४६०० रुपयांच्या या ॲपल वॉटर बॉटल मध्ये काय आहे खास?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
पाणी हा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला अविभाज्य घटक. इतका की, पाण्याला ‘जीवन’ असंही म्हणतात हे आपण जाणतो. पाणी ही अतिशय मौल्यवान गोष्ट असली तरी आपण रोजच पाणी वापरत असल्यामुळे आपल्याला बऱ्याचदा पाण्याचं म्हणावं तितकं महत्त्व नसतं.
आपण आवश्यक तितकंच पाणी न वापरता ते नासवतो आणि पाण्याच्या अशा बेसुमार वापरामुळे आणि दुष्काळासारख्या आपत्तींमुळे पाणीटंचाई सारखी समस्या निर्माण होते. पाणी महागलंय असं आपण म्हणतो.
तिसरं महायुद्ध हे पाण्यावरूनच होईल असंही म्हटलं जातं. पण ॲपल ने काढलेल्या महागड्या वॉटर बॉटल वरून पाणी महागणं म्हणजे काय हे सोडाच पण ज्यातून हे पाणी प्यायचं त्या बाटल्यांच्या किंमती पाहूनच आपल्याला घाम फुटेल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
स्मार्ट फोन्सची निर्मिती करणाऱ्या ॲपल कंपनीने HidrateSpark नावाची चक्क ‘स्मार्ट वॉटर बॉटल’ लॉन्च केली आहे. जगातल्या या सगळ्यात स्मार्ट वॉटर बॉटलच्या किंमती ४,६०० रुपयांपासून सुरू होतात. शेकड्यांच्या किंमती असलेल्या मेटलच्या थर्मासच्या बाटल्या आपल्यातले बरेच जण हल्ली वापरतात.
आपल्यातल्या बहुतेकांना या स्मार्ट वॉटर बॉटलच्या किंमतीचा हा आकडा पाहून धक्का बसला नाही तर नवलच! ॲपलच्या या इतक्या महागड्या ‘स्मार्ट वॉटर बॉटल’ची खासियत आहे तरी काय? ती कुठल्या सुविधा पुरवते? जाणून घेऊ.
याआधी ॲपल या अमेरिकास्थित ट्रिलियन डॉलर कंपनीने त्याच्या पॉलिशिंग क्लोथचं अनावरण केलं ज्याचीच किंमत १,९०० रुपये आहे. ॲपलच्या वेबसाईटवर HidrateSpark वॉटर बॉटल सूचिबद्ध करण्यात आली असून अमेरिकेतल्या दुकानांमध्ये ती ५९.९५ डॉलर्स म्हणजेच सुमारे ४,६०० रुपयांना उपलब्ध झाली आहे.
सुदैवाने केवळ अमेरिकेच्याच बाजारांमध्ये ती सध्या उपलब्ध आहे. या स्मार्ट वॉटर बॉटल्सचे एकूण ४ प्रकार उपलब्ध आहेत. Hidrate Spark ३, HidrateSpark PRO (Tritan Plastic Sea Glass), HidrateSpark STEEL Chug + Bonus Straw Lid आणि HidrateSpark PRO STEEL Smart Water Bottle असे ते ४ प्रकार असून त्यांच्या किंमती अनुक्रमे ५९.९५ डॉलर (सुमारे ४,६०० रुपये), ५९.९५ डॉलर (सुमारे ४,६०० रुपये), ६९.९५ डॉलर (सुमारे ५,४०० रुपये) आणि ७९.९५ डॉलर (सुमारे ६,१२५ रुपये) अशा आहेत.
Hidrate Spark ३ ही बाटली पांढऱ्या, काळ्या आणि पिवळ्या रांगांमध्ये उपलब्ध आहे. HidrateSpark STEEL आणि PRO STEEL या बाटल्या चांदीच्या आणि काळ्या रंगांत उपलब्ध आहेत. HidrateSpark PRO ही बाटली सी-ग्लास आणि काळ्या या रंगांमध्ये उपलब्ध आहे.
