हार्ले डेव्हिडसन विरुद्ध हापूस आंबा : अमेरिका विरुद्ध भारत अश्याही एका युद्धाची कथा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
पूर्वी फार पूर्वी म्हणजे पूर्वीच्या पूर्वीपासून आपल्याकडे बादरायण संबंध जोडणे हा एक लोकप्रिय वाक्प्रचार आहे. अति लांबचा, दूरचा, ओढून- ताणून काढलेला संबंध म्हणजे बादरायण संबंध. मित्रांनो एकदां एका मनुष्याकडे एक ठग गेला व मी तुमचा संबंधीं आहे असे म्हणूं लागला.
संबंध काय आणि कोणता विचारल्यावर त्यानें पुढील श्लोकांतील संबंध सांगितला. ‘अस्माकं बदरीचक्रं युष्मांक बदरीतरुः । बादरायणसंबंधात् यूयं यूयं वयं वयंम् ।’ म्हणजे आमच्या गाडीला बोरीच्या लांकडाचें चाक आहे व तुमच्या दारांत बोरीचें झाड आहें हा बादरायण संबंध म्हणून आपण संबंधित आहोत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
मित्रांनो यातील विनोदाचा भाग सोडला तर आपल्याकडचा हापूस आंबा आणि अमेरिकेतील प्रसिद्ध मोटार बाइक हार्ले डेव्हिड्सन यांचाही असाच बादरायण संबंध राजकीय शीतयुदधात जोडला गेला होता. अर्थात थोडा वेळ लागला पण जिंकलो मात्र आपण होतो. आणि आपल्या हापूस आंब्याला अमेरिकन बाजारात न्याय मिळाला होता. आहे ना इंटरेस्टिंग? जाणून घ्यायचीय ही आंब्याच्या बाइक रायडिंगची स्टोरी? वाचा तर मग
नुकतंच बायडेन यांनी देखील आपला अस्सल हापूस आंबा चाखला आहे. उन्हाळा हा भारतातला आंब्याचा हंगाम आहे, आणि लहान मोठ्या शहरातील भाजी किंवा फळबाजारांचे रस्ते या “फळांचा राजा” च्या रसाळ आणि वैविध्यपूर्ण जातींच्या रंगीबेरंगी ढिगाऱ्यांनी भरून गेले दिसत आहेत. पण त्यात आपली नजर, पावले खेचून घेतो तो अल्फोन्सो, अर्थात आपला सर्वांचा लाडका हापूस आंबा! एक पिवळा आंबा जो देशातील सर्वात गोड आंब्यापैकी एक आहे आणि त्याची त्वचा लालसर पिवळ्या रंगाची आहे.
नवी दिल्लीच्या भारतीय कृषी संशोधन संस्थेतील आंबा तज्ञ ए.के.सिंग यांनी सांगतात. देशात दरवर्षी उत्पादित होणाऱ्या १२ दशलक्ष मेट्रिक टन फळांपैकी जवळपास ६०% आंबे अक्षरशः सर्व घरीच खातात. इतका हापूस आंबा आपल्याकडे लोकप्रिय आहे. ही गोष्ट आहे २००७ सालातली.
अमेरिकेने का बंदी घातली होती?
भारतीय आंबा उत्पादक शेतकरी जास्त प्रमाणात कीटकनाशके वापरतात यामुळे आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होवू शकतात तसेच या फळांच्या भोवती माशा, भुंगे यांसारखे कीटक फिरतात म्हणून स्वछतेचा ही प्रश्न येतो यांसारखि कारणे देत अमेरिकन सरकारने हापूस आंब्यांवर बंदी घातली होती.
त्यामुळे भारतातून अमेरिकेत केली जाणार हापूस आंब्यांची विक्री ठप्प झाली. आशिया आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये जागतिक आंब्याच्या उत्पादनात आणि निर्यातीत भारताचा वाटा जवळपास ४०% आहे.
मार्ग मोकळा कसा झाला?
या बंदीमुळे एकूणच आंब्याच्या निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होणार होता पर्यायाने भारताच्या अर्थव्यवस्थेसमोरील अडचणी वाढणार होत्या. पण राजकीय बुद्धिबळात आपले नेते पूर्वीपासूनच पारंगत आहेत हे कदाचित अमेरिकन नेत्यांना माहिती नव्हते ते या आंब्यांच्या निमित्ताने त्यांना कळले असावे.
झाले असे की त्याच दरम्यान अमेरिकेच्या संस्कृतीमधला आणि अर्थव्यवस्थेमधला महत्वाचा घटक असलेली तमाम अमेरिकन तरुणाईची क्रेझ असलेली ‘हर्ले देवहिडसन’ कंपनी त्यांच्या बाईक भारतात लॉंच करू पहात होती ज्याला भारतीय सरकारने लावलेल्या कडक उत्सर्जन मानके आणि ९० टक्क्यांहून अधिक सीमाशुल्क दरांमुळे बाईक्स च्या भारत प्रवेशात अडथळा निर्माण झाला होता.
भारत आणि युनायटेड स्टेट्स अनेक दशकांच्या अविश्वासानंतर जवळचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असताना, व्यापार संबंधांना पुढील मतभेदांमुळे – विशेषतः जागतिक व्यापार संघटनेत अडथळा निर्माण झाला होता. युनायटेड स्टेट्सला भारताच्या वेगाने वाढणार्या अर्थव्यवस्थेत अधिक प्रवेश हवा होता, तर भारताची इच्छा होती की युनायटेड स्टेट्सने कृषी अनुदान बंद करावे जेणेकरून भारतीय शेतकरी स्पर्धा करू शकतील.
भारत १९८८ पासून अमेरिकेला आंबा निर्यात करत आहे, परंतु फळांच्या माश्या आणि इतर कीटकांच्या समस्येमुळे हापूस आंब्यांवर बंदी घातली गेली होती. अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी अखेरीस त्यांच्या भारत भेटीनंतर आंब्यांवरील बंदी उठवण्यास सहमती दर्शवली होती, त्या बदल्यात भारताने हार्ले-डेव्हिडसन मोटारसायकलींना भारतीय रस्त्यावर परवानगी दिली.
त्यानंतर नवी दिल्ली येथे भारत-अमेरिका व्यापार संबंधांवरील बैठकीत भारताचे वाणिज्य मंत्री कमलनाथ आणि यूएस व्यापार प्रतिनिधी सुसान श्वाब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या द्विपक्षीय व्यापार मंचाच्या झालेल्या बैठकीत अंतिम तपशील तयार करण्यात आला. तेव्हा कमलनाथ म्हणाले होते, ”आमचे आंबे अमेरिकेला जात आहेत आणि हार्ले डेव्हिडसन येथे येत आहे ही चांगली बातमी आहे.
–
देशातच नव्हे, तर कंपनीला जगभरात ‘हिरो’ बनवणाऱ्या व्यक्तीच्या मागे ईडीची पीडा
शेतकरी ते एअर इंडियाचे नवीन अध्यक्ष, एन. चंद्रशेखरन यांची प्रेरणादायी कथा
–
यूएस खरबूज पिकांना धोका देणारे कीटक आणि आंब्यांमधील भुंगा किंवा फळ्माशी मारण्यासाठी दोन्ही देशांनी किरणोत्सर्गाच्या कमी पातळीसह उपचार केलेल्या फळांच्या प्रवेशास परवानगी देणारा व्यापार करार केला, त्यानंतर भारतीय आंब्याची शिपमेंट यूएस बाजारपेठेत आणि हर्ले डेव्हिड्सन भारतीय रस्त्यांवर येण्यास सुरुवात झाली.
अनेक वर्षांच्या राजनैतिक डावपेचांनंतर, भारताचा हा उन्हाळी फ्रूटस्टार अखेर अमेरिकन किनार्यावर पोहोचला. तर मित्रांनो कसा वाटला हा राजकीय बादरायण संबंध ? ते आम्हाला जरूर कळवा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.