महाराष्ट्र निर्बंधमुक्त, मात्र कोरोनाचा हा नवा व्हेरिएन्ट डोकेदुखी ठरणार का?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
देशात सध्या कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येमध्ये प्रचंड घट होतांना दिसून येत आहे. जवळपास सगळ्यांनी मास्क लावणे, सैनिटाइजर ने हात धुणे थांबवले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आणि दिल्ली च्या मुख्यमंत्र्यांनी पण म्हटले होते की, आता मास्क घालण्याची अजिबात गरज नाही आणि कमी रुग्ण असल्याकारणाने राज्य आणि केंद्र सरकारने जवळपास संपूर्ण निर्बंध हटवले आहेत.
पण दरम्यान, पुन्हा एकदा कोरोनाच्या नवीन XE व्हेरिएन्ट ने चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रातील बीएमसी महानगरपालिकेने बुधवारी दावा केला की, नुकतीच दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या ५० वर्षीय महिलेला कोरोनाच्या XE या नवीन व्हेरिएन्टची लागण झाली आहे. ही बातमी आल्यापासून लोकांमध्ये पुन्हा एकदा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
XE व्हेरिएन्टच्या पहिल्या रुग्णाला घेऊन अजुनही सस्पेंस कायम आहे. एकीकडे बीएमसी ने XE व्हेरिएन्ट ची पुष्टी केली आहे तर दुसरीकडे बीएमसीने केलेल्या दाव्याच्या काही वेळानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या वृत्तांचे खंडन केले आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, विद्यमान पुरावे कोरोनाच्या नवीन XE व्हेरिएन्टच्या उपस्थितीची पुष्टी करत नाहीत. परंतु आम्ही तरीदेखिल याची सखोल तपासणी करु.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
XE व्हेरिएन्ट नेमका आहे तरी काय ?
यावर्षी भारतात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी ९०% रुग्ण हे ओमिक्रॉनचे आढळले आहेत. कोरोनाचे नवीन XE व्हेरिएन्ट हे ओम्रिकॉन चे म्यूटेंट झालेले व्हेरिएन्ट आहे. हा एक संकरित प्रकार आहे ज्यामध्ये मूळ व्हेरिएन्ट BA.1 आणि BA.2 या दोघांचा समावेश आहे, म्हणून काही तज्ञांनी या व्हेरिएन्टला अधिक संसर्गजन्य मानले आहे. सध्या जगामध्ये अनेक देश कोरोनाच्या या चौथ्या लाटेचा सामना करत आहेत. जसे की चीन आणि अन्य यूरोपीय देश, १९ जानेवारी रोजी यूकेमध्ये या विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता.
WHO ने नुकताच इशारा दिला होता
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गेल्या आठवड्यामध्येच जगाला XE व्हेरिएन्ट ला घेऊन अलर्ट केले होते. WHO ने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूचे नवीन XE व्हेरिएन्ट ओमिक्रॉनपेक्षा जास्त संसर्गजन्य असू शकते.
एका रिपोर्टनुसार, हा व्हेरिएन्ट BA.2 व्हेरिएन्ट पेक्षा १० पट जास्त संसर्गजन्य आहे. तसेच मार्चच्या मध्यापासून दर आठवड्याला या नवीन व्हेरिएन्ट च्या रुग्णांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ दिसून येईल, असे अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवले होते.
–
- भारतात चौथ्या लाटेची तीव्रता कितपत असू शकते? तज्ज्ञांचं मत जाणून घ्या
- बर्ड फ्लूचं टेंशन, तरी नॉनव्हेज खायचंय? मग ही माहिती दुर्लक्षून अजिबात चालणार नाही!
XE व्हेरिएन्ट किती धोकादायक आहे?
आत्तापर्यंत तरी, असा कोणताच पुरावा मिळाला नाही, ज्याने सिद्ध होईल की XE व्हेरिएन्ट हे ओम्रिकॉन च्या इतर प्रकारांपेक्षा वेगळे आहे. असे सांगितले जात आहे की XE हे BA.2 व्हेरिएन्टपेक्षा फक्त १०% जास्त संसर्गजन्य आहे. मात्र, अद्याप त्याच्याबद्दल पूर्ण माहिती समोर आली नाही.
इतकेच नाही तर तीन महिन्यांपूर्वी सापडलेल्या या व्हेरिएन्ट द्वारे कोणताही मोठा धोका समोर आलेला नाही किंवा बाकीच्या व्हेरिएन्टच्या तुलनेत केसेसही वेगाने वाढल्या नाहीत. याचा अर्थ XE व्हेरिएन्ट हा अजून चिंतेचा विषय नाही.
XE प्रकार भारतात येऊ शकेल का?
जर भारतात XE व्हेरिएन्टची पुष्टी झाली तर यात काही नवल नाही, कारण भारताने जवळपास सर्व देशांवरील प्रवासी निर्बंध उठवले आहेत. अशा परिस्थितीत अनेक विदेशी प्रवासी भारतात येत आहेत, तर भारतातील नागरिकही इतर देशांमध्ये जात आहेत. शिवाय, XE किंवा Omicron चे इतर कोणतेही व्हेरिएन्ट, भारतीय लोकांमध्ये विकसित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे देखील शक्य आहे की भारतात XE ची प्रकरणे असतील, परंतु टेस्ट कमी असल्याकारणाने अद्याप आढळलेली नाहीत.
तसेच एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे चौथी लाट जरी आली नसली तरी आरोग्य मंत्रालयाने अद्याप कोरोनाशी संबंधित अनेक सुरक्षा नियम अजुनही शिथिल केलेले नाहीयेत. अशा परिस्थितीत जर तुम्हाला विषाणूपासून बचाव करायचा असेल, तर तुम्ही मास्क घालण्याची, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची आणि वेळोवेळी हात धुण्याची सवय जपावी.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.