या बाटल्यांशी सुसंगत असलेली साधने :
ॲपल आयफोन्स, १२.३ iOS ची घड्याळं, watchOS ४.३ आणि त्याच्या वरच्या व्हर्जन्सशी HidrateSpark PRO आणि PRO STEEL या बाटल्या सुसंगत आहेत. Hidrate Spark ३ ही बाटली iOS १३ आणि watchOS ४.३ किंवा त्याच्या पुढल्या व्हर्जन्सशी सुसंगत आहे. तर HidrateSpark STEEL ही बाटली iOS १२ आणि watchOS किंवा त्याच्या पुढच्या व्हर्जन्सशी सुसंगत आहे.
HidrateSpark STEEL, PRO आणि PRO STEEL या बाटल्या चग लीड, स्ट्रॉ असलेलं झाकण आणि पटापट चार्ज होण्याची क्षमता असलेल्या रिचार्जेबल बॅटरीच्या सुविधांसह उपलब्ध आहेत. या बाटल्यांच्या निर्मात्यांकडून या चारही मॉडेल्सना १०० दिवसांची वॉरेंटी मिळते.
आता या HidrateSpark वॉटर बॉटलच्या खासियती जाणून घेऊ.
१. ही HidrateSpark वॉटर बॉटल तुम्ही रोज किती पाण्याचं किंवा द्रव पदार्थाचं सेवन करताय यावर लक्ष ठेवू शकते आणि ते वापरकर्त्यांच्या ‘ॲपल हेल्थ’शी समक्रमित करते. ब्लूटूथद्वारे वापरकर्ते त्यांच्या स्मार्ट बॉटल्स HidrateSpark ॲपशी सहजगत्या जोडू शकतात.
२. या बाटलीला स्टेनलेस स्टीलचं, पोकळी उष्णतारोधक (व्हॅक्युम इन्स्युलेटेड) चग असतं जे बाटलीत ठेवलेला द्रवपदार्थ २४ तासांपर्यंत थंड ठेवतं. या बाटलीच्या तळाशी LED स्मार्ट सेन्सर असतं जे वापरकर्त्याने किती पाण्याचं सेवन केलंय याचा मागोवा घेतं आणि त्याची नोंद ठेवतं आणि ब्लूटूथद्वारे ॲपल हेल्थला त्याविषयी सावध करतं.
३. या ॲपद्वारे ॲपल युजर्स अगदी सहजपणे आपण रोज किती पाणी पितोय याचा मागोवा घेऊ शकतात आणि रोजचं ‘हायड्रेशन गोल’ ऍडजस्टही करू शकतात. वापरकर्ते आपण ॲपल वॉचचा किती वापर केलाय याचाही मागोवा घेऊ शकतात आणि पाण्याच्या सेवनाचं संपादन करू शकतात.
४. बाटलीला असलेल्या सुरक्षित नळीच्या आवरणामुळे अस्वच्छतेचा धोका टळतो आणि त्याला असलेलं लॉक घाण आणि जंतूना आत शिरकाव करू देत नाही. गळती होऊ देण्यालाही यामुळे आळा बसतो.
–
‘थर्मास’ कंपनीचं नाव आहे, पाणी गरम ठेवणाऱ्या बाटलीचं खरं नाव आहे वेगळंच
‘कोलेस्ट्रॉलला’ दूर ठेवण्यासाठी महागड्या तेलाऐवजी “ह्या” गोष्टी आजमावून बघाच!
–
आपल्या देशातली गरीब, श्रीमंत आणि मध्यमवर्गीय यांच्यातली प्रचंड तफावत पाहता देशातल्या अतिश्रीमंत म्हणवल्या जाणाऱ्या माणसांकडे भविष्यात या ‘स्मार्ट वॉटर बॉटल्स’ आल्या तरी त्याचं कुणाला काही आश्चर्य वाटणार नाही.
भारतात या बाटल्या आल्या तरी आपल्या खिशाला काही त्या परवडणार नाहीत. त्यामुळे आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं केवळ माहिती हवी म्हणून किंवा कुतूहलापोटी या बाटल्यांच्या किंमती आणि त्यांच्यामुळे वापरकर्त्यांना होणारे लाभ याविषयी जाणून घेऊ शकतात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.