' महाराष्ट्राची पुस्तक नगरी – प्रत्येक वाचनवेड्याच्या हक्काचं ठिकाण! – InMarathi

महाराष्ट्राची पुस्तक नगरी – प्रत्येक वाचनवेड्याच्या हक्काचं ठिकाण!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

काही माणसांना वाचण्याची खूप आवड असते, वाचन म्हणजे त्यांच्या श्वास असतो, त्यांचा ध्यास असतो. अश्या वाचनवेड्यांना नेहमी वाटत असते की अशी एखादी जागा असावी जेथे अगणित पुस्तके असावी, तेथील पुस्तके कधीच संपू नयेत.  तुम्ही देखील वाचनवेडे असाल आणि तुमच्याही मनात अशी एखादी इच्छा असेल तर तुमची ही इच्छा देवाने ऐकलीच असे समजा, कारण भारतात पहिलं वहिलं पुस्तकाचं खेडं निर्माण झालंय आणि मुख्य म्हणजे तेथे तुम्ही स्ट्रॉबेरीचा मनसोक्त आस्वाद घेत वाचनाची मजा लुटू शकता. आता अजून एक सुखद धक्का देणारी गोष्ट ऐका- हे गाव आपल्याच महाराष्ट्रात आहे, गावाचं नाव आहे भिलार!

book-village-marathipizza01
newindianexpress.com

महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यामध्ये असलेल्या भिलार हे छोटेसे गाव देशातील पहिले बुक व्हीलेज म्हणून नावारूपाला आले आहे. या गावामध्ये २५ जागा निश्चित करून त्यांना कलात्मक रूपाने सजवण्यात आले आहे. या जागेवर साहित्य, कविता, धर्म, इतिहास, लोक साहित्य, आत्मकथा, पर्यावरण आणि इतर अनेक विषयांसंदर्भात १५००० पेक्षाही जास्त पुस्तके उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त असंख्य मासिके आणि वर्तमानपत्रे सुद्धा उपलब्ध आहेत.

book-village-marathipizza02
hindustantimes.com

मजेशीर गोष्ट तर ही आहे की, ज्या घरात ज्या विषयाच्या सबंधित पुस्तके आहेत त्या घराबाहेर त्या विषयाच्या संबंधित साहित्यकारांची चित्रे लावण्यात आली आहेत. या घरांमध्ये वाचन करणाऱ्या लोकांना बसण्यासाठी चांगली व्यवस्था केली गेली आहे, वाचकांसाठी येथे राहण्याची आणि खाण्याची संपूर्ण व्यवस्था आहे.

book-village-marathipizza03
gaonconnection.com

स्ट्रॉबेरीसाठी खूप प्रसिद्ध असलेले हे गाव महाबळेश्वर पासून फक्त १४ किलोमीटर आणि मुख्य हायवेपासून फक्त ३३ किलोमीटर लांब आहे. महाराष्ट्र सरकारने या योजनेला ‘पुस्तकांचं गाव योजना’ असे नाव दिले आहे. ही योजना ब्रिटनच्या वेल्स शहराच्या Hay-on-Wye पासून प्रेरित आहे.

hay-on-wye-marathipizza
महाराष्ट्र सरकारने उचललेले हे पाऊल पाहून इतर राज्यांच्या सरकारने सुद्धा यातून काही तरी बोध घेतला पाहिजे आणि प्रत्येक राज्यात थोडया-थोडया अंतरावर अशी गावे उभारली पाहिजेत.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?