' नेमकी कोणती भाषा पहिली? संस्कृत विरुद्ध तामिळ वर्षानुवर्षे सुरु असलेला भाषिक संघर्ष – InMarathi

नेमकी कोणती भाषा पहिली? संस्कृत विरुद्ध तामिळ वर्षानुवर्षे सुरु असलेला भाषिक संघर्ष

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हे माणसाला व्यक्त होण्यासाठी मिळालेले मोठे वरदान आहे. पूर्वी जेव्हा माणूस उत्क्रांत झाला नव्हता, भाषेचा शोध लागला नव्हता तेव्हा तो संवाद साधण्यासाठी चित्रलिपी वापरायचा. आजही त्याचे प्रमाण अनेक गुहामधील चित्रे देतात. नंतर जशी जशी प्रगती झाली तशी तशी भाषा विकसित झाली. आता जगात जवळपास २७०० भाषा बोलल्या जातात. आणि बोली भाषा ७००० च्या वर आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

जगातील सर्वात कठीण भाषा मानली जाते चिनी भाषा. या भाषेत ५० हजार अक्षरे आहेत. आणि रोजच्या वापरात केवळ २००० अक्षरेच आहेत. असे मानले जाते की, पेपर वाचण्यासाठी किमान २००० चिनी अक्षरे माहिती असावी लागतात. बघा, आपल्या मराठीला तगडी टक्कर देणारे काहीतरी आहे जगात. आपल्याकडे सर्रास मराठी अवघड म्हटले जाते पण चिनी त्याहून अवघड आहे.

 

marathi bhasha im

 

भारतात मान्यताप्राप्त २२ भाषा आहेत पण बोली भाषांची संख्या जवळपास १९ हजार आहे. फेसबुकवर बोली भाषा की प्रमाण भाषा हा वाद खूपदा रंगतो. लोक म्हणतात भावना समजून घ्या चूक बरोबर कशाला बघता? पण भाषेचे सौंदर्य,बिनचूकपणा हे मापदंड लावताना बोली भाषेपेक्षा प्रमाण भाषाच ग्राह्य मानली जाते.

कितीही संस्कृतीचे आक्रमण झाले तरी भाषा टिकून राहील हा आशावाद बाळगून राहणारे लोकही आहेत जे त्यांच्या परीने भाषा जिवंत ठेवायचा प्रयत्न करतात.

हिंदी ही भारताची मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. पण तरीही दक्षिणेतील पट्ट्यात हिंदी नाही तर त्यांची प्रादेशिक भाषाच अभिमानाने मिरवली जाते. तिकडे दिशादर्शक पाट्या पण इंग्लिश आणि दाक्षिणात्य भाषेतच लावलेल्या असतात.

 

hindi IM

 

अतिशय कट्टर अभिमानाने ते आपली भाषा मिरवतात. पण अजून एक वाद खूप जुना आहे. प्राचीन भाषा कोणती? तमिळ की संस्कृत? सुदैवाने तो या भाषांइतका जुना नाहीय. गंमत म्हणजे या वादात बऱ्याच जणांनी हिरीरीने सहभाग घेतला आहे.

राजकीय नेते, लोकसभा सदस्य, नेटकरी मंडळी, दाक्षिणात्य लेखक या सर्वांनी या वादाच्या होमात भाग घेऊन वेगवेगळ्या समिधा टाकत हे वादाचे कुंड धगधगत ठेवले आहे.

खरंच कोणती भाषा आहे प्राचीन? यासाठी आपण थोडे मागे वळून पाहूया.

संस्कृतला गीर्वाणवाणी असे म्हणतात. ही भाषा सर्वात प्राचीन आणि जगातील पहिली भाषा मानली जाते. या भाषेला देव भाषा असेही संबोधले जाते वाणी स्वच्छ आणि स्पष्ट होण्यासाठी संस्कृत भाषा अतिशय उपयुक्त आहे. आणि देवनागरी, हिंदी,बंगाली, मराठी, सिंधी, पंजाबी,नेपाळी या सर्व भाषा संस्कृत मधूनच उत्पन्न झाल्या असे मानले जाते.आपल्या सर्व वैदिक पूजा यज्ञविधी आजही संस्कृत भाषेतच केले जातात.

तसेच काही तज्ञांच्या मते तामिळ भाषा सर्वात प्राचीन आहे  तर काहींचं म्हणणं असं आहे कि संस्कृत ही सर्वात जुनी भाषा असून युरोपियन लोकांनाही या भाषेचा आधार घेतला आहे. या दोन्ही भाषा तशा ५००० वर्ष जुन्या आहेत. 

 

sanskrit_01_inmarathi
patrika

 

१९१६मध्ये तमिळ शुद्धतावादी चळवळीचा उदय झाला. या चळवळीचा उद्देशच होतं तो म्हणजे ही भाषा इतर भाषांच्या विशेषत: संस्कृतच्या प्रभावाखाली येऊ न देणे. मराईमलाई अडीगल यांनी आपले भाषेविषयीचे धोरण स्पष्टपणे मांडले होते.

अडीगल अर्थच महात्मा. त्या काळी त्यांनी एक निवेदन प्रकाशित केले होते, ज्यात असे स्पष्ट सांगितले होते, तमिळ शब्दांखेरीज कोणताही शब्द हा परका किंवा संस्कृत मानला जाईल.

इतकेच नव्हे तर, शुद्ध तमिळ भाषा जतन करण्यासाठी तमिळ भाषेतून इतर भाषेतील शब्द काढून हद्दपार कसे करता येतील हे ही पहिले गेले. त्यासाठी भाषापंडीतानी कितीतरी तमिळ साहित्य खेडोपाडी पोहचवण्याचा चंग बांधला. पण नंतर राजकीय वाद होण्यास हीच गोष्ट कारण ठरली.

शुद्ध तमिळ भाषेचे पुरस्कर्ते संस्कृत भाषेच्या विळख्यातून तमिळ भाषेला सोडवण्यासाठी खूप प्रयत्नशील होते. कारण सामाजिक दृष्ट्या तमिळ भाषिक लोक आर्थिक,सांस्कृतिक आणि राजकीय गुलामगिरीत ठेवले. त्यांची मते संस्कृत विरोधी, हिंदुत्ववादी विचारसरणीच्या विरोधात होती.पण ती हिंदी आणि संस्कृतला पाठींबा देणाऱ्या ब्राह्मण लोकांपेक्षा वेगळी होती.

 

tamil lan im

दक्षिणेतील राज्य हिंदी राष्ट्रभाषेऐवजी स्वतःच्या भाषेवर अधिक प्रेम करतात, असं कशामुळे?

हिंदी Vs. प्रादेशिक भाषा या वादात भर घालतोय चिरंजीवींचा हा व्हायरल व्हिडिओ

कारण त्यांचे म्हणणे होते की, तमिळ भाषेत वेळोवेळी संस्कृत शब्द घुसडण्याचे काम तमिळ ब्राह्मणांनी केले. त्यामुळे त्यांनी तमिळ भाषा दूषित केली तिचे पावित्र्य घालवले असा आरोपच त्यांच्यावर होता.

भारतीय राजकारणात उत्तरेकडील लोकांचा प्रभाव जास्त असल्यामुळे संस्कृत भाषा आपल्या तमिळ भाषेची सरमिसळ करून खिचडी करतील की काय असं त्यांना वाटत असे त्यामुळे त्यांनी आपली मते साफ आणि स्पष्ट विरोधीच ठेवली होती.

हा विरोध इतका वाढला की हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून मान्यता देऊ नये यासाठी तमिळ लोकांनी आंदोलने केली. काही जणांनी तर आत्मदहन सुद्धा केले. आणि हिंदी तिथून हद्दपार केली.

 

hindi oppose im

 

वास्तविक कोणत्याही भाषा या बहिणी बहिणी असल्याप्रमाणेच असतात. एकमेकीचा हात धरून जाता जाता कळत नकळत एकमेकीचा प्रभाव घेऊन अजून सुधारणा होत बदल होत जातात. नकळत एका भाषेतील शब्द आपोआप दुसऱ्या भाषेत पण घेतले जातात. मात्र या कट्टरवादी लोकांनी भाषावाद सतत जगता ठेवला. नंतर तमिळ ही सुद्धा २२ मान्यताप्राप्त भाषांपैकी एक आहे. रसिक लोकांनी काय करायचे? भाषेचा वाद वाढवायचा की तिचा आस्वाद घेऊन आपले जीवन कला साहित्य संगीत यांनी समृद्ध करायचे.. हे आपले आपण ठरवायचे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?