ह्या भारतीय कलाकारांची नाळ पाकिस्तानशी जोडलेली आहे, विश्वास नसेल तर हे वाचाच!
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
पाकिस्तानविषयी प्रत्येक भारतीयाच्या मनात वेगवेगळ्या भावना आहेत, कोणी त्यांना आपला शत्रू मानते तर काहींच्या मते तेथील लोक चांगली आहेत, काहींसाठी हा कट्टर मुस्लिमांचा देश आहे तर काहींसाठी त्यांच्या त्याच आवडत्या मुस्लीम गायकाचा हा देश आहे. असो वेळेनुसार प्रत्येकाचे विचार बदलत असतात. आज आपण भारत-पाकिस्तान नात्याची एक रंजक गोष्ट जाणून घेणार आहोत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण बऱ्याचश्या भारतीय कलाकारांचे पाकिस्तानशी एक अतूट नाते आहे. हे नाते केवळ मनाचे नाही तर रक्ताचे सुद्धा आहे. कारण त्यांचा किंवा त्यांच्या त्यांच्या आईवडिलांचा जन्म हा पाकिस्तान मध्ये झाला आहे. जाणून घेऊया अश्या काही भारतीय कलाकारांविषयी ज्यांची नाळ पाकिस्तानशी जोडली गेली आहे.
१. संजय दत्त
संजय दत्तचे वडील सुनील दत्त पंजाबचे होते, परंतु त्याची आई नर्गिस हिचा जन्म पाकिस्तानच्या रावळपिंडी मध्ये झाला होता. नर्गिस यांचे खरे नाव ‘फातिमा रशीद’ होते.
२. कादर खान
कादर खान यांचा जन्म पाकिस्तान येथील बलुचिस्तान मध्ये झाला होता.
३. कपूर कुटुंबीय
हिंदी चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या कपूर कुटुंबीयांचे पाकिस्तान मधील फैसलाबादशी नाते आहे.
४. शाहरुख खान
जगभरातील लोकांना वेड लावणारा बॉलीवुडचा किंग, शाहरुख खानचे वडील पाकिस्तानच्या पेशावर मधील आहेत. शाहरुख खानचे वडील भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक होते.
५. दिलीप कुमार
ट्रॅजेडी किंगच्या नावाने बॉलीवुड मध्ये प्रसिद्ध असणारे दिलीप कुमार पाकिस्तानच्या पेशावर येथील आहेत. त्यांचे खरे नाव ‘मोहम्मद युसुफ खान’ आहे.
६. गोविंदा
आपल्या मजेशीर अभिनयातून सर्वाना हसवणाऱ्या गोविंदाच्या वडिलांचा जन्म पाकिस्तानच्या गुजरांवाला मध्ये झाला होता.
७. अमरीश पुरी
मोगँबोच्या नावाने प्रसिद्ध असणारे हिंदी चित्रपट सृष्टीतील महान खलनायक अमरीश पुरी यांचा जन्म पाकिस्तान मधील लाहोर येथे झाला होता.
८. राजेंद्र नाथ मल्होत्रा
प्रसिद्ध अभिनेता राजेंद्र नाथ मल्होत्रा पाकिस्तानच्या पेशावर मधील एका पंजाबी कुटुंबातील होते.
९. ऋतिक रोशन
हिंदी चित्रपट सृष्टीचा सुपरहिरो ऋतिक रोशन याचे आजोबा जे. ओम प्रकाश (आईचे वडील) पाकिस्तानच्या रावळपिंडीचे होते.
१०. मदन पुरी
बॉलीवुडचे प्रसिद्ध खलनायक मदन पुरी यांचा जन्म सुद्धा पाकिस्तान मधील लाहोर येथे झाला होता.
११. प्रेम नाथ
प्रेम नाथ यांचा जन्म पाकिस्तान मधील पेशावर येथे झाला होता.
१२. देव आनंद
अभिनयाच्या जगातील दमदार आणि अतुलनीय कलाकार देव आनंद यांचा जन्म पाकिस्तान मधील नरोवल मध्ये झाला होता.
१३. राजेश खन्ना
अमृतसर मध्ये जन्मलेले हिंदी चित्रपटांचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचे आई – वडिल पाकिस्तानच्या वेहारी येथील होते.
१४. बलराज साहनी
हिंदी चित्रपटांतील दिग्गज कलाकार बलराज साहनी पाकिस्तानच्या भेरा, रावळपिंडी येथे जन्मले होते.
१५. चेतन आनंद
प्रसिद्ध दिग्दर्शक चेतन आनंद यांचा जन्म पाकिस्तान मधील लाहोर येथे झाला होता.
१६. अमिताभ बच्चन
बॉलीवुड मधील महानायक अमिताभ बच्चन यांची आई पाकिस्तानच्या फैसलाबाद मधील होती.
१७. विवेक ओबेरॉय
विवेक ओबेरॉय याचे वडील सुरेश ओबेरॉय हे पाकिस्तान मधील क्वेटा येथे जन्मले होते.
१८. साधना शिवदासानी
प्रसिद्ध अभिनेत्री साधना शिवदासानी यांचा जन्म पाकिस्तान मधील कराची येथे झाला होता.
१९. रमेश सिप्पी
बॉलीवुडचा सर्वात प्रसिद्ध चित्रपट ‘शोले’चे दिग्दर्शक रमेश सिप्पी हे पाकिस्तानच्या कराची येथे जन्माला आले होते.
असे हे चित्रपटसृष्टीतील हिरे ज्यांची नाळ जरी पाकिस्तानशी जोडलेली असली तरी त्यांनी जन्मभर भारतीय भूमिचीच सेवा केली.
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page