पाकिस्तानचे नवे पंतप्रधान भारतासाठी डोकेदुखी ठरणार का?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
इम्रान खान अविश्वास ठरावात पराभूत झाला आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून त्याला हटवण्यात आलं. ‘माझी खुर्ची जाणार, मग मी ती कुणालाच मिळू देणार नाही’ असा विचार करत संसद बरखास्त करण्याचा डाव इम्रानने खेळून पाहिला होता, मात्र कोर्टाने त्याला फटकारलं आणि नवी व्यक्ती पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार हे निश्चित झालं.
इम्रानच्या रिक्त झालेल्या पदावर आता शाहबाझ शरीफ विराजमान झाले आहेत. पंतप्रधानपद स्वीकारण्याआधीच काश्मीरविषयी भाष्य करत त्यांनी वादाला तोंड फोडलं होतं. त्यांनी त्यांचे सुप्त मनसुबे व्यक्त केले असल्याचं सुद्धा बोललं जात आहे.
त्यामुळेच पाकिस्तानातील हा सत्तापालट, शाहबाझ पंतप्रधान होणं भारतासाठी फायदेशीर ठरेल की तोट्याचं ठरेल याविषयी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात, शाहबाझ यांच्या हाती पाकिस्तानची सत्ता जाण्याचे फायदे-तोटे!
काश्मीरबद्दल भाष्य केलंय म्हणून…
शाहबाझ शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान झाल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्या व्दिपक्षीय संबंधांमध्ये सुधारणा बघायला मिळेल असं राजकीय विश्लेषक आणि अभ्यासकांचं मत आहे.
मात्र पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधीच काश्मीर विषयावर त्यांनी भाष्य केल्यामुळे याबद्दल शंका घ्यायला वाव असल्याचं सुद्धा काहींचं मत दिसतंय.
इम्रान खान यांनी कायमच काश्मीर प्रश्नावर भारताचा विरोध करत, परस्पर संबंध नीट राहू दिले नाहीत. इम्रानच्या कार्यकाळात झालेल्या चुका पुन्हा घडल्यास संबंध अधिक बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
अल्पसंख्याक जनतेविषयीचं मत
सत्तर वर्षीय शरीफ हे पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांच्या बाबतीत इम्रान यांच्याहून अधिक सहिष्णू आहेत. त्यामुळेच तेथील हिंदू धर्मीयांसाठी ही जमेची बाब आहे.
इम्रान खान यांच्या मनात भारताविषयी असणारा द्वेष सतत त्यांच्या वागण्या-बोलण्यातून झळकत असे. मात्र शाहबाझ शरीफ भारताविषयी तितकासा नकारात्मक दृष्टिकोन ठेवणारे नाहीत.
पाकिस्तानातील एक नावाजलेला आणि मोठा नेता असूनही, त्यांनी हिंदूद्वेष कधीही केला नाही. हिंदूंचा अत्यंत महत्त्वाचा सण असणाऱ्या होळीच्या दिवशी त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पाकिस्तानातील हिंदू बांधवांना दिलेल्या शुभेच्छा फारच चर्चेत राहिल्या. त्यांनी दिलेल्या होळीच्या शुभेच्छा आणि त्यांचा एकूणच हिंदूंकडे बघण्याचा दृष्टिकोन, इम्रान यांच्यापेक्षा खूपच मवाळ आहे.
–
- चीनशी वाढती जवळीक नडली आणि पाकिस्तान श्रीलंकेत अस्थिरता निर्माण झाली
- इम्रान खान सरकार पडल्याचं खापर ज्याच्यावर फोडतोय, त्याचं आहे भारताशी कनेक्शन?
–
हिंदू आणि ख्रिस्ती धर्मियांवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध करताना शरीफ अनेकदा दिसून आले आहेत. म्हणजेच, इम्रान यांच्या काळात वाढलेली धार्मिक तेढ आणि संकुचित झालेलं धार्मिक स्वातंत्र्य काहीसं सुरळीत होण्याची शक्यता नक्कीच आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री असतांना
चर्चेतून प्रश्न सोडवण्याच्या विचारांचं शाहबाझ शरीफ यांनी नेहमीच समर्थन केलं आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री म्हणूनही याआधी त्यांनी काम पाहिलं आहे. याकाळात एक महत्त्वाचा राजकीय नेता म्हणून ‘चर्चा महत्त्वाची’ अशीच भूमिका त्यांनी घेतली असल्याचं पाहायला मिळतंय.
भारतासोबतचे संबंध सुधारल्यामुळे, पाकिस्तानातील व्यवसाय क्षेत्राची स्थिती मजबूत होईल आणि परिणामी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला फायदा होईल ही बाब शरीफ जाणून आहेत. इम्रान यांनी या बाबींचा विचार फारसा कधीही केलेला नसला, तरी शरीफ यांची विचारसरणी तशी नाही. हीदेखील जमेची बाजू असल्याचं म्हणायला हवं.
एक प्रशासक म्हणून मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेली कामगिरी सुद्धा वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळेच शाहबाझ शरीफ पंतप्रधान होणं, ही पाकिस्तानसाठी चांगली बातमी म्हणायला हवी.
शरीफ घराण्याचे वंशज…
शाहबाझ शरीफ हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि महत्त्वाचे नेते नवाझ शरीफ यांचे धाकटे बंधू आहेत. शरीफ घराण्याचा इतिहास पाहता, पाकिस्तान-चीन यांच्यातील नातं अधिक घट्ट करण्याची परंपरा त्यांच्यात असल्याचं नक्कीच पाहायला मिळतं. मात्र शरीफ घराणं आणि खुद्द नवाझ शरीफ यांचा भारत-पाकिस्तान संबंधांकडे सुद्धा ओढा होता, हेदखील सत्य आहे. भारताशी असलेले संबंध अधिकाधिक चांगले कसे राहतील याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
वाजपेयी यांचा पाकिस्तान दौरा असो, किंवा २०१३ साली तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून सत्ता मिळवताना, भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्याविषयी सातत्याने केलेलं भाष्य असो, शरीफ यांनी भारताशी थेट वैर पत्करल्याचं फारसं दिसलेलं नाही. त्यांचे लहान बंधू असणारे शाहबाझ शरीफ हेदेखील मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेऊन वाटचाल करतील अशी अटकळ बांधली जात आहे. म्हणजेच हीसुद्धा भारतसासाठी गुड न्यूज ठरणार हे नक्की!
नवाझ यांच्या काळातील मोदींची पाकिस्तान भेट सुद्धा जगभरात चर्चेचा विषय ठरली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खऱ्या अर्थाने ‘अतिथी’ म्हणून शरीफ यांच्या घरी उभे ठाकले आणि नातिचग्य लग्नात नवाझ यांनी त्यांचं उत्तम आदरातिथ्य केलं हेदेखील सगळ्या जगाने पाहिलं आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.