बॉस असावा असा; कर्मचाऱ्यांना दिली BMW भेट, पण त्यांनी असं केलं तरी काय?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आजच्या स्पर्धेच्या युगात तुम्ही कुठल्या क्षेत्राची निवड करता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. गरीब-श्रीमंत-मध्यमवर्गीय अशा सगळ्यांसाठीच आधीच्या काळाच्या मानाने पैशाची गरज बरीच वाढली आहे. त्यामुळे आपलं भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने घसघशीत पगाराची नोकरी मिळवण्याची धडपड सगळेचजण करत असतात.
क्षेत्र जितकं आव्हानात्मक तितका त्यातून मिळणारा पैसा अधिक. आपल्या कामाचा आपल्याला पुरेपूर मोबदला मिळावा ही अशी सर्वसाधारणपणे आपली अपेक्षा असते.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
—
बाकी क्षेत्रांमध्ये मिळणारा कामाचा मोबदला आणि आयटीसारख्या क्षेत्रात मिळणाऱ्या कामाचा मोबदला यात बराच फरक असतो. ओळखीची व्यक्ती आयटी क्षेत्रात आहे म्हटल्यावर तिचं सगळं काही सेट आहे अशीच भावना पटकन आपल्या मनात येते.
“भगवान जब देता है, छप्पर फडके देता है” असं आपण म्हणतो. बऱ्याचदा हे मिळालं नाही, ते मिळालं नाही अशा कुरबुरी असणाऱ्या आपल्याला कधीतरी अनपेक्षितपणे एखादी मस्त गोष्ट मिळते आणि आपल्याला आकाश ठेंगणं होतं, पण एखाद्या कंपनीच्या सीईओने कंपनीच्या कठीण काळात खंबीरपणे साथ देणाऱ्या कर्मचाऱ्यांना चक्क बीएमडब्ल्यूच दिल्याचं तुम्ही ऐकलंय?
तुमच्या कानांवर जरी विश्वास बसला नाही तरी हे खरंच घडलंय. ‘किसफ्लो इंक’ या कंपनीचे ५ भाग्यवान कर्मचारी या आगळ्यावेगळ्या भेटीचे मानकरी ठरलेत.
‘पीटीआय’च्या वृत्तानुसार, चेन्नईमधल्या ‘किसफ्लो इंक’ या ग्लोबल सॉफ्टवेअर ऍज अ सर्व्हिस कंपनीने शुक्रवारी आपल्या ५ वरिष्ठ व्यवस्थापन अधिकाऱ्यांना प्रत्येकी तब्बल १ कोटीपेक्षा जास्त किंमतीची बीएमडब्ल्यू कार दिली आहे. कंपनीप्रति त्यांनी दाखवलेली निष्ठा आणि वचनबद्धता या गुणांसाठी त्यांचा हा सन्मान करण्यात आला आहे.
कंपनीचे सीईओ सुरेश संबंदम यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या माहितीनुसार, हे पाचही जण कंपनीच्या सुरुवातीपासून त्यांच्यासोबत होते आणि आतापर्यंत कायम राहिले. कार मिळालेल्यांपैकी काही जण अगदी सर्वसाधारण परिस्थितीतून आले असून कंपनीत येण्यापूर्वी त्यांनी बऱ्याच आव्हानांचा सामना केला असल्याचं त्यांनी सांगितलं.
आतापर्यंतच्या प्रवासात कंपनीने बऱ्याच अडचणींचा सामना केलाय आणि पँडेमिकदरम्यान ही कंपनी व्यवस्थित सुरू राहील, की नाही अशीही शंका काही गुंतवणूकदारांनी उपस्थित केली होती.
—
- भारतातील ‘या’ कंपन्यांमधील महिलांना मासिक पाळीदरम्यान मिळते हक्काची सुट्टी
- शब्दांनी नव्हे तर कृतीतून अपमानाची परतफेड कशी करावी हे सांगणारी टाटांची ही कथा
—
संबंदम म्हणाले, “खूप कठीण प्रसंग आले. अगदी पँडेमिकमध्येसुद्धा कंपनी टिकेल का, भविष्य घडवेल का याची खात्री गुंतवणूकदारांना नव्हती. आम्ही गुंतवणूकदारांची परतफेड केलीये याचा आज आम्हाला खूप आनंद आहे आणि ही कंपनी पूर्णतः खाजगी मालकीची झाली आहे.”
