' विजेविना चालणारं, कमी पैशात घरीच तयार करता येणारं ट्रेडमिल, एक अनोखा शोध – InMarathi

विजेविना चालणारं, कमी पैशात घरीच तयार करता येणारं ट्रेडमिल, एक अनोखा शोध

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एका राज्यात एका राक्षसाने खूपच धुमाकूळ घालून प्रजेला त्रास देणे सुरू केले. तेव्हा त्या राज्याच्या राजाने दवंडी पिटवली की जो कोणी या राक्षसाचा वध करेल त्याला अर्धे राज्य देण्यात येईल व त्याचा राजकन्येशी विवाह करून देण्यात येईल.

ही गोष्ट एका सुताराने ऐकली आणि त्याला एक कल्पना सुचली. त्याने आपले कौशल्य वापरुन एक लाकडी घोडा तयार केला जो उडू शकत होता तसेच तो सर्व शस्त्रास्त्रांने युक्त असाही होता. त्या घोड्याच्या मदतीने त्या सुताराने राक्षसाचा वध तर केलाच, पण राजकन्या देखील पटकावली.

सांगायचा मुद्दा हा की आज ही परिस्थितीनुसार कोणत्याही गोष्टीची तरतूद किंवा जुगाड करायचा झाला, तर आपल्या भारतीय लोकांसारखा जुगाड कोणीच करू शकत नाही. मग ते सायकलचे चाक वापरुन नारळ सोलण्याचे मशीन तयार करणे असो की टेट्रा पॅक पासून फर्निचर करणे असो अथवा घरातील छोट्या छोट्या वस्तूंचा वापर करून नवीन गोष्टी तयार करणे असो जुगाड करण्यात भारतीय अग्रेसर असतात हे नक्की.

हे सगळे सांगण्याचा उद्देश म्हणजे तेलंगणाच्या एका शिल्पकाराने तयार केलेली विजेशिवाय चालणारी लाकडी ट्रेडमिल. होय! मित्रांनो हे खरे आहे. या शिल्पकाराने तयार केलेल्या ट्रेडमिल च विडियो सर्वत्र व्हायरल होत असून त्याचे नेटीजन्स मध्ये कौतुक होत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

भारतातील उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्राचे (Mahinda and Mahindra) प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात.त्यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने लाकडाची ट्रेडमिल (Wooden Treadmill) बनवली आहे.

यशस्वीरित्या तयार झालेल्या या ट्रेडमिलवर तो व्यक्ती धावतानाही या व्हिडिओमध्ये दिसतो आहे. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून ट्रेडमिल बनवणाऱ्या या व्यक्तीचं कौतुक केलं आहे.

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत लिहिलंय, की “कमॉडिटीच्या या जगात हे उपकरण हाताने तयार केलं आहे. कारागिरीची आवड, हाताने बनवण्यासाठी तासनतास केलेले प्रयत्न त्यामुळेच हे केवळ एक ट्रेडमिल नसून ही एक कला आहे. मलाही हे ट्रेडमिल हवं”

अशा शब्दात त्यांनी या अनोख्या ट्रेडमिल बनवणाऱ्या व्यक्तीचं कौतुक केलं आहे. हा कलाकार आहे तरी कोण? याची तुम्हाला उत्सुकता असेल ना? तर चला जाणून घेऊया अनोख्या शिल्पकाराबद्दल.

 

treadmill im

 

आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील श्रीनिवास या शिल्पकाराने एक लाकडी ट्रेडमिल तयार केली ( Wooden Treadmill ) आहे. त्यांनी आपल्या हाताने ते बनवले असून ते खूप स्वस्त देखील आहे.

पूर्व गोदावरी जिल्ह्यातील मनाडपेटा या गावातील श्रीनिवास यांनी गावातीलच एका व्यक्तीला ट्रेडमिल वापरताना पाहिले. त्यानंतर त्यांनी ट्रेडमिल बाबत संपूर्ण माहिती घेतली. नेमके कशा पद्धतीने ट्रेडमिल कार्य करते व तांत्रिक बाबी जाणून घेतल्या. त्याचबरोबर ट्रेडमिल बाजारात किती रुपयांत मिळते व तयार करण्यासाठी किती खर्च येतो, याबाबत त्यांनी माहिती मिळवली.

त्यानंतर त्यांनी आपल्या घरीच ट्रेडमिल बनवले. त्यासाठी त्यांना केवळ दहा हजार रुपये इतका खर्च आला. त्यांनी तयार केलेली ट्रेडमिल यशस्वीपणे काम करत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी एक उत्तम पर्याय हे लाकडी ट्रेडमिल असू शकते.

याबाबत माहिती मिळताच आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत श्रीनिवासचे कौतुक केले व लाकडी ट्रे़डमिल हवी आहे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच तेलंगाणाचे आयटी मंत्री केटीआर ( Minister KTR ) यांनी श्रीनिवासच्या या कार्याचे ट्वीट करत कौतुक केले आहे.

 

treadmill im1

 

हा अनोखा आविष्कार पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. तुम्ही तुमच्या आयुष्यात लाकडापासून बनलेली ट्रेडमिल कधीच पाहिली नसेल. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा माणूस ट्रेडमिल बनवण्यासाठी लाकूड आणि नट बोल्टचा वापर करत आहे. तो नट बोल्ट लाकडात अशा प्रकारे बसवतो की तो गोलाकार गतीने फिरवता येईल.

यानंतर, तो लाकडाचे छोटे तुकडे वापरून एक उत्तम ट्रेडमिल बनवतो, जी विजेशिवाय चालते. त्याचे दोन फायदे आहेत. एक, तुमची विजेची बचत होईल आणि दुसरे म्हणजे तुमचा व्यायामही होईल. त्या व्यक्तीची ही अप्रतिम सर्जनशीलता पाहून सगळे आश्चर्यचकित झाले आहेत.

सोशल मीडियावर @ArunBee या नावाच्या युजरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘विद्युतशिवाय काम करणारी ग्रेट ट्रेडमिल’. ४५ सेकंदांच्या या व्हिडी’ओला आतापर्यंत १ लाख ५० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर ५ हजारांहून अधिक लोकांनी व्हिडीओला लाईक केले आहे.

 

treadmill im2

 

त्याचबरोबर हा व्हिडीओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘हा खऱ्या प्रतिभेचा पुरावा आहे’, तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘हे खरे इंजीनियरिंग आहे’.

तेव्हा मित्रांनो आता व्यायाम होईल आणखी सोपा कारण आले आहे विजेशिवाय चालणारे ट्रेडमिल…! लेख कसा वाटला ते नक्की कळवा आणि वाचत रहा इनमराठी वरील विविध विषयांवरील अनोखे लेख!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?