' टेम्पो ड्रायव्हरच्या मुलाने जग जिंकलंय; वाचा प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारा प्रवास – InMarathi

टेम्पो ड्रायव्हरच्या मुलाने जग जिंकलंय; वाचा प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारा प्रवास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

टेम्पो ड्रायव्हर असलेले वडील, शिवणकाम करून कुटूंबाला हातभार लावणारी आई, बेताची आर्थिक परिस्थिती तरिही त्याने जिद्द सोडली नाही. यापुर्वी अपयशाचे अनेक खाचखळगे अनुभवले तरीही तो थकला नाही. अखेर त्याच्या खडतर परिश्रमांचं फळ त्याला मिळालं आणि यंदाच्या एमपीएससी परिक्षेत राज्यातील प्रथम क्रमांकावर त्याचं नाव कोरलं गेलं. ही गोष्ट आहे सांगलीच्या प्रमोद चौगुलेची! गेले काही दिवस महाराष्ट्रभर या नावाची चर्चा सुरु असताना इनमराठीने प्रमोद यांच्याशी बातचीत केली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

इनमराठी टॉक्सच्या व्यासपीठावर रंगलेल्या या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत स्पर्धा परिक्षा, विद्यार्थ्यांचे भवितव्य, अपयशानंतर पुढे काय? अशा अनेक महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले.

शुन्यातून स्वप्नाकडे

शुन्यातून आपलं विश्व उभं करणाऱ्यांविषयी आपण अनेकदा ऐकतो, वाचतो. प्रमोद चौगुले यांची कथा काही वेगळी नाही. सांगलीच्या कष्टकरी वर्गातील हा मुलगा. स्पर्धा परिक्षा देण्याची इच्छा होती, त्यानुसार त्यादृष्टीने प्रवासही सुरु झाला. मात्र सुरुवातीला अपयश येत होतं. मात्र ध्येय निश्चित असल्याने माघार घेणं शक्य नव्हतं.

 

pramod c im

 

जोडीदाराची साथ

लग्नानंतर शिक्षण ही बाब अनेकांना अशक्य वाटते, मात्र हे सगळे समज मोडीत काढत प्रमोद यांनी लग्नानंतर एमपीएससी परिक्षेसाठी प्रयत्न करत यश मिळवले. अर्थात जोडीदाराच्या साथीशिवाय हा प्रवास पूर्ण होणे शक्यच नसल्याचे तो सांगतो.

पदरी दोन वर्षांची लेक असतानाही जोडीदारावर कुटुंबाची जबाबदारी सोपवत परिक्षेच्या अभ्यासासाठी घरापासून दूर राहण्याचा कठोर निर्णयही घेतला, मात्र त्याचेच फलित म्हणजे राज्यात प्रथम येण्याचा मान त्याने पटकावला.

एवढेच नव्हे तर गेल्या वर्षी प्रमोद यांचे मेव्हणे प्रसाद यांनी एमपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला होता. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत प्रमोदने यंदा तोच विक्रम केला. या प्रवासात प्रसाद यांचेही मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे तो आवर्जून सांगतो.

खरं वाटणार नाही, पण सेलिब्रिटींच्या लग्नाचे कपडे शिवणारा सब्यसाची कधीकाळी आत्महत्या करणार होता

चौथ्या मजल्यावरून पडली, पाय मोडले, पण हिंमत तशीच राहिली; जबरदस्त प्रेरणादायी गोष्ट

फारशा सुविधा हाती नसूनही अगम्य इच्छाशक्तीच्या बळावर प्रमोद यांनी हे यश मिळवले, मात्र हा प्रवास सोपा नसल्याने अनेक विद्यार्थी माघार घेतात, अनेकांना नेमकी किती वर्ष यशाची वाट पहावी हे कळत नाही, पर्यायाने भवितव्य टांगणीला लागते. या सर्व विद्यार्थ्यांना प्रमोदनने अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले आहे.

प्रमोदने विद्यार्थ्यांना कोणता सल्ला दिला? यशाचा कोणता कानमंत्र त्यांनी दिलाय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ नक्की पहा.

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?