ते म्हणाले, “मी १०० फूट खोल खणून सोनं काढत असताना जे माझ्या बरोबर होते (बाकीच्यांनी मध्येच कंपनी सोडल्यावर ज्यांनी किसफ्लो उभारली) त्या पाच जणांसाठी कार आहेत.”
शुक्रवारी कंपनीच्या १०व्या वर्धापन दिनी हा सोहळा पार पडला. कार मिळालेल्या या पाच जणांपैकी काही जणांना या सोहळ्याच्या काही तासांपूर्वीच तुम्हाला एक महागडी आलिशान कार दिली जाणार आहे असं सांगितलं गेल्यामुळे हा सोहळा होणार आहे हे गुलदस्त्यात ठेवलं गेलं होतं.
आपल्याला कार मिळणार आहे हे आधीपासून माहीत नसलेल्या काही कर्मचाऱ्यांना आपल्याला केवळ बॉससोबत फिरायचंय असं वाटलं होतं. त्यामुळे, ही बातमी कळल्यावर आपल्याला ‘सुखद धक्का’ बसला असल्याचं त्यांनी म्हटलं.
ही कार भेट म्हणून मिळालेले (उत्पादन व्यवस्थापन) संचालक कौसिकराम कृष्णसई म्हणाले, “हा माझ्यासाठी सुखद धक्का होता. मला वाटलं आम्ही सगळ्यांबरोबर लंच किंवा डिनरला जात आहोत. याची कल्पना केली नव्हती.”
त्या सगळ्यांच्या हातात चाव्या देऊन संबंदम म्हणाले, “हे ५ जण खंदकांसारखे माझ्यासोबत उभे राहिले. त्यांच्याशिवाय किसफ्लो आज जिथे आहे तिथे असली नसती आणि हे फार छोट्या स्वरूपाचं कौतुक आहे. त्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत याची मजा घेताना बघून मला आनंद होतोय.”
या सोहळ्यात भेट मिळालेल्या ५ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसोबत या ५ बीएमडब्ल्यू ५३०डी कार्स एकेक करून समांतरपणे दिमाखात उभ्या होत्या. ‘वर्क फ्रॉम होम’ बऱ्याच क्षेत्रात सोयीचं झाल्याचं पाहायला मिळतंय.
संबंदम म्हणाले की, “बाकी कंपन्यांप्रमाणे इथे सिक लिव किंवा कॅज्युअल लिव दिली जात नाही. त्यांना फक्त एक सुट्टी दिली जाते. त्यांना यायचं नसेल तर ते घरून काम करू शकतात. बायोमेट्रिक आणि तत्सम सिस्टीमसारखी उपस्थिती घेण्याची व्यवस्था इथे नाही. आमचे कर्मचारी कसे आहेत हे आम्ही जाणतो.”
बाकी कर्मचाऱ्यांना काय मिळेल असं विचारल्यावर संबंदम म्हणाले, “ही त्यांच्याकरता प्रेरणा आहे. आम्हाला त्यांना प्रेरित करायचं आहे (अधिक चांगलं काम करण्यासाठी). आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतो.”
ही भेट मिळालेल्या कर्मचाऱ्यांपैकी एक असलेले विवेक मदुराई म्हणाले, “आम्ही आमच्या टीमच्या सदस्यांची काळजी घेतो. त्यांच्या पसंतीनुसार अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी ते उत्साही असतात.”
वरच्या उदाहरणातून आपापल्या क्षेत्रात अधिकाधिक चांगली कामगिरी करण्यासाठी अनेकांना प्रेम मिळेलच, पण या उदाहरणातली लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की असा काहीतरी मोबदला मिळेल या उद्देशाने या कर्मचाऱ्यांनी कंपनीशी निष्ठा ठेवलेली नव्हती. ती निष्ठा त्यांनी मनापासून ठेवलेली होती.
केवळ आपला वैयक्तिक फायदा कसा होईल असा विचार न करता आपण ज्या ठिकाणी काम करतोय त्या संस्थेच्या एकूणच प्रगतीत आपण कशा प्रकारे भर घालून शकू या उद्दिष्टाने आपण आपण काम करत राहायला हवं. त्यातून मिळणारा आनंद हा कुठल्याही महागड्या वस्तूपेक्षाही लाखमोलाचा असेल!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.