देशात धर्मावरून गढूळ झालेलं वातावरण, पण काश्मीरात लोकांची मनं जिंकणारी भारतीय आर्मी!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
राज ठाकरे यांनी त्यांच्या एका सभेतून मशिदीवर लागणाऱ्या भोंग्याचा विषय काढला आणि लगेचच सगळीकडे अजान विरुद्ध हनुमान चालीसा हे युद्ध पेटलेलं आपण पाहिलं.
महाराष्ट्रात तर या एका गोष्टीवरुन एकंदरच वातावरण कसं गढूळ झालं आहे ते आपण बघतो आहोच. राणा दांपत्य यांनी मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा पठण करण्याचं आव्हान केलं आणि शिवसेनेने ‘आलं अंगावर घेतलं शिंगावर’ करत त्यांचा डाव हाणून पाडला.
कित्येक राजकीय नेत्यांनी हनुमान चालीसा आणि अजान यावरून होणाऱ्या वादाला खतपाणी घातलं तर काहींनी कठोर शब्दात या सगळ्याची निंदा केली.
विरोध हा मशिदीवरील भोंग्याला होता, प्रार्थना करण्याला कधीच कुणाचा विरोध नव्हता आणि नसेलही, तरी यावरून उठलेलं वादळ हे खूप दुर्दैवी आहे.
याच सगळ्या वातावरणात मात्र काल एक फोटो व्हायरल झाला आणि त्या एका फोटोने कित्येक भारतीयांची मनं जिंकली. सोशल मीडियावर तो फोटो सगळीकडे फिरू लागला. “हा खरा भारत” असं म्हणत लोकांनी त्याचं कौतुक केलं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
तो फोटो म्हणजे भारतीय आर्मीचा काश्मीर मध्ये नमाज पठण करतानाच फोटो. हो हो अगदी बरोबर वाचलंत तुम्ही, भारतीय आर्मीचा नमाज पडतानाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे रमजानच्या या पवित्र महिन्यात भारताचे जवान आणि लेफ्टनंट जनरल डीपी पांडे यांचा नमाज पठण करतानाचा हा फोटो विविधतेत एकता हा खरा संदेश आपल्या भारतीयांपर्यंत पोहोचवत आहेत.
—
- भारतीय सेनेचं ते “सीक्रेट-मिशन” ज्यामुळे आणखी एक राज्य भारतात विलीन झालं
- भारतीय सैन्याच्या या स्पेशल फोर्सचे ट्रेनिंग म्हणजे केवळ “अग्निदिव्य”!
—
डीपी पांडे आणि त्यांचे जवान श्रीनगर इथल्या एका इफ्तारमध्ये सहभागी झाले, तिथे एका पुस्तकाचे प्रकाशनदेखील होणार होते, त्याआधी या सर्वांनी तिथे नमाज पठण करून भाऊबंधकीचा संदेश तिथल्या स्थानिक लोकांना दिला.
२५ एप्रिल रोजी हा फोटो शेयर करण्यात आला ज्याला २४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले, तसेच काही हजारांनी हा फोटो पुन्हा शेयर केला.
माजी IPS अधिकारी विजय शंकर सिंह यांनी हा फोटो शेयर करत लिहिले की “भारतीय सैन्य अजूनही कट्टरतेच्या विषाणूपासून बरंच दूर आहे ही आनंदाची आणि दिलासा देणारी गोष्ट आहे!”
यह खुशी और राहत की बात है कि भारतीय सेना, धर्मांधता और कट्टरपंथ के वायरस से अभी बची हुई है। तस्वीर में, लेफ़्टिनेंट जनरल डी पी पांडे हैं, जो श्रीनगर में रमज़ान के दौरान मुस्लिम व ग़ैर मुस्लिम सैनिकों व अधिकारियों के साथ नमाज़ पढ़ते हुए नज़र आ रहे हैं।
जय हिंद !! pic.twitter.com/6SIRLz08Ea— Vijay Shanker Singh IPS Rtd (@vssnathupur) April 25, 2022
याआधी जेव्हा भारतीय सेनेच्या PRO च्या ट्विटर हँडलवरुन इफ्तारचे फोटो टाकले जायचे तेव्हा त्यांच्यावर आक्षेप घेऊन ते डिलिट करावे लागायचे, पण या फोटोने आणि त्यावर येणाऱ्या लाईक्सनी हे सिद्ध केलंय की कोणत्याही दबावाशिवाय लोकं आता व्यक्त होत आहेत.
एकंदर काश्मीरमधली परिस्थितिसुद्धा सुधारत असून, हा फोटो काश्मीरच्या सामाजिक परिस्थितिला एक वेगळी कलाटणी देणारा ठरेल हे नक्की. आजवर काश्मीरमध्ये भारतीय आर्मीबद्दल जे काही उलट सुलट बोललं गेलं आहे त्यावर हा फोटो म्हणजे एक सणसणीत चपराक ठरला आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यात सध्या एकमेकांच्या धर्माविषयी, आस्थेविषयी एकप्रकारचा द्वेष निर्माण होत आहे, राजकीय पक्ष आणि नेते हे फक्त आपल्या स्वार्थासाठी त्याचा वापर करत आहेत आणि या अशा गढूळ वातावरणात भारतीय आर्मीच्या या कृतीने मात्र करोडो भारतीयांच्या मनात स्वतःचं एक अढळ स्थान निर्माण केलं आहे!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.