चॉकलेट रॅपरवर मोदींचा फोटो : जनतेच्या या १३ कमेन्ट्स भाजपने गांभीर्याने घ्यायला हव्यात!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
नरेंद्र मोदी २०१४ साली सत्तेत आल्यापासून कामापेक्षा सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आले आहेत. २०१९ साली नरेंद्र मोदी सत्तेत येणार नाहीत असा डंका विरोधकांनी लावला होता मात्र असे काही झाले नाही, २०१९ साली फिर एक बार मोदी सरकार ही लाट आली आणि मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानच्या खुर्चीवर विराजमान झाले.
गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे संपूर्ण जगाची घडी विस्कटली होती, आपल्या देशाचे जीडीपीदेखील खालावला होता. एकीकडे कोरोनाची दुसरी लाट आणि देशातील निवडणुका यामुळे जनतेनें आणि विरोधकांनी मोदींना चांगलेच धारेवर धरले होते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
आधीच भाजप हा पक्ष जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणावर करतो अशी टीका होत असतानाच त्यांच्याच मातृभूमीत म्हणजे गुजरातमध्ये एक चॉकलेट तयार केले असून त्यावर मोदींचा फोटो आहे यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे, आधीच लसीच्या सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो का? यावरून केरळमधील एका माणसाने कोर्टाची पायरी चढली होती आता रॅंपवर फोटो आल्याने नेटकरी काय म्हणतात ते बघुयात
जनता आधीच मोदींच्या नावाने शंख करत आहेत त्यात आता चॉकलेट सारख्या गोष्टीवर त्यांचा फोटो आला म्हणून साहजिकच नेटकऱ्यांना टीका करण्याचे कारण मिळाले.
मोदी कायमच हवाबाजी करतात प्रसिद्धीसाठी करतात अशी टीका होतच असते, या कॉमेंट्समधून सुद्धा नेटकऱ्यांचे म्हणणे दिसून येत आहे.
आता फक्त चलनावर त्यांचा फोटो येणे बाकी आहे असा अंदाज या कॉमेंट्समधून दिसून येतो.
आजकाल प्रत्येक गोष्टीत राजकारण आणले जाते, आता व्यापारात देखील राजकारण आणले जात आहे असं मत कदाचित यांचं असू शकत.
पेट्रोल पंपापासून ते लसीच्या सर्टिफिकेट पर्यंत सगळीकडेच मोदींचा फोटो दिसत असल्याने त्यात आता चॉकलेटच्या रॅपरवर देखील मोदींचा फोटो आल्याने नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
–
- या ५ महारथींनी आयुष्यात जे कमावलं ते सगळं ‘अशा’ कृतींमुळे एका झटक्यात गमावलं!
- “पेट्रोल-डिझेलने सोनं चांदीचा माज उतरवलाय!” म्हणल्यावर सुबोध भावेच झाले ट्रोल!
–
मागे भाजपाची सत्ता असताना चिक्की घोटाळा झाला होता तेव्हा त्याची चर्चा चांगलीच रंगली होती, आता गुजरातमध्ये अशा पद्धतीने मोदींचा फोटो चॉकलेटवर आल्याने नेटकरी चांगलेच संतप्त झाले आहेत.
रोज बातम्यांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर वाढत असल्याचे आपण ऐकत आलो आहोत, महागाईने जनता चांगलीच होरपळली आहे त्यात मोदींचे समर्थक अशा पद्धतीचे प्रसिद्धी त्यांना देत असल्याने जनमानसात नक्कीच या गोष्टीची गंभीरपणे दखल घेतली जात असून त्यावर टीका देखील केली जात आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.