' “ऐतिहासिक गद्दार”: या देशद्रोह्यांच्या विश्वासघातामुळे परकीय भारतावर राज्य करू शकले – InMarathi

“ऐतिहासिक गद्दार”: या देशद्रोह्यांच्या विश्वासघातामुळे परकीय भारतावर राज्य करू शकले

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

इतिहासाच्या पुस्तकात आपण सगळेच १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्याविषयी शिकलो आहोत.

मंगल पांडे ह्यांनी सुरुवात केलेल्या ह्या उठावामध्ये राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, नानासाहेब , बख्त खान, बहादूर शाह झफर, जंग बहादूर राणा, बेगम हजरत महल, वीर कुंवर सिंह ह्यांच्यासह अनेकांनी आपल्या प्राणांची बाजी लावून जुलमी ब्रिटीश सरकारला कडवा लढा दिला.

 

1857-war-marathipizza
kamat.com

भलेही हा उठाव संघटीत नव्हता, तरी ह्या उठावाने इंग्रज सरकार हादरले नक्कीच होते आणि काही काळ हा लढा असाच सुरु राहिला असता आणि देशातल्या सर्वांनीच ह्या लढ्यात भाग घेतला असता व आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी १९४७ साल उजाडावे लागले नसते.

इंग्रजांनी आपल्यावर जुलूम केले. आपल्या देशातील सर्व संपत्ती लुटून नेली. आपल्यावर तब्बल १५० वर्ष गुलामगिरी लादली ह्याच्या कथा आपण अनेक पुस्तकांमध्ये वाचतो. पण ह्या सगळ्याला फक्त इंग्रजच जबाबदार नव्हते.

आपल्यावर इतक्या काळ गुलामगिरी गाजवलेल्या इंग्रज सरकार इतकेच जबाबदार होते आपल्याच देशातील स्वार्थी लोक…ज्यांनी स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी किंवा स्वत:च्या सत्तेच्या हव्यासापायी गद्दार होऊन इंग्रजांना मदत केली.

असं म्हणतात “घरका भेदी लंका ढाये” म्हणजेच आपल्या सर्वनाशाला आपल्याच जवळचे लोक कारणीभूत असतात. जे क्षणिक स्वार्थासाठी घराचे किंवा देशाचे मोठे नुकसान करतात.

आज आपण अशाच काही देशद्रोह्यांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढणे सोडून स्वतःच्या स्वार्थासाठी इंग्रजांचे लांगूलचालन करणे पसंत केले.

 

मीर जफर

mir-jafar-marathipizza
en.wikipedia.org

गद्दारांमध्ये मीर जफर ह्याचे नाव पहिल्या क्रमांकावर येते. बंगालचे नवाब सिराज –उद-दौला ह्यांना जेव्हा इंग्रजांच्या एकूण हालचालीवरून वाटले की ह्यांचे हेतू बरोबर नाहीत तेव्हा त्यांनी इंग्रजांच्या शक्तीला आळा घालण्यासाठी काही ठोस उपाययोजना केल्या. ह्यामुळे ईस्ट ईंडीया कंपनीमध्ये हल्लकल्लोळ माजला.

इंग्रजांनी आपली गेलेली शक्ती परत मिळवण्यासाठी सिराज-उद-दौला ह्यांना युद्धाचे आव्हान दिले. तेव्हा प्लासी ची लढाई झाली.

ह्या लढाई मध्ये नवाबाच्या सेनापती मीर जाफरने नवाबाचा विश्वासघात करून इंग्रजांना साथ दिली कारण त्याला बंगालचा नवाब व्हायचे होते. मीर जफरच्या देशद्रोहामुळे नवाबाचा पराजय झाला आणि सत्ता मीरच्या व पर्यायाने इंग्रजांच्या हातात गेली.

 

जमीनदार

 

jamindar-marathipizza
dsatadru.blogspot.in

भारतात असे अनेक जमीनदार होते ज्यांनी क्रांतीकारकांना मदत न करता इंग्रज सरकारला मदत केली. त्यांनी वेळोवेळी इंग्रज सरकारला जमीन, पैसे इतकेच नव्हे तर प्रसंगी सैन्याची सुद्धा मदत केली.

जमीनदारांच्या अशा वागण्याचे कारण असे की त्यांना त्यांच्या हातातली सत्ता जाऊ द्यायची नव्हती. भारत स्वतंत्र झाल्यावर त्यांना त्यांची सत्ता आणि जमीन भारत सरकारकडे सुपूर्त करावी लागली असती.

ह्या अशा स्वार्थापायी त्यांनी इंग्रज सरकारची गुलामगिरी स्वीकारली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

जयचंद

 

jaychand-marathipizza
gyandarpan.com

इतिहासात राजपूत राजे आणि सरदार ह्यांच्या पराक्रमाच्या कथा आपण नेहमीच ऐकतो, वाचतो. पण ह्या राजपुतांमध्ये एक असाही देशद्रोही जन्माला आला होता ज्याने स्वार्थापायी भारताचे अपरिमित नुकसान केले.

हिंदीमध्ये देशद्रोह्यांसाठी एक म्हण आहे “जयचंद तूने देश को बर्बाद कर दिया. गैरों को ला कर हिंद में आबाद कर दिया”. ही म्हण कनौज चा राजा जयचंद ह्याच्यावरून लिहिली गेली आहे.

इतिहासकारांच्या मते वीर योद्धा पृथ्वीराज चौहान ह्यांचे जयचंद ह्यांची मुलगी संयोगिता हिच्यावर प्रेम होते. राजा जयचंदला मात्र हे मान्य नव्हते. मात्र संयोगीतालाही पृथ्वीराज चौहान ह्यांच्याशीच लग्न करायचे होते.

 

Prithviraj-Chauhan-Statue-with-Sayongita-marathipizza
gajabkhabar.com

जयचंदने हे होऊ नये म्हणून संयोगीताचे स्वयंवर ठरवले व अनेक देशातल्या राजे महाराजे व राजकुमारांना निमंत्रण पाठवले. पण पृथ्वीराज चौहान ह्यांना मात्र निमंत्रण दिले नाही. उलट त्यांचा पुतळा बनवून दाराजवळ पहारेकरी म्हणून ठेवला.

स्वयंवराच्या दिवशी संयोगिता हार घेऊन इतर सर्व लग्नेच्छू राजांना टाळून सरळ द्वाराजवळ गेली आणि पृथ्वीराज ह्यांच्या पुतळ्याच्या गळ्यात हार घातला. त्या पुतळ्यामागेच लपून बसलेल्या पृथ्वीराज चौहानांनी तिला सरळ उचलले आणि घोड्यावर बसून ते दोघे निघून गेले.

ह्यामुळे जयचंद चिडला व पृथ्वीराज चौहान ह्यांचा बदल कसा घेता येईल ह्या संधीच्या शोधात राहिला.

असं म्हणतात की अफगाणिस्तानचा शासक महमद घोरीला भारतावर आक्रमण करण्यासाठी जयचंदनेच आमंत्रण पाठवले होते. ह्यामुळेच तराइनचे युद्ध झाले ज्यात पृथ्वीराज चौहान ह्यांचा मृत्यू महमद घोरी मुळे झाला.

 

जयाजीराव सिंधिया

 

the_Maharajah_Scindia_of_Gwalior-marathipizza
en.wikipedia.org

ग्वाल्हेर घराण्याचे जयाजीराव सिंधिया ह्यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. परंतू ह्याच जयाजीराव सिंधिया ह्यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीय क्रांतीकारकांना मदत न करता ब्रिटिशांना मदत केली.

त्यांनी आपले सैन्य राणी लक्ष्मीबाई व तात्या टोपे ह्यांचा विरोध करण्यासाठी वापरले होते. ते इंग्रजांच्या बाजूने होते म्हणूनच इंग्रजांनी त्यांच्या निष्ठेसाठी त्यांना Knights Grand Commander हा किताब दिला होता.

 

पटीयाळ्याचे महाराजा नरेंद्र सिंह

 

Narinder-singh-marathipizza
sikh-heritage.co.uk

१८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात देशातल्या अनेकांनी भाग घेतला होता. पंजाब येथे शिखांनी जुलुमी इंग्रज राजवटीविरुद्ध बंड पुकारले होते.

हेच बंड मोडून काढण्यासाठी पतियाळाचे महाराज नरेंद्र सिंह, कपुरथलाचे राजा रणधीर सिंह आणि जीन्दचे राजा सरूप सिंह ह्यांनी इंग्रजांना मदत केली.

शिखांचा लढा मोडीत काढण्यासाठी ह्या तिघांनी इंग्रज सरकारला शस्त्रास्त्रे व सैन्याची मदत केली.

 

राय बहादूर जीवन लाल (नारनौल)

 

ray-bahadur-jievan-lal-marathipizza
ritishmuseum.org

राय बहादूर जीवन लाल ह्याचे वडील राजा रघुनाथ बहादूर हे औरंगझेबाचे मुख्यमंत्री होते. ते इंग्रजांना जाऊन मिळाले आणि नंतर मुघल राजवट संपुष्टात आली. त्यानंतर राय बहादूरने सुद्धा इंग्रजांना मदत केली आणि भरतपूर संस्थान इंग्रजांच्या सत्तेखाली आले.

असे हे जुने देशद्रोही.

ह्यांच्यावरून हल्लीच्या देशद्रोह्यांनी धडा घेतला नाही तर परत भारताचे नुकसान होऊ शकते हे त्यांना कधी कळणार!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?