करोडोंची मर्सिडीज १० जणांनी ढकलूनही शेवटी सुरु झालीच नाही, कारण…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
एकेकाळी एखाद्याकडे कार असणं ही चैनीची गोष्ट समजली जात असे. आजही कार घेऊन ती मिरवण्यातली क्रेझ जराही कमी झालेली नाही. मात्र काळ बदलला तशी पूर्वी अगदी मोजक्या, श्रीमंत लोकांकडे दिसणारी कार कधी सर्वसामान्यांसाठी केवळ स्टेट्स सिम्बॉलच न राहता गरजही झाली ते लक्षातच आलं नाही.
गाडी असली की कमी वेळात प्रवास होतो. गाडी किती दिमाखदार, जास्त मायलेज देणारी आहे असा सगळा विचार ती खरेदी करण्यापूर्वी केला जातो, पण सुरू असताना वेगात पुढे नेणारी हीच कार बंद पडल्यावर हलवायला एक दोन नाही तर चक्क दहा जण लागत असतील तर?
सहसा कारची बॅटरी संपते तेव्हा त्याचा गिअर आणि लिव्हर क्लच एंगेज असताना ती ढकलून सुरू करणे या प्राथमिक तोडग्याचा विचार पहिल्यांदा मनात येतो.
कॉम्पॅक्ट सेडन, SUV किंवा हॅचबॅकची छोटी कार असेल तर हे करणं तसं सोपं असतं. पण जर फुल साईझ SUV कार असेल आणि ती बंद पडली तर ती ढकलायला प्रचंड ताकद लागते.
अशाच प्रकारची एक घटना नवी दिल्ली येथे घडली आहे. एका Mercedes-Benz G-Class कारची बॅटरी संपल्यावर ती पुन्हा सुरू करण्यासाठी १० माणसांना ती ढकलावी लागली.
या घटनेचा व्हिडियो इंस्टाग्रामच्या ‘supercars_in_india’ या पेज वर अपलोड केला गेला आहे. या व्हिडियोत आपल्याला दहा माणसं पांढऱ्या रंगाची Mercedes-Benz G-Class ढकलताना दिसतात.
View this post on Instagram
ही जगातली एक अत्यंत वजनदार आणि पॉवरफुल कार आहे. या कारचं वजन जवळपास २.५ टन असल्यामुळे, उंच आणि बॉक्ससारखी रचना असल्यामुळे ही SUV कार ढकलणं अत्यंत अवघड जातं.
या महाकाय कारची बॅटरी संपल्यावर एरव्ही ज्या प्रकारे SUV कार ढकलून ती सुरू केली जाते तसं करण्याखेरीज माणसांकडे पर्याय उरला नाही.
एका गोष्टीची मात्र या माणसांना कल्पना नव्हती. ती म्हणजे, ज्या वाहनाला ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असतं ते वाहन नुसतं ढकलून सुरू होत नाही.
ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या बाकी सगळ्याच वाहनांप्रमाणे Mercedes-Benz G-Class या कारला तिच्या गिअर बॉक्समध्ये ओपन क्लच आहे आणि क्लच पेडल मिळत नाही. या दोन कारणांमुळे कारचं इंजिन सुरू होऊ शकत नाही.
—
- पेट्रोल वाचवण्याच्या, कोणालाही माहित नसलेल्या ६ भन्नाट टिप्स!
- सावधान! पेट्रोल पंपावर अशा ७ पद्धतीने फसवणूक केली जाते!
—
अशी एकूण स्थिती असताना ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या वाहनाची बॅटरी संपली तर ते सुरू करण्याची एकमेव पद्धत म्हणजे ते जंप स्टार्ट करणे.
वाहनाची बॅटरी जंप स्टार्ट करायची असेल तर त्यासाठी काय करावं लागतं?
वाहनाची बॅटरी जंप स्टार्ट करायची असेल तर तुम्हाला आवश्यक्ता असते ज्या वाहनाची बॅटरी सुरू आहे अशा दुसऱ्या वाहनाची. वाहन सुरू करण्याच्या प्रक्रियेतली पहिली पायरी म्हणजे बूस्टर केबल्सच्या सहाय्याने बॅटऱ्यांचे टर्मिनल्स जोडणे.
अशा रीतीने दुसऱ्या कारच्या चालू बॅटरीमधली ऊर्जा बंद पडलेल्या बॅटरीत हस्तांतरित केली जाते. मात्र हे करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
ज्या वाहनाच्या बॅटरीतून बंद पडलेल्या बॅटरीत ऊर्जा हस्तांतरित करायची असेल त्या वाहनाच्या बॅटरीचा वोल्टेज ज्या वाहनांची बॅटरी बंद पडली आहे तिच्यापेक्षा जास्त असता कामा नये. शिवाय, शॉर्ट सर्किट होणं टाळण्यासाठी या दोन्ही वाहनांमध्ये सुरक्षित अंतर राखलं गेलं पाहिजे.
एकूणच सगळा सावळा गोंधळ आहे! एखादं वाहन भारीतलं आहे म्हणजे त्याचे केवळ फायदेच असतील असं नाही.
आपल्याला जर त्या वाहनाची पुरेशी माहिती नसेल तर ते वाहन बिघडल्यावर ते दुरुस्त करण्याच्या नादात आपण आपल्याला असलेल्या अर्धवट माहितीच्या आधारावर गोष्टी करायला जाऊ आणि यात आपला वेळ आणि मेहनत दोन्ही वाया जाऊ शकतं हेच आपल्याला वरच्या उदाहरणातून लक्षात येतं. त्यामुळे यापुढे कुठलंही वाहन खरेदी करताना आधीपेक्षाही अधिक जागरूकतेने त्याची व्यवस्थित माहिती करून घेऊया.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.