' व्हॉट्सॲप डीपी न बदलणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो?! क्वोरावर लोकांनी मांडलीयेत मतं! – InMarathi

व्हॉट्सॲप डीपी न बदलणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो?! क्वोरावर लोकांनी मांडलीयेत मतं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

व्हॉट्सॲप न वापरणारी व्यक्ती तशी दुर्मिळच! शाळेतील विद्यार्थ्यांपासून नातवंडांसह धमाल करणाऱ्या आजीआजोबांपर्यंत प्रत्येकाच्या हाती व्हॉट्सॲपची चॅटविन्डो हमखास दिसते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मेसेज, ग्रुप्स, चॅटिंग यांच्यासह ओघाने स्टेटस, डिपी या गोष्टी आल्या नाहीत तरच नवल! आपला डिपी अपडेट करतानाच दुसऱ्यांचे डिपी पाहणे, त्यावर कधी टिका करणे तर कधी लाईक्स पाठवणे हे सोशल मिडीयाचे नियम आपण कुणी न शिकवताही शिकलो आहोत.

 

chatting im

 

मात्र आपल्या सोशल फ्रेन्ड्सच्या यादीत काही चेहरे मात्र असे असतात ज्यांना ‘डिपी’ या प्रकाराचे अजिबात कौतुक नसते. एकीकडे काहीजण प्रत्येक फोटो स्टोरी, स्टेट्स आणि डिपी म्हणून अपलोड करत असताना दुसरीकडे मात्र डिपीबाबत उदासिन लोकांना नेमकं काय म्हणावं असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.

डिपी अर्थात डिसप्ले पिक्चर हे साधन व्हॉट्सॲपने आपली ओळख म्हणून आपल्याला देऊ केलं आहे. चॅटिंग करताना आपला डिपी प्रत्येकाच्या स्क्रीनवर झळकतो, म्हणजेच थोडक्यात व्हॉट्सॲपच्या जगातील ही आपली ओळखच ठरते. मात्र काहीजण ही ओळख कायम रहावी, यासाठी फारसे उत्सुक नसतात.

वर्षानुवर्ष डिपी न बदललेले काही अवलिया तुमच्याही फ्रेन्डलिस्टमध्ये आहेत का?

तुमचं उत्तर जर हो असेल, तर अशा व्यक्तींवर टिका करण्यापुर्वी तुम्ही याबाबतची त्यांची कारणं समजून घेतली पाहिजेत.

कोरावर याबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. व्हॉट्सॲप डीपी न बदलणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो? हा साधा सोपा प्रश्न उपस्थित केला गेला आणि त्याला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

खरंतर हा प्रश्न फारसा महत्वाचा नाही, की रोजच्या जीवनाचा भागही नाही, मात्र अशा व्यक्तींची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न नेटकऱ्यांनी केला आणि त्यातील काही इंटरेस्टिंग उत्तरं इथे मांडण्यात येत आहेत.

पाहूयात कोरावरील नेटकरी नेमकं काय म्हणतायत.

संगणक तज्ज्ञ – सोशल मीडिया,सेंटीमेंट ऍनालिटिक्स असलेले अनिरुद्ध कुलकर्णी यांनी याबाबत सखोल माहिती दिली आहे. ते म्हणतात,” विषय आवडीचा आहे आणि प्रश्न अर्धाच आहे. पूर्ण प्रश्न असा असायला ” डीपी वारंवार बदलणारे किंवा न बदलणारे यांचा स्वभाव कसा असतो”.

मी मानस शास्त्रज्ञ नाही परंतु व्यवसायाचा थोडाफार भाग म्हणून उत्तर द्यायचा प्रयत्न करतो.कोणीही व्यक्ती डीपी म्हणून काय ठेवू शकतो? स्वतःचे चित्र, फॅमिली, निसर्ग, देव देवता किंवा स्फूर्तिस्थाने, लिखाण, चित्र किंवा एखादी कला वगैरे वगैरे.सर्वसाधारणपणे डीपी समवेत स्टेटस पण विचारात घेतले जाते कि जे फक्त २४ तास उपलब्ध असते. डीपी जो पर्यंत बदलत नाही तो पर्यंत तसाच राहतो.

 

wastsup im

 

”कोणीही व्यक्ती डीपी का ठेवतो? कारण त्याला एका विशिष्ट प्रकारे व्यक्त व्हायचे असते किंवा डीपी व्यक्तिमत्वाचे चिन्ह म्हणा, आवड निवड म्हणा किंवा प्रोफाइल दर्शवते. म्हणजेच लोकांनी मला अमुक तमुक प्रकारे ओळखावे.. अशी माणसे बहुदा एक्सप्रेसिव्ह (बहिर्मुख) असतात. डीपी हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग असतो कि जो सतत बदलून “मी आत्ता कसा आहे?” किंवा “माझी सध्याची स्थिती कशी आहे” हे दर्शवते. उदा..

सूर्योदय किंवा सूर्यास्त डीपीवर असेल तर लोकं निवांत मूड मध्ये असतात. एखाद्या पर्यटन स्थळाचा डीपी असेल तर “मी सध्या काय करतो, कसे करतो..” या चिल्ल मूड मध्ये असतात.. वेग्रे वेग्रे.. भरपूर मॉडेल्स आहेत यात..

