' जेव्हा जे आर डी टाटा स्वतः विमानातील टॉयलेट स्वच्छ करतात…. – InMarathi

जेव्हा जे आर डी टाटा स्वतः विमानातील टॉयलेट स्वच्छ करतात….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

देशाच्या व्यावसायिकांच्या यादीत टाटा हे नाव भरभक्कम योगदान देणारं मानलं जातं. केवळ व्यवसाय नाही, तर निती मूल्यांच्या निकषांवरही टाटा हे नाव आजच्या घडीपर्यंत झळाळत आहे. टाटांचं एक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत साधी रहाणी, जमिनीवर असणारे पाय आणि कोणतंही काम लहान न समजण्याची वृत्ती.

भारत स्वतंत्र देश म्हणून कार्यरत झाला आणि इथल्या व्यापार उदीमानं नवीन दृष्टीकोन बाळगत नवी भरारी घेतली. अनेक व्यवसाय नव्यानं सुरू झाले, रुजू लागले.

देशाच्या प्रगतीसाठी अशा कष्टाळू आणि दूरदृष्टी असणार्‍या व्यावसायिकांची फळी उभी रहाणं फ़ार गरजेचं होतं. या फळीपैकी एक नाव म्हणजे, टाटा. आजच टाटांच्या बाबतीत बोलायचं तर नाम ही काफ़ी है, असा प्रकार आहे.

 

jrd tata im 1

 

काही शे रुपयांच्या कपड्यांपासून लाखो करोडोंच्या घर, दागिने, गाड्यांपर्यंत टाटांचा शिक्का असणारी कोणतीही गोष्ट ग्राहक विश्वासाने घेतात. यात आपली फसवणूक होणार नाही ही खात्री त्यांना असते. मात्र हा विश्वास, ही खात्री एका रात्रीत तयार झालेली नाही, यामागे आहेत टाटांचे परिश्रम आणि त्यांचं जमिनीवर टिकून असणं.

इथल्या सामान्य माणसापासून आणि कंपनीत काम करणार्‍या सामान्य कर्मचार्‍यापासून टाटांनी स्वत:ला वेगळं कधीच मानलं नाही, वेळ पडली तर अगदी पडेल ते काम केल्यानं आणि त्याचा गाजावाजा न करता आपलं काम शांतपणे करून टाकल्यानं टाटा या नावाचा एक आदरयुक्त दबदबा निर्माण झालेला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

जे आर डी टाटा, जहांगीर रतनजीभाई टाटा. यांना टाटा उद्योगसमूहातील सर्वात यशस्वी चेअरमन मानलं जातं. जेआरडी यांनी वयाच्या अवघ्या चौतीसाव्या वर्षी, १९३८ साली टाटा सन्सच्या चेअरमन पदाचा भार स्वीकारला. हे पद त्यांनी १९९१ पर्यंत भूषविलं आणि केवळ कंपनीलाच नव्हे, तर देशालाही प्रगतीपथावर नेलं.

जेआरडींचा जन्म २९ जुलै १९०४ सालचा. ते ५३ वर्षं टाटा सन्सचे चेअरमन होते. टाटा ग्रुपचे सर्वात जास्त यशस्वी चेअरमन म्हणून त्यांना आजही ओळखलं जातं.

देशातील ते एकमेव असे व्यावसायिक आहेत ज्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार लाभला आहे. १९९२ साली त्यांना या पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. जहांगिर यांचं बालपण फ़्रान्समधे गेलं. याचं कारण त्यांच्या मातोश्री फ़्रान्सच्या होत्या (भारतातील कार चालविणारी पहिली महिला म्हणून त्यांची नोंद आहे).

 

jrd tata im

 

फ़्रान्समधील वास्तव्यातच त्यांना एअरक्राफ़्टमधे रुची निर्मान झाली. वयाच्या १५ व्या वर्षीच त्यांनी वैमानिक बनण्याचा निश्चय केला. मुंबईत पहिला फ़्लाईंग क्लब सुरू झाला त्यावेळेस त्यांना पायलटचं लायसन्स मिळालं.

भारतात प्रथमच कोणालातरी अशा प्रकारचं लायसन्स दिलं गेलं होतं. अशा रीतीनं जेआरडी भारतातील सिव्हिल एव्हिएशनचे पितामह बनले. पुढे त्यांनी भारतातील पहिली प्रवासी विमानसेवा कंपनी चालू केली.

टाटा एअरलाईन्स या नावानं ही कंपनी चालू झाली. भारतातील ही पहिली विमान सेवा कंपनी होती जी पुढे जाऊन भारत सरकारनं अधिग्रहण केली. याच कंपनीला आज आपण एअर इंडिया म्हणून ओळखतो.

 

air india im

 

एअर इंडियाच्या सुरवातीच्या काळातला जे आरडींचा एक किस्सा लोकप्रिय आहे. एकदा जेआरडी टाटा एअर इंडियामधून प्रवास करत होते. त्यांच्या बाजूलाच आरबीआयचे पूर्व गव्हर्नर एल के झा बसले होते.

अचानक जेआरडी मधून उठून गेले ते बराच वेळ आलेच नाहीत. साधारण तासाभरानंतर ते परतले. झा यांनी त्यांना विचारलं की इतका वेळ ते कुठे गेले होते? यावर जेआरडींनी सांगितलं, की ते विमानातील टॉयलेट स्वच्छ आहेत की नाही? हे बघायला गेले होते.

यावर झा यांनी विचारलं की नुसती पहाणी करायला एक तास का? तर जेआरडी उत्तरले की, टॉयलेट पेपर ठिक लागला नव्हता तो व्यवस्थित लावून आलो.

 

jrd tata im 2

 

या प्रवासानंतर जेआरडी टाटा इंडियन एअरलाईन्सच्या प्रत्येक बोइंग विमानातील टॉयलेटमधे जाऊन त्याची तपासणी केली. जिथे कुठे त्यांना त्रुटी दिसल्या त्या सुधारण्यासाठी सूचना देत न बसता त्यांनी त्या स्वत: सुधारल्या.

प्रवाशांचा विमानप्रवास सुखकर व्हावा यात कसलीही उणीव, कमतरता रहाता कामा नये याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. प्रत्येक प्रवासानंतर ते विमान कर्मचार्‍यांच्या कौतुकाचे आणि सेवेतील सुधारणांबाबतचे मत असणारी चिठ्ठी देऊन जात.

त्यांच्या या सतत उणीवा शोधून त्या दूर करण्याच्या सवयीचा कर्मचार्‍यांना कधीच जाच झाला नाही कारण ते केवळ हुकूम सोडणारे बॉस नव्हते तर कर्मचार्‍यांच्या बरोबरीनं काम करणारे मालक होते. म्हणूनच टाटा हे एक आदर्श वर्क कल्चर म्हणून नावारुपाला आले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?