वाढत्या पेट्रोलच्या दरामुळे CNG गाडीचा विचार करताय? त्याचे फायदे तोटे जाणून घ्या
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सध्या देशात पेट्रोलच्या किमतीवरून बराच गदारोळ सुरू आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले असून, काही ठिकाणी तर पेट्रोल च्या किमतींने १२० चा आंकडा पण पार केला आहे. तसेच रशिया-यूक्रेन मध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे सध्यातरी या किंमती कमी होण्याची काहीही शक्यता दिसत नाहीये.
त्यामुळे लोक आता पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांकडे आकर्षित होऊ लागले आहेत. राज्य आणि केंद्र सरकार ही सार्वजनिक वाहनांना पेट्रोल-डीजल मधून सीएनजी मध्ये बदलत आहेत.
परिस्थिती अशी आहे की अनेक ठिकाणी तर या सीएनजी कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाल्याने वेटिंग पीरियड सुरू आहे. परंतु आपल्याला माहित आहे का या सीएनजी वाहनांचे जेवढे फायदे आहेत, तेवढेच त्याचे तोटे ही आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
चला तर जाणून घेऊया सीएनजी वाहनांचे फायदे आणि तोटे :-
सर्वप्रथम आपण फायदे जाणून घेऊया
● इंधनाचा कमी खर्च
जर आपण सीएनजीवर चालणारे वाहन खरेदी केले तर तुम्ही इंधनावर खर्च होणारे पैसे वाचवू शकाल. सीएनजी गॅस हे पेट्रोल-डीजल च्या तुलनेने खूप स्वस्त आहे, त्यामुळे तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल. ज्यांना दररोज कार वापरावी लागते, त्यांच्यासाठी सीएनजी हा एक उत्तम पर्याय आहे.
● कमी प्रदूषण
पेट्रोल, डिझेल वर चालणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्याऐवजी सीएनजीवर चालणारी वाहने वापरल्यास प्रदूषण कमी होते. सीएनजी कार्बन डायऑक्साइड (CO2) आणि पाण्याची वाफ तयार करते, ज्यामुळे हानिकारक कार्बन मोनोऑक्साइड (CO) आणि नायट्रोजन ऑक्साइडचे (NOx) उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी होते.
● भरपूर साठा
जिथे पेट्रोल आणि डिझेल संपण्याचा धोका आहे तिथे सीएनजी सध्या तरी मुबलक प्रमाणात आहे. भारतातील नैसर्गिक वायूचा एकूण स्थानिक साठा सध्याच्या मागणीनुसार २७ वर्षांपर्यंत पुरवठा पूरेल एवढा साठा आहे.
आता जाणून घेऊया सीएनजी चे तोटे :
● कमी परफॉर्मेंस :
जर आपण सीएनजी कारच्या परफॉर्मेंस चा विचार केला तर सीएनजी कार पेट्रोलवर चालणार्या कारपेक्षा खूप मागे आहेत. सीएनजी हे अत्याधुनिक इंधन आहे जे पर्यावरणाला कमी प्रदूषित करते, परंतु कार्यक्षमतेच्या बाबतीत ते पेट्रोल-डीजल वर चालणाऱ्या कारच्या खुप मागे आहे. इंजिनची कार्यक्षमता देखील दरवर्षी १० टक्क्यांनी कमी होते. तसेच या कारचा वेग देखील पेट्रोल कारच्या तुलनेत कमी आहे.
● कमी स्पेस :
सीएनजी कार मध्ये गॅस भरण्यासाठी सिलेंडर ची गरज असते आणि या सिलेंडर ला कारमध्ये ठेवण्यासाठी जास्त जागा लागते. साधारणपणे, सीएनजी कारमध्ये सिलेंडर डिक्की किंवा बूटच्या जागेत बसवले जाते. त्यामुळे बूट जागेची कमतरता होते आणि गाडीमध्ये कमी सामान बसते.
● सहज उपलब्ध नाही :
प्रत्येक लहान-मोठ्या शहरात किंवा खेडे-गावात पेट्रोल-डिझेल इंधन केंद्रे सापडतील सहज सापडतील, मात्र देशात सीएनजी स्टेशनची अजुनही मोठी कमतरता आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही शहराबाहेर गेलात किंवा लांबच्या प्रवासाला जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला आधीच सीएनजीची टाकी पूर्ण भरावी लागेल.
● मेंटेनन्स खर्च जास्त :
सीएनजी कारच्या सर्व्हिस शेड्यूलबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक असते. याचे कारण म्हणजे सीएनजी इंजिनमध्ये पेट्रोल कारच्या तुलनेत इंजिनचे इंधन आणि स्पार्क प्लग लवकर खराब होतात. जर तुमच्या सीएनजी कारचे जास्त चालत असेल तर तुम्हाला इंजिनाबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक असते.
–
१ एप्रिलपासून खिशाला बसणार आणखीनच चाट, या गोष्टी होणार महाग!
पेट्रोलची ३०% बचत करणाऱ्या यंत्राचा शोध लावणाऱ्या “मराठी” माणसाबद्दल जरूर वाचा!
–
तर हे आहेत सीएनजी चे काही फायदे आणि काही तोटे, त्यामुळे आपण पूर्ण विचार करूनच आपले पैसे इन्वेस्ट करावे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.