' भाजप कार्यकर्त्याची हत्या असो किंवा मनसेला धमकी, वादग्रस्त PFI संघटना – InMarathi

भाजप कार्यकर्त्याची हत्या असो किंवा मनसेला धमकी, वादग्रस्त PFI संघटना

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महाराष्ट्रातील मशिदींवरील लाऊडस्पीकर वरून सुरू असलेला वाद आता काही थांबताना दिसत नाही. २ एप्रिल रोजी मुंबई येथील शिवाजी पार्क मध्ये झालेल्या सभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच इशारा दिला होता की, जर ईदपूर्वी मशिदींमधून लाऊडस्पीकर काढले  गेले नाहीत, तर आम्ही पण त्याच मशिदीसमोर लाऊडस्पीकर वरून हनुमान चालिसाचे पठण करु.

राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर आता पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) या इस्लामिक संघटनेची प्रतिक्रिया आली आहे. त्यात पीएफआयचे अध्यक्ष मतीन शेखानी यांनी म्हटले आहे की, जर तुम्ही आम्हाला छेडले तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही…!तसेच मतीन शेखानी पुढे म्हणाले की, मशिदींवर लावण्यात आलेल्या लाऊडस्पीकरला जर हात ही लावला तर तुमची गाठ सरळ आमच्याशी असणार आहे.

raj thackrey 3 IM

मुंबईला लागून असलेल्या ठाणे ग्रामीण भागातील मुंब्रा या मुस्लिमबहुल भागात शुक्रवारच्या नमाजानंतर मतीन शेखानी एका जाहीर सभेला संबोधित करत होते. मतीन हे मुंब्राचे पीएफआई चे अध्यक्ष आहेत.

या सभेवेळी त्यांनी अनेक वादग्रस्त विधाने पण दिली. ते म्हणाले की, मध्य प्रदेश आणि राजस्थानसह अन्य राज्यांमध्ये रामनवमीच्या मिरवणुकांवर झालेल्या हल्ल्यानंतर ज्याप्रकारे मुस्लिम वस्त्यांना लक्ष्य केले जात आहे, ते योग्य नाही. तसेच आपल्याला माहित आहे का, पीएफआई या संघटनेचा अनेक दंगलीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हात असल्याचे, बऱ्याचदा समोर आले आहे. चला तर जाणून घेऊया पीएफआई या संघटनेबद्दल..

● पीएफआई नेमके आहे तरी काय?

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआई (PFI) ही एक अतिरेकी इस्लामिक संघटना आहे. जी स्वतःला मागासलेल्या आणि अल्पसंख्याकांसाठी आवाज उठवणारी संघटना म्हणून वर्णन करते. नॅशनल डेव्हलपमेंट फ्रंट (NDF) या पार्टीची उत्तराधिकारी म्हणून २००६ मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. या संस्थेचे मूळ कालिकत, केरळ येथे असून याचे मुख्यालय शाहीन बाग, दिल्ली येथे आहे.

pfi im

मुस्लिम संघटना असल्याकारणाने या संघटनेचे बहुतांश उपक्रम मुस्लिमांभोवतीच फिरतात, जसे की मुस्लिम आरक्षणासाठी या संघटनेने रस्त्यावर उतरून अनेक मोठ-मोठे आंदोलन केले आहेत.

२००६ मध्ये दिल्लीतील राम लीला मैदानावर या संघटनेच्या वतीने राष्ट्रीय राजकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याचदरम्यान ही संघटना प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्यानंतर या परिषदेला मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थिती नोंदवली होती.

सध्याच्या घडीत बोलायचे झाले तर, आज देशातील एकूण २३ राज्यांमध्ये पीएफआई ने आपली उपस्थिती नोंदवली असून, या सर्व भागांमध्ये ते आपली वेगवेगळे उपक्रम आणि गतिविधी राबवत आहे. जर आपण त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल बोललो, ही संघटना स्वतःला न्याय, स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेची पुरस्कर्ते म्हणून प्रदर्शित सांगते आणि वेळोवेळी मुस्लिमांवर होणारे अत्याचार उघड करते. पण सत्य अगदी उलट आहे.