डीपी नसेल तर …

आजच डीपी नाही कि मागील आठवड्यापासून/महिन्यापासून/कधीच डीपी नाही..? “स्टेटस अपडेट” कसे आहे हे पाहिल्याशिवाय अचूक अंदाज येणार नाही. समजा स्टेटस अपडेट पण नाही.. तर अशी व्यक्ती अंतर्मुख असू शकते. स्वतःची/कुटुंबाची गोपनीयता जपणे हे त्याच्या दृष्टीने महत्वाचे असू शकते.
नातेसंबंध कसोशीने जपणारे असू शकते.

दुसऱ्याचे डीपी आवर्जून पाहणारी व त्यावर सहसा व्यक्त न होणारी असू शकते. दुसऱ्याच्या मताला किंमत देणारी व त्यास जसे आहे तसे मान्य करणारी असू शकते.
फार कमी वेळ व्हाट्सअप वर पडीक असणारी असू शकते. ठराविक वेळेत ठराविक मेसेज वाचून शांतपणे मोबाईल बंद करणारी सुद्धा असू शकते.किंवा डीपी कसा बदलायचा हेच माहित नसणारी सुद्धा असू शकते..

 

dp im

 

इतर गोष्टींचा अंतर्भाव करून या उत्तरात अजून चांगल्या प्रकारे भर टाकता येऊ शकते.. जसे कि गेल्या चोवीस तासात काय स्टेटस होते,

गेल्या आठवड्यात कितीवेळा आणि काय स्टेटस ठेवले, विषय काय? गेल्या आठवड्यात मूड काय होता, काश्मीर फाईल बघितला कि झुंड पाहिला कि घरात विविध पदार्थ करून पहिले, ब्रेकअप झाला कि नवीन पोरगी पटली? स्टेटसवर गालिब आहे कि गुलजार आहे.. त्यावरून हि स्वभाव कसा असेल याचा अंदाज बांधता येतो.. पण सविस्तर उत्तर पुन्हा कधीतरी देईन, जर योग्य प्रश्न असेल तर ..

रामकृष्ण हरी

पेशाने माजी शिक्षक असलेले नितीन मुळे म्हणतात, ”डिपी न बदलणे हे प्रौढत्व आल्याचे लक्षण समजावे, बालिश विचार त्यांचे नाहीत असे समजू शकता,”

नवनाथ उबाळे यांनी याबद्दल आपले वेगळेच मत मांडले आहे. ते म्हणतात,” १००% बरोबर तर कोणीच नाही सांगू शकेल, तरी प्रयत्न करतो.

डीपी न बदलणारे:

मिनिमालिस्टिक स्वभावाचे असतात.

साधी पण उच्च दर्चाची राहणी यांना आवडते. जास्तीत जास्त हे अंतर्मुख स्वभावाचे असतात. वाढदिवस, लग्न सभारंभ टाळणारे (मुख्यत्वे नाचणे टाळायचे म्हणून) हे लोकं असतात. एवढेच काय तर फोटो घ्यायला सुद्धा टाळतात, यांच्याच स्वतःच्या फोन मधे यांचे स्वतःचे फोटो कमी असतात. दुसऱ्याच्या फोन मध्ये कोणी काढले असतील तर ते फोटो कसे असतील अन् त्यांनी ते कुठे शेअर नाही केले पाहिजे असं यांना वाटते.

एकूणच काय स्वतःला आणि जवळच्या लोकांना जपणारे हे लोक असतात.

वारंवार डीपी बदलणारे मूडी, हौशी स्वभावाचे असतात.

नेहमी active असणारे तर कधी खूप नैराश्यात असणारे हे लोक असतात.

 

tension inmarathi

 

Active असणारे स्वतःला active दाखवायला स्वतःचे dp वारंवार बदलतात तर नैराश्यात असणारे लोक जगासमोर एखाद मुखवटा (खरा किंवा खोटा) दाखवायला बदलत असतात.

लग्न, वाढदिवस, यात्रा, महोत्सव यांच्या आवडीची ठिकाणे आहेत. बिन्धास्त आणि बेलगाम सुद्धा यांना म्हटल्या जाते, कुठे गेल्यावर सर्वात आधी नाचायला सुरू करणारे हेच असतील, एवढंच काय तर वरच्या प्रकारातील लोकांना सुद्धा जबरदस्ती ओढतील. एखाद अंतर्मुख व्यक्ती यांनी दत्तक घेतलेला असतोच.

अंतर्मुख लोकं सुद्धा कधी कधी वारंवार बदलतात पण ते सोशल प्रोटोकॉल म्हणून किंवा जीवनात महत्वाचं काही वाटते म्हणून.

एकूणच ही लोकं बहिर्मुख किंवा अंतर्मुख काहीही असो, स्वच्छंदी असतात हे माझं छोटंसं निरीक्षण आहे, २+२=४ असा अभ्यास मुळीच नाही. कृपया अपवाद असल्यास चांगल्या भाषेत टिप्पणी करावी असेही त्यांची सुचवले आहे.

याबाबत गृहिणी असलेल्या संध्या वाटवे यांनी आपला अनुभव नोंदवला आहे,”मी यातलीच एक आहे! मला डीपी बदलायला आवडत नाही. स्वतः चा वा नवऱ्याचा फोटो मी डीपी वर कधीच ठेवला नाही.

 

wastsup 1 im

 

स्वभाव म्हणाल तर…मला ते डीपी वैगरे बदलणं आवडत नाही. मी मनाने स्थिर आहे!

त्यामुळे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती यानुसार प्रत्येकजण आपआपल्या आकलनाप्रमाणे सोशल मिडीयाचा वापर करतो हे नक्की!

अधिक उत्तरांसाठी कोरा वर दिलेली ही अधिकृत माहिती वाचा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?