' जेवढा थाट, तेवढीच बंधनं…एलिझाबेथ राणीच्या जेवणात ‘लसूण’ नसण्यामागे आहे मोठ्ठा विचार – InMarathi

जेवढा थाट, तेवढीच बंधनं…एलिझाबेथ राणीच्या जेवणात ‘लसूण’ नसण्यामागे आहे मोठ्ठा विचार

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आटपाट नगर होते. तिथला राजा खूपच लहरी होता. इतका, की तो सतत आपल्या लहरीनुसार वागत रहायचा. एवढेच नव्हे तर आपल्या दरबारातल्या लोकांना, आपल्या परिवाराला आणि कधीकधी तर आपल्या प्रजेला पण आपल्या लहरीनुसार वागायला भरीस पाडायचा. त्यामुळे झाले काय तर राजासारखीच त्याची प्रजा लहरीपणाने वागू लागली.

यातून अनेक गमती जमती सुद्धा घडू लागल्या आणि ‘राजा बोले दळ हाले’ ही म्हण रूढ झाली. आता तुम्ही म्हणाल म्हणी काय? आपल्याकडे पैशाला पासरी सापडतात, त्यात काय विशेष?

विशेष हे की तिकडे इंग्लंडात पाऊस पडला तरी आपल्याकडे चौकाचौकात चर्चा रंगते, मग जर तिथल्या राणीने आपल्या राजवाड्यात बनवल्या जाणार्‍या पदार्थांमध्ये कांदा- लसूण वापरण्यावर बंदी घातली तर? तर चर्चा तर होणारच ना?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मित्रांनो कांदा आणि लसूण म्हटलं, की आपली जीभ खवळली म्हणून समजाच! मग ती कांद्याची कुरकुरीत भाजी असो , मिसळीसोबत मिळणारा बारीक चिरलेला कांदा असो की भेळेतला चटकदार कांदा, आपल्या तोंडाला पाणी सुटते ना राव.

तीच गत लसणीची. नुसत्या बारीक चिरलेल्या पालेभाजी वर घातलेली चरचरीत लसणाची फोडणी असो की आल-लसूण पेस्ट वापरुन वाढवलेली रश्श्याची रंगत असो, लसणाने पदार्थाची रंगत वाढते.

पण आता खुद्द राणीनेच कांदा लसणावर बंदी आणली तर करायचे काय? पण का आणली असेल तिने ही बंदी? आणि ते ही इतक्या खमंग गोष्टीवर, कुछ तो गडबड है दया! चला जरा बकिंहम पॅलेसची सैर करू आणि जाणून घेऊ या बंदी मागील गोष्ट.

 

queen-elizabeth-inmarathi02

 

 

राजघराणी आणि त्यांचे नियम…उफ्फ! त्यात ते राजघराणे जगावर कधीकाळी राज्य करणार्‍या ब्रिटीशांचे असेल तर बघायला नकोच.

राणीच्या अनेक नियमातील एक नियम असाही आहे, की तिने जर तिची हँडबॅग जमिनीवर ठेवली तर ती अडचणीत असून तिला त्या अडचणीतून बाहेर काढले जावे असा त्याचा अर्थ होतो आणि जर तिने पर्स टेबलवर ठेवली तर तो कार्यक्रम संपल्याचा इशारा समाजाला जातो.

मग तुम्हीच सांगा कांदा आणि लसूण यांच्या बंदीवर पण असेच काहीतरी रॉयल कारण असेल ना?

मित्रांनो ते कारण असे आहे, की राज परिवारातील व्यक्तींना दिवसभरात अनेक पाहुण्यांना, राजकीय नेत्यांना, भेटावे लागते. अशावेळी कांदा-लसूण खाल्लेला असेल तर त्याच्या उग्र वासामुळे भेटण्यासाठी आलेल्या पाहुण्याला त्रास होऊ म्हणूनच राणी एलिझाबेथ यांनी आपल्या शाही भोजनात कांदा आणि लसूण वगळण्याच्या सुचना दिल्या आहेत.

 

garlic inmarathi

 

हेच कारण आहे एलिझाबेथ राणीने आपल्या स्वयंपाक घरातून कांदा आणि लसणाला हद्दपार केले आहे. इतकेच नाही तर स्टार्च असलेले पदार्थ म्हणजेच आपले बटाटेराव, भात, पास्ता, शेलफिश ( शिंपले ) देखील राणीला जेवणात चालत नाहीत.

जेव्हा प्रिंस चार्ल्स यांची पत्नी डचेस ऑफ़ कॉर्नवाल, कैमिला पार्कर ‘बाउल्स मास्टरशेफ़ ऑस्ट्रेलिया’ या शो मध्ये दिसल्या तेव्हा खरी हकीकत समोर आली.

त्यांना जेव्हा शाही परिवारातील जेवणासंबंधित नियमांविषयी विचारलं, तेव्हा असं कळलं, की शाही भोजनात कांदा लसूण यांच्यावर बंदी असून त्यांचा समावेश असलेले पदार्थ राणीच्या भोजनात कधीच नसतात.

 

queen elizabeth im1

 

महाराणी एलिझाबेथ यांच्या शासन काळाला जून २०२२ मध्ये ७० वर्षे पूर्ण होतील. यानिमित्ताने प्लेटिनम जुबली कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.

हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जाईल ज्याची तयारी आत्तापासूनच सुरू झाली आहे. या कार्यक्रमादरम्यान पूर्ण इंग्लंड मध्ये ४ दिवसांचा बँक हॉलिडे घोषित करण्यात आला आहे.


आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा : 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?