● पीएफआई आणि त्याच्याशी संबंधित वाद :-

पीएफआय ही सिमीची म्हणजेच स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाची बी विंग आहे, असे म्हटले जाते. राष्ट्रीय तपास यंत्रणा(NIA) या संघटनेचे ISIS आणि SIMI सोबतच असलेले संबंधविषयी पुरावे शोधत आहेत. पीएफआई चे काही सदस्य पूर्वी सिमीचे सक्रिय कार्यकर्ते होते.

सिमीची स्थापना १९७७ मध्ये झाली होती आणि २००६ मध्ये त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर लगेचच शोषित मुस्लिम, आदिवासी आणि दलितांच्या हक्कांच्या नावाखाली पीएफआयची स्थापना करण्यात आली. या संघटनेचे कामकाज सिमीसारखेच असल्याचे अनेकदा समोर आले आहे.

pfi im 1

एका मीडिया रिपोर्टनुसार, पीएफआयचे राष्ट्रीय सरचिटणीस अब्दुल रहमान हे यापूर्वी सिमीचे राष्ट्रीय सचिव होते. तर पीएफआयचे संगठन सचिव अब्दुल हमीद यापूर्वी २००१ मध्ये सिमीमध्ये याच पदावर होते.

याशिवाय पीएफआयवर इतरही अनेक प्रकारचे आरोप आहेत. अनेक राजकीय हत्या आणि धर्मांतराच्या प्रकरणातही या संघटनेचा हात असल्याचा आरोप आहे. एका रिपोर्टनुसार, लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये पीएफआयची भूमिका प्रमुख असल्याचे मानले जात आहे. केरळमध्ये २०१७ मध्ये पोलिसांनी लव्ह जिहादची ९४ प्रकरणे एनआयएकडे सोपवली होती.

लव्ह जिहादच्या या प्रकरणांमागे पीएफआयच्या ४ सदस्यांचा हात असल्याचे समोर आले होते. NIA ला संशय आहे की ९४ पैकी २३ विवाह पीएफआई ने त्यांच्या देखरेखीखाली केले होते.

love jihad 2 inmarathi

हिजाब हलाल नंतर मुस्लिमांची मक्तेदारी असलेल्या या व्यवसायावर बंदी?

मशिदींवरील भोंग्यावर मनसेच नव्हे तर जावेद अख्तरसुद्धा विरोधात होते

पीएफआई वर असलेले प्रमुख आरोप :-

१) केरळमध्ये आरएसएस आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या. २) प्रोफेसर टीजे जोसेफ यांचा हात कापल्याच्या प्रकरणात १३ पीएफआय कार्यकर्ते दोषी आढळले होते. ३) बीजेपीचे युवा मोर्चा अध्यक्ष आणि लोकसभा खासदार तेजस्वी सूर्याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी पीएफआयशी संबंधित ६ जणांना अटक करण्यात आली होती. ४) CAA विरोधी निदर्शने दरम्यान हिंसा भडकावणे ५) NIA लव्ह जिहादच्या २३ प्रकरणांचा तपास करत आहे ६) ४७ पीएफआई सदस्य २०२० च्या दिल्ली दंगलीशी संबंधित आहेत.

caa protest inmarathi

याचबरोबर नागरिकता संशोधन च्या वेळी देशामध्ये अनेक ठिकाणी हिंसक दंगली घडल्या होत्या. या सर्व दंगलीमधून बहुतेक दंगलीमध्ये पीएफआई चे प्रत्यक्ष सहभाग असल्याचे समोर आले होते. तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या ट्रिपल तलाक आणि हिजाब विवादामध्ये देखील या संघटनेच्या लोकांनी अनेक विवादित विधाने आणि कृत्ये केली होती.

● पीएफआईवर येऊ शकते बंदी :-

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने पीएफआयवर बंदी घालण्याची पूर्ण तयारी केली आहे. त्याची अधिसूचना लवकरच म्हणजेयेत्या काही दिवसांमध्ये जारी होऊ शकते.

banned inmarathi

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोदी सरकार लवकरच इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) वर बंदी घालू शकते, या संघटनेवर गेल्या आठवड्यात रामनवमी दरम्यान देशाच्या काही भागांमध्ये हिंसाचार आणि जातीय तणाव भडकवल्याचा आरोप आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?