' यासिन मलिकच्या भीषण गुन्ह्यांची यादी : हा माणूस काहींना कसा काय आवडू शकतो? – InMarathi

यासिन मलिकच्या भीषण गुन्ह्यांची यादी : हा माणूस काहींना कसा काय आवडू शकतो?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पृथ्वीवर स्वर्ग जर कुठे आहे तर तो इथेच आहे इथेच आहे….. इथेच आहे! फारसी भाषेतील या ओळी आजही काश्मिरचे सौंदर्य अधोरेखित करतात. हिमालयाच्या पर्वतरांगा, निसर्ग सौंदर्याची लयलूट, शिकारे, दाल सरोवर,केशराची शेती, अक्रोड,पश्मिन्याची शाल, सफरचंद या साऱ्या खासियती असलेले काश्मीर हे जितके सुंदर आहे तितकीच त्याची काळी बाजू पण आहे.

सदैव वादात घेरलेले काश्मीर हे दहशतवादी कारवायांचे मुख्य केंद्र ठरले आहे. तिथे आजवर इतका रक्तपात झाला आहे की काश्मीर ही भारताला झालेली जखम आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.

 

kashmir tourism inmarathi
scroll.in

 

नुकताच क्रूर काश्मिरी दहशतवादी यासीन मलिकला जन्मठेपेची शिक्षा झाली. यावर मतमतांचा गलबला सुरु झाला आहे. कुणी तो त्यांचा स्वातंत्र्यसैनिक ठरू शकतो असे तारे तोडले आहेत. पण सोशल मिडीयावर खूप जणांनी त्याला फासावर चढवायला हवे होते म्हणून तळमळ व्यक्त केली आहे. आणि का वाटू नये? त्याच्यावर असलेले आरोप खोटे नव्हते. त्यानेही ते कबूल केले होते.

 

नेमकं काय आहे हे प्रकरण? कोण आहे हा यासीन मलिक?

काश्मीर प्रश्न हा भारताची भळभळणारी जखम आहे. तिथे झालेले दहशतवादी हल्ले, त्याला असलेलं पाकिस्तानचं छुपं सहकार्य, सीमेवर वारंवार होणारे चकमकीचे प्रसंग, जवानांवर होणारे स्थानिक काश्मिरी लोकांचे हल्ले हे सारं भारताची डोकेदुखी होती. त्यातच काश्मीर फाईल्स या चित्रपटाने तिथे झालेले अनन्वित अत्याचार जगासमोर आणले आहेत.

 

the kashmir files uncut scenes featured IM

 

या साऱ्याच्या पाठीशी दहशतवादी संघटना होत्या आणि विशेष म्हणजे या हल्ल्यांसाठी त्या लोकांना पैसाही पुरवला जायचा. या साऱ्या कामासाठी लागणारा पैसा यासीन मलिक पुरवायचा आणि हा पैसा तो लोकांकडून गोळा करायचा. हे म्हणजे आपल्या भाषेत धर्मावर सोमवार करणे झाले.

त्याच्यावर लावलेले आरोप त्यानेही कबूल केले आहेत, आणि अशा अनेक दहशतवादी गुन्ह्यात सहभागी असल्याबद्दल त्याला शिक्षा ठोठावली आहे. त्याच्यावर कोणते गुन्हे दाखल केले होते?

१. २०१७ साली टेरर फंडिंग करणे.

२. १९९० साली रावळपोरा येथील चार वायू सेना अधिकाऱ्यांची हत्त्या करणे.

३. १९८९ मध्ये देशाचे पूर्व गृहमंत्री मुफ्ती महम्मद सईद यांच्या मुलीचे अपहरण करणे.

४. १९८९ मध्ये काश्मिरी पंडित न्यायाधीश नीलकंठ गंजू यांची हत्त्या करणे.

कोण आहे हा यासीन मलिक?

यासीन मलिक हा मूळचा श्रीनगरचा. ३ एप्रिल १९६६ रोजी याचा जन्म झाला. श्रीनगर येथील एसपी कॉलेजमधून त्याने पदवी घेतली. मात्र तो कट्टर दहशतवादी म्हणूनच पुढे आला. १९८८ साली तो पाकिस्तानात जाऊन दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले आहे असे बोलले जात आहे. त्याच्या मते तो लहान असताना  त्याने बघितले  आहे की लष्कराने अनेक काश्मीरी लोकांवर अत्याचार  केले आहेत.

यासीन मलिक हा जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट या संघटनेचा म्होरक्या होता. काश्मीर मध्ये १९८९ -९० मध्ये केवळ जेकेएलएफ ही एकमेव दहशतवादी संघटना होती. या संघटनेच्या दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांवर अतोनात अत्याचार केले. त्यांना काश्मीरमधून विस्थापित व्हायला भाग पडले होते आणि नंतर कितीतरी निष्पाप काश्मिरी लोकांचे त्याने बळी घेतले. कित्येक भारतीय सैनिकांना यमसदनी पाठवले..

जेकेएलएफ या संघटनेचा हेतू काश्मीर पाकिस्तानात विलीन करायचे असाच होता.त्याकरिता शक्य त्या सर्व दहशतवादी कारवाया ही संघटना करत होती. त्यामुळे काश्मीरमधील परिस्थिती अतिशय खराब झाली होती. मग जेकेएलएफला बाजूला करून पाकिस्तानने हिज्बुल मुजाहिदीन या दुसऱ्या दहशतवादी संघटनेला आश्रय दिला.

 

yasin-malik-inmarathi
indianexpress.com

 

दरम्यान १९९० साली यासीन मलिकला पोलिसांनी पकडले. आणि तो १९९४ पर्यंत तुरुंगात होता. त्याने तात्पुरती माघार घेत जेकेएलएफ सोबत युद्धविराम घोषित केला. आणि त्या गटातून बाजूला पडून आपले स्वतंत्र काम सुरु केले. टेरर फंडिंग म्हणजे दहशतवादी कारवायांसाठी पैसा उभा करून दहशतवादी कारवाया सुरु केल्या.

आता हे टेरर फंडिंग काय आहे? तर दहशतवादी कामासाठी लोकांकडून पैसा उभा करणे. दहशतवादी लोकांना शस्त्रास्त्रे चालवायचे प्रशिक्षण देणे,त्यांची राहण्याची, प्रवासाची सोय करणे, हल्ल्यासाठी योजना आखून त्यांना यशस्वी करणे यासाठी जो पैसा लागतो तो पैसा उभा करणे.

कधी धार्मिक कारणे सांगून तर कधी खंडणी वसूल करून हा पैसा उभा केला जातो. हवाला किंवा इतर मार्गाने वस्तूविनिमय करून सोने आणि इतर मौल्यवान वस्तूंची तस्करी करून हा पैसा उभा केला जातो आणि त्याचा वापर फक्त दहशती कारवाया करण्यासाठी केला जातो. यासीन मलिकने असे टेरर फंडिंग करून काश्मीर मध्ये भयंकर उत्पात माजवला.यातून कुणीही सुटले नाही. केवळ काश्मिरी पंडितच नव्हे तर देशप्रेमी मुसलमानांना पण त्याने मारायला सुरुवात केली होती.

 

kashmir im 1

 

सरकारने अतिरेकी संघटना जेकेएलएफचा म्होरक्या मकबूल भट याला फाशीची शिक्षा दिली. आणि नंतर अतिरेक्यांनी टिकालाल टपलू, नीलकंठ गंजू, काश्मिरी पंडितांची हत्त्या केली. मकबूल भटच्या फाशीचा सूड म्हणून या हत्त्या केल्या होत्या असं चौकशी अंती निष्पन्न झालं.

यात यासीन मलिक,जावेद मीर नलका हे सामील होते हेही समजलं. इतकचं नव्हे तर काश्मीरचे तत्कालीन गृहमंत्री मुफ्ती महंमद सईद यांची मुलगी रुबिया सईद हिचे यासीन मलिकने अपहरण केले. आणि त्याच्या बदल्यात तुरुंगात असलेल्या पाच क्रूर दहशतवाद्यांना सोडायची मागणी केली होती.

आणि दुर्दैव असे की सरकारला ती पूर्ण करावी लागली. त्यामध्ये नलका पण होता. यानंतर जानेवारी १९९० मध्ये यासीन मलिकने भारतीय वायुसेनेतील जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये ४० जण जखमी झाले तर चार जण मृत्युमुखी पडले.

२०१९ साली जेकेएलएफ संघटनेवर भारत सरकारने बंदी घातली. पण तत्पूर्वी २०१७ साली यासीन मलिक वर अनेक आरोप लावले गेले. ते दहशतवादी करवाया करून काश्मीरमध्ये शांतता भंग केल्याचा आरोप,दहशतवादी कारवाया केल्याचा आरोप, दहशतवादी कारवायासाठी निधी गोळा करणे, दहशतवादी कारवायासाठी षडयंत्र रचणे, आणि दहशतवादी संघटनेचा सदस्य असणे, गुन्ह्याचे षडयंत्र रचणे आणि राजद्रोह करणे अशा विविध कलमांखाली त्याच्यावर खटला भरला गेला.

 

yasin im 1

नुकताच या केसचा निकाल लागला. यात दिल्लीच्या विशेष न्यायालयाने यासीन मलिकला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.अजून दोन खटल्यांमध्ये त्याला दोषी ठरवून १० लाख रुपये दंड आणि इतर दहा खटल्यांमध्ये १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या सर्व शिक्षा एकत्रच भोगायच्या आहेत. आता यावर यासीन मलिकने आपण यावर काहीही बोलणार नाही असे सांगितले आहे. आपले अपराध, त्यासाठी दिलेल्या शिक्षा हे सारं त्याला मान्य आहे. त्यावर त्याला काहीही हरकत नाही.

हे करून यासीन मलिक जनतेच्या नजरेत हिरो मसीहा बनू पाहतो आहे का? म्हणजे अहिंसेचा मार्ग धरून हा जगाला काय दाखवू इच्छितो? त्याने काहीही म्हटले किंवा नाही म्हटले तरी त्याने केलेल्या अतिरेकी कारवायात जे निष्पाप लोक मृत्युमुखी पडले, जे लोक विस्थापित झाले, त्यांच्या आयुष्याचे नुकसान भरून येणार आहे का?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?