कश्मिरी पंडितांच्या व्यथेबद्दल बोलण्यासाठी विवेक-पल्लवीला ब्रिटिश संसदेकडून निमंत्रण!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
११ मार्चला प्रदर्शित झालेला ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट रोज नवेनवे विक्रम रचतो आहे. काश्मिरी पंडितांवर झालेला प्रचंड अन्याय आणि त्यांना आपल्याच राज्यातून पळून जावं लागणं हा अत्यंत ज्वलंत विषय या चित्रपटातून आपल्या समोर आला.
आपल्याच हिंदू बांधवांचं आपल्याला माहीत नसलेलं हे भीषण वास्तव चित्रपटातून प्रभावीपणे दाखवल्याबद्दल जो तो चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे आभार म्हणतोय.
एकीकडे या चित्रपटाला भरभरून कौतुक मिळत असताना दुसरीकडे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला. मात्र चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसच्या कमाईवर त्याचा काहीही परिणाम झाल्याचं दिसून येत नाहीये. या चित्रपटाने आतापर्यंत २३१ कोटींची कमाई केली आहे.
काही समीक्षकांच्या पसंतीला हा चित्रपट उतरला मात्र काहींच्या नाही, पण आता या चित्रपटाच्या यशावर मानाचा तुरा खोवणारी आणखी एक गोष्ट घडणार आहे.
पुढल्या महिन्यात चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी आणि या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री पल्लवी जोशी यांना काश्मिरी पंडितांच्या दैन्यावस्थेवर बोलण्यासाठी थेट ब्रिटिश संसदेकडून निमंत्रण आलं आहे.
चित्रपटात मांडलेल्या या इतक्या महत्त्वाच्या विषयावर बोलायला चित्रपटाच्या दिग्दर्शकाला आणि त्यांच्या पत्नीला ब्रिटिश संसदेत बोलावलं जाणं ही बाब प्रत्येक भारतीयासाठी निश्चितच अभिमानाची आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांना हे निमंत्रण आलेलं असून ते पुढल्या महिन्यात ब्रिटिश संसदेत जाणार आहेत. १९९०च्या दशकात काश्मिरी पंडितांना कशाकशातून जावं लागