' नवरा अर्थमंत्री, मात्र पत्नीने बुडवला कर, नारायण मूर्तींच्या मुलीवर होतेय टीका… – InMarathi

नवरा अर्थमंत्री, मात्र पत्नीने बुडवला कर, नारायण मूर्तींच्या मुलीवर होतेय टीका…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्याकडे म्हणजे भारतात अशी ओरड आहे की टॅक्स भरण्याचं प्रमाण फक्त मध्यमवर्गीयांमध्ये जास्त आहे. पण तरीही करदात्यांचा नेमका आकडा किती आहे? हे जर तुम्हाला सांगितलं ना तर तुमचे डोळे पांढरे होतील. २०१९-२० या आर्थिक वर्षात भारताच्या १३६ कोटी लोकसंख्येपैकी केवळ ८ कोटी लोकांनी टॅक्स भरल्याचा रेकॉर्ड आहे. म्हटलं होतं ना?

हा आकडा म्हणजे भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती नगण्य आहे हे तुमच्या लक्षात येईल. शिवाय हा आकडा २०१९-२० या वर्षातला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

कोरोना या आर्थिक वर्षानंतर आला होता, त्यामुळं त्या वर्षांमध्ये टॅक्स भरणं तर लांबचीच गोष्ट लोकांना जॉबवरूनही काढण्यात आलं. बिझनेसमनचे बिझनेसेस बुडाले. हे झालं सामान्य माणसांचं. पण भारतात मोठ मोठ्या बँकांना चुना लावून गेलेलेही आहेतच की. त्यांच्यामुळं झालेलं सरकारचं आणि सामान्य जनतेचं नुकसान वेगळंच. पण हे पाल्हाळ लावण्याचं कारण म्हणजे, सध्या एका भारतीय व्यक्तीने युकेमध्ये टॅक्स न भरल्याचा आरोप होतोय.

 

income tax ndtv

 

ती पण कोणी साधीसुधी व्यक्ती नव्हे तर ती आहे अक्षता मूर्ती. नारायण मूर्ती आणि सुद्धा मूर्ती यांची मुलगी आणि ब्रिटिश फायनान्स मिनिस्टर ऋषी सुनक यांची पत्नी. आश्चर्य वाटलं ना? चला बघूया नेमकं प्रकरण काय आहे?

अक्षता मूर्ती यांच्यावर हा आरोप होण्याचं कारण काय?

एनआर नारायण मूर्ती म्हणजे इन्फोसिसचे संस्थापक. त्यांनी ही कंपनी सुरु करण्यासाठी त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांच्याकडून १० हजार रुपये उसने घेतले आणि कंपनी सुरू केली. आता त्या कंपनीची किंमत १०० अब्ज डॉलर्स आहे. शिवाय इन्फोसिस ही जगप्रसिद्ध वॉल स्ट्रीटवर नोंद होणारी पहिलीच भारतीय कंपनी होती.

नारायण मूर्ती यांच्या पत्नी एवढीच काही सुधा मूर्तींची ओळख नाही हेही प्रत्येक भारतीयाला ठाऊक आहेच. सुधा मूर्ती या ज्येष्ठ समाजसेविका आणि नावाजलेल्या लेखिका आहेत. अशा प्रसिद्ध दाम्पत्याची मुलगी म्हणजे अक्षता मूर्ती.

 

akshata im

तिबेट प्रश्नानंतर आता रशिया युक्रेनसाठी अमेरिकेने पुन्हा एका भारतीयाची निवड केली आहे

मुलांना कसं वाढवावं? सुधा मूर्तींनी सांगितलेल्या या टीप्स पालकांनी वाचायलाच हव्यात

४२ वर्षीय अक्षता मूर्तींकडे इन्फोसिस कंपनीचे जवळजवळ १ अब्ज डॉलर्सचे शेअर्स आहेत. या प्रचंड संपत्तीमुळं अक्षता मूर्ती ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ २ यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत ठरल्या आहेत. या राणीची संपत्ती जवळजवळ ४६० मिलियन डॉलर्स आहे. अक्षता मूर्ती यांना इन्फोसिसमध्ये असलेल्या शेअर्सच्या संख्येवर डिव्हीडंड मिळतो. मात्र त्यांनी लाखोंचा कर वाचवण्यासाठी नॉन डोमिसाईल स्टेटस वापरल्याचा आरोप आहे.

 

infosys inmarathi
tasklets.wordpress.com

 

या आरोपावर उत्तर म्हणून जगभरातल्या कोणत्याही उत्पन्नावर लाभांश आणि भांडवली नफ्यासह युके कर भरणार असल्याचं अक्षता मूर्ती यांनी सांगितलं आहे. मात्र याचं स्पष्टीकरण देताना त्यांनी असंही सांगितलं आहे की “हे माझ्यावर नियम आहेत म्हणून मी करत नाही, तर मला हवे आहे म्हणून करत आहे.

” काही दिवसांपूर्वी लोकांनी अक्षता यांच्या कर भरणा पद्धतीवर सवाल उपस्थित केले होते. कारण अक्षता त्यांच्या युकेमधल्या मिळकतीवर युकेचा कर भरत होत्या आणि आंतरराष्ट्रीय मिळकतीवर आंतरराष्ट्रीय कर भरत होत्या. अक्षता यांनी केलेल्या दाव्यानुसार त्या ब्रिटनच्या नागरिक नसल्याने त्यांना तिथे कर लागू होत नाही. त्यामुळं इन्फोसिसमधून मिळणाऱ्या मिळकतीवर ब्रिटनबाहेर सर्वत्र कर लागू होतो.

अक्षता मूर्ती यांची स्वतःचीही खूप मोठी ओळख आहे…

केवळ मूर्ती दांपत्याची मुलगी आणि ब्रिटनच्या फायनान्स मिनिस्टर (ब्रिटनमध्ये सेक्रेटरी म्हणतात) ऋषी सुनक यांची पत्नी एवढीच काही अक्षता मूर्ती यांची ओळख नाही. अक्षता मूर्ती कॅटामरन व्हेंचर्स या व्हेंचर कॅपिटल कंपनीच्या संचालिकादेखील आहेत. ही कंपनी त्यांनी आपले पती ऋषी सुनक यांच्यासोबत मिळून २०१३ मध्ये स्थापन केली होती. याशिवाय अक्षता मूर्ती यांचा स्वतःचा फॅशन ब्रँड त्यांनी २०१० मध्ये चालू केला होता.

 

akshata im 1

 

२०११ च्या व्होग प्रोफाइलनुसार अक्षता यांचा हा ब्रँड भारतीय आणि पाश्चात्त्य यांचे फ्युजन करण्याचे काम करतो. त्यासाठी त्या दुर्गम खेड्यातल्या लोकांसोबत काम करतात. अक्षता मूर्ती आणि त्यांचे पती ऋषी सुनक यांच्या मालकीच्या किमान चार मालमत्ता आहेत.

यामध्ये ज्यात लंडनमधल्या केन्सिंग्टनमधलं ७ मिलियन पाउंडचं पाच बेडरूमचं घर आणि कॅलिफोर्नियातल्या सांता मोनिका इथं एक फ्लॅट आहे. (१ पाउंड म्हणजे भारतातले १०० रुपये. या न्यायानं ७ मिलियन पाउंड म्हणजे किती याचा हिशोब तुम्हीच करा.)

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?