटीपासूनची उंची लिहिलेली असते, का ते जाणून घ्या..
- रेल्वेच्या डब्यांवरच्या या खास क्रमांकाचे गुपित तुम्हाला नक्कीच ठाऊक नसेल!
—
एक्सप्रेसवरच्या रंगीत पट्ट्या काय दर्शवतात?
ICF डब्ब्यांवर वेगवेगळ्या रंगांच्या पट्ट्या असतात. काही काही डब्ब्यांच्या शेवटच्या खिडकीवर त्यांचं इतर खिडक्यांपेक्षा असलेलं वेगळेपण दर्शवण्यासाठी वेगवेगळ्या रंगांनी रंगवलेल्या पट्ट्या असतात.
निळ्या गाड्यांच्या डब्ब्यांवर असलेल्या पांढऱ्या रंगांच्या पट्ट्या त्या विशिष्ट ट्रेनच्या सेकंड क्लास गाड्या अनारक्षित असल्याचं दर्शवतात, ज्या गाड्यांच्या डब्ब्यांना करडा रंग असतो आणि त्यांच्यावर हिरव्या रंगाच्या पट्ट्या असतात त्या गाड्या केवळ महिलांकरताच असतात.
ज्या EMU/MEMU ट्रेन्सच्या डब्ब्यांचा रंग करडा असतो आणि त्यांच्यातल्या ज्या डब्ब्यांवर लाल रंगाच्या पट्ट्या असतात त्या फर्स्ट क्लास केबिन्स दर्शवतात. लोकांना ही ट्रेन आपल्यासाठी आहे की नाही आहे लक्षात यावं म्हणून अशा विशिष्ट रंगांच्या पट्ट्या डब्ब्यांवर असतात.
कुठल्याही एक्सप्रेसने प्रवास करताना आपण आवश्यक ती दक्षता पाळतोच, पण तरी आपल्याला एक्सप्रेसचे डब्बे विशिष्ट रंगांचेच असण्याला काय महत्त्व असतं हे ठाऊक नसतं.
यापुढे आपण स्वतः जेव्हा एक्सप्रेसने प्रवास करू तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवूच. शिवाय, आपल्याला पटकन कुणी एक्सप्रेसेसविषयी काही विचारलं तर इतकी मूलभूत माहिती तरी यापुढे नक्कीच सांगता येईल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.