मुघल वंशातील शेवटची बेगम जगतीये कलकत्त्यात हलाखीचे जीवन!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
ब्रिटिशांनी भारतावर दीडशे वर्षं राज्य केलं. मात्र भारतावर याहूनही मोठा शासनकाळ कुणाचा असेल तर तो मुघलांचा! या चारशे वर्षांच्या काळात मुघलांनी मोठ्या प्रमाणावर मनमानी केली.
हिंदुस्तानची, इथल्या जनतेची लूट करणं, त्यांचा छळ करणं, त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करणं अशा गोष्टी अगदी सर्रास केल्या गेल्या.
हिंदू धार्मिक स्थळं असणारी मंदिरं उध्वस्त करण्यात आली. भारताच्या इतिहासाबद्दल काहीही झालं, तर मुघलांच्या उल्लेखाशिवाय हा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही.
मुघलांची आर्थिक सुबत्ता :
हिंदुस्थानवर ४०० वर्षं राज्य करणाऱ्या मुघलांचं एकूण साम्राज्य आणि सुबत्ता यालाही सीमा नव्हत्या असंच म्हणायला हवं. मुघल राज्याचा सर्वाधिक साम्राज्य विस्तार झालेला असताना, जगातील जवळपास एक चतुर्थांश लोकसंख्येवर मुघल सम्राटाचं राज्य होतं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
अमाप कर, संपत्ती, गडगंज पैसाअडका, समृद्धी याला कुठलाच पारावर नव्हता. वर्षभरात गोळा होणाऱ्या महसुलाची गणना करायची झाल्यास, प्रतिवर्षी ४००० टनांहून अधिक चांदीचा महसूल गोळा होत असे.
अशा या अतिश्रीमंत साम्राज्याची सध्याची बेगम मात्र हलाखीचं जीवन जगतेय. काळाचं चक्र फिरत असतं म्हणतात ते हेच असावं. सुलताना बेगमची सध्याची स्थिती कुठल्याही अतिसामान्य भारतीय नागरीकाहूनही वाईट आहे असं म्हणायला हवं.
असं आयुष्य जगतेय सुलताना बेगम…
कलकत्ता शहरातील हावडा परिसरात सध्या सुलताना बेगम वास्तव्याला आहे. आपल्या नातवासोबत राहणाऱ्या बेगमच्या स्थिती मात्र हलाखीची आहे. अवघ्या दोन खोल्यांचं झोपडीवजा घर, तुटपुंजी कमाई, साधी भांडी घासण्यासाठी सुद्धा सार्वजनिक नळावर जावं लागणं, हे तिचं नित्याचं जीवन झालं आहे.
मोहम्मद बेदर बख्त याची पत्नी असणारी सुलताना बेगम, ही मुघलांचा अखेरचा बादशाह बहादूर शहा जफर याची वारसदार आहे. पती बेदर बख्त हयात असेपर्यंत सरकारची प्रतिमाह ४०० रुपयांची पेन्शन त्यांना मिळत होती. मात्र १९८० साली बख्त यांचा मृत्यू झाल्यापासून ही पेन्शन सुद्धा बंद झाली आहे.
—
- केवळ बाबरीच नव्हे तर या १० ठिकाणी देखील मशिदींच्या आधी हिंदू मंदिरं अस्तित्वात होती
- आपला इतिहास सोडून मुघलांचं गुणगान का? बॉलिवूडचे धिंडवडे काढणारा परखड लेख
—
पदरात असलेल्या पाच मुली आणि एक मुलगा यांच्या पालनपोषणासाठी चहाची टपरी टाकून त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी पार पाडली. मात्र कालांतराने ही टपरीसुद्धा बंद करावी लागली.
सुलताना बेगम हिच्यावरील वाईट वेळ एवढ्यावरच थांबली नाही. दोनवेळा सरकारी घर मिळूनही आज मानलेल्या भावाच्या आसऱ्याला राहण्याची वेळ बेगमवर आली आहे. १९८१ साली सरकारने त्यांना दोन खोल्यांचं घर देऊ केलं.
मात्र १९८३ साली हे पुन्हा काढून घेण्यात आलं. २००३ साली ५०००० रुपयांचा मदतनिधी आणि घर अशी मदत त्यांना करण्यात आली. यावेळी मात्र गावगुंडांनी या घरावर कब्जा केला आणि पुन्हा एकदा सुलताना बेगम बेघर झाली.
राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील यांनी मात्र तिच्या आयुष्यावर काहीशी फुंकर घालण्याचं काम केलं. बेदर बख्त याच्या मृत्यू पश्चात बंद करण्यात आलेलं पेन्शन २००६ साली पुन्हा सुरु झालं.
दरमहा ६००० रुपये पेन्शनचा तिच्या आयुष्याला आधार मिळाला. ‘आपलं घराणं कधीही कुठे भीक मागून जगलेलं नाही, तशी आपली शिकवण नाही’ हे पतीचे शब्द बेगमने कायम स्मरणात ठेवले आहेत.
बहादूर शहा जफरशी असं आहे नातं :
मुघलांचा शेवटचा राजा आणि १८५७ च्या स्वातंत्र्य समराचं नेतृत्व केलेला बहादूर शहा जफर याची वारसदार म्हणजे सुलताना बेगम! १८५७ चा उठाव मोडीत काढल्यानंतर ब्रिटिशांनी बहादूर शहा जफरला रंगून येथे पाठवलं. रंगूनमध्ये पत्नीसह राहत असताना त्याचा मुलगा जमशेद बख्त याचा जन्म झाला.
जमशेद म्हणजे सुलतानाचे पती बेदर बख्त याचे वडील. त्यांचं नादिरा जहाँ हिच्याही लग्न झालं होतं. जमशेद यांनी मुलासह पाकिस्तानातून पलायन केलं आणि ते भारतात आले. पुढे स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्यांनी स्वतःची ओळख लपवून ठेवली होती.
काय म्हणते सुलताना बेगम…
ताज महाल, लाल किल्ला, शालिमार गार्डन्स अशी विविध ऐतिहासिक स्थळं आज पर्यटन स्थळं झाली आहेत. यातून सरकारला महसूल प्राप्त होतो. बहादूर शहा जफर यांची हत्या झाली नसती तर जफर महालात सुलताना बेगम वास्तव्यला असती असं तिचं म्हणणं आहे.
निदान इतक्या हलाखीच्या स्थितीत आणि दारिद्र्याचं आयुष्य जगायला लागू नये अशी अपेक्षा सरकारकडून करत असल्याचं ती म्हणते.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.