' ९६ वर्षांचं आयुष्य जगलेला व्हॅस्लिनचा मालक रोज एक चमचा व्हॅस्लिन खायचा म्हणे! – InMarathi

९६ वर्षांचं आयुष्य जगलेला व्हॅस्लिनचा मालक रोज एक चमचा व्हॅस्लिन खायचा म्हणे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जसं उन्हाळ्यात आपल्यापैकी कित्येक जण सनस्क्रीन लावून बाहेर पडतात तसंच हिवाळ्यातसुद्धा आपण आपल्या त्वचेची काळजी घेतो. फाटणारे ओठ असो किंवा कोरडी पडणारी त्वचा, यावर आपण हमखास उपाय म्हणून बॉडी लॉशन किंवा व्हॅस्लिन वापरतो.

जवळजवळ प्रत्येक घरात व्हॅस्लिन हे सहज आढळून येणारे कॉस्मेटिक आहे, असा एकही माणूस नसेल ज्याने आतापर्यंत तरी व्हॅस्लिन वापरलेले नसेल.

 

vaseline IM

 

हे असे एक कॉस्मेटिक उत्पादन आहे जे जवळजवळ प्रत्येक व्यक्तीच्या खिश्याला परवडणारे आहे. व्हॅस्लिनचे दुसरे नाव हे पेट्रोलियम जेली आहे. आज आम्ही तुम्हाला व्हॅस्लिनशी निगडीत असलेली एक रंजक गोष्ट सांगणार आहोत :-

रॉबर्ट ऑगस्टस चेसब्रो, २२ वर्षीय ब्रिटीश रसायनशास्त्रज्ञ, पेनसिल्व्हेनियाच्या एका छोट्याशा टायटसव्हिल या गावात गेले होते, जेथे पेट्रोलियमचा अलीकडेच शोध लागला होता. स्पर्म व्हेल तेलापासून केरोसीन बनवणाऱ्या चेसब्रोला पेट्रोलियमपासून इतर कोणती उत्पादने बनवता येतील हे जाणून घेण्याची उत्सुकता होती.

टायटसव्हिलमध्ये आल्यानंतर थोड्याच वेळात, त्यांचा तेल ड्रिलिंग प्रक्रियेदरम्यान नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या एका पदार्थाकडे आकर्षित झाला, ज्यामध्ये त्वचेला बरे करण्याचे गुणधर्म होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

तेव्हा रॉबर्टने निरीक्षण केले तेथील मजूर हे पदार्थ त्यांच्या त्वचेला लावत होते, जेणेकरून त्यांच्या त्वचेवर असलेले जख्मा आणि जळजळ बरे होण्यास मदत होत होती. यानंतर रॉबर्ट यांनी या पदार्थावर काही संशोधन केले आणि व्हॅस्लिन शोधून काढलं.

 

robert vaseline IM

 

चेसब्रो यांचा त्यांच्या या उत्पादनावर खूप विश्वास होता आणि जेव्हा ते पहिल्यांदा याला बाजारात पाठवणार होता, त्यापूर्वी त्यांनी स्वतःला जख्म केली आणि त्यावर ते लावून बघितले.

यानंतर त्यांना त्याच्या उत्पादनाचे समाधानी निकाल मिळाल्याने, त्यांनी हे उत्पादन काही केमिस्टच्या दुकानात ते विकण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही त्यांच्या या नवीन शोधावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हते आणि म्हणून ते विकण्याच्या सर्व प्रयत्नांमध्ये सुरूवातीला तरी अयशस्वी झाले.

यानंतर ते एक दिवशी त्यांच्या उत्पादनांची प्रात्यक्षिक देण्यासाठी न्यूयॉर्कला गेले होते. तेथे त्यांनी एका मोठ्या जनसमुदायासमोर, स्वतःची त्वचा ऍसिडने जाळली आणि नंतर त्यांनी ती पेट्रोलियम जेली त्यांच्या त्वचेवर लावली. या उत्पादनाची मागणी वाढवण्यासाठी त्यांनी मोफत नमुने देखील वितरित केले.

अखेर १८७० मध्ये त्यांना यश मिळाले, जेव्हा त्यांनी त्यांचा पहिला कारखाना सुरू केला आणि या उत्पादनाला पेटंट लेबलसह ‘व्हॅसलीन’ असे नाव दिले.

तेव्हापासून अनेक लोकांनी असा दावा केला आहे की, चेसब्रोचा त्याच्या उत्पादनावर इतका विश्वास होता की तो दररोज सकाळी एक चमचा व्हॅसलीन खात असे! पहिले तर हे सगळ्यांना खोटे वाटत होते, परंतु जेव्हा खुद्द चेसब्रो यांनी हे कबूल केले, तेव्हा सगळ्यांचा यांवर विश्वास बसला.

 

vaseline eating IM

 

व्हॅस्लिनचा शोध लावणाऱ्या रॉबर्ट चेसेब्रो यांचा जन्म १८३७ मध्ये लंडन येथे झाला होता. ते व्यवसायाने एक केमिस्ट होते. परंतु आपल्याला जाणून आश्चर्य होईल की रॉबर्ट हे दररोज एक चमचा पेट्रोलियम जेली म्हणजेच व्हॅसलीन खात असे.

आधी पेट्रोलियम जेली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हॅस्लिनला व्हाईट पेट्रोलियम, सॉफ्ट पॅराफिन, मल्टी-हायड्रोकार्बन असेही म्हणतात.

व्हॅसलीनचे काही प्रमुख फायदे :-

१) जर तुम्हाला दिवसभर सुगंध हवा असेल आणि परफ्यूम पुन्हा पुन्हा लावायचा त्रास टाळायचा असेल तर ते लावण्यापूर्वी त्या जागेवर पहिले व्हॅस्लिन लावा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला मानेवर आणि मनगटावर परफ्यूम लावायचा असेल तर त्या ठिकाणी आधी थोडी व्हॅस्लिन लावा आणि नंतर परफ्यूम लावा. असे केल्यास दिवसभर सुगंध दरवळत राहील.

२) समजा तुम्हाला कुठल्या तरी कार्यक्रमाला अर्जेंट निघायचे आहे आणि त्यासाठी बूट चमकवायचे आहे, परंतु घरात असलेलं बूट पॉलिश संपलं असेल तर तुम्ही काय कराल? अशा स्थितीत शूजवर व्हॅस्लिन लावा आणि स्वच्छ कापडाने घासून घ्या. असे केल्याने तुमचे शूज चमकू लागतील.

 

vaseline boot polish IM

 

३) तुम्ही बाहेर जाण्यासाठी तयार आहात आणि अचानक तुमची बॅग किंवा पँटची चेन खराब झाली तर..!

अशा परिस्थितीत चेनवर व्हॅस्लिन लावून चेन दोन-तीन वेळा वर-खाली करा. तुमची चेन आता निश्चित झाली आहे. काही लोक मेण देखील वापरतात, परंतु हे पेट्रोलियम जेलीने देखील केले जाऊ शकते.

४) अनेकदा तुम्ही बघितले असेल की लोक जेव्हा आपल्या केसांना रंग देतात तेव्हा त्यांच्या मान आणि कपाळाला देखील रंग लागतो. तुमच्यासोबत असे होऊ नये असे वाटत असेल तर, पहिले केसांना कलर करण्यापूर्वी कपाळावर आणि मानेला व्हॅस्लिन लावून घ्या. यामुळे तुमच्या केसांचा रंग तुमच्या त्वचेवर येणार नाही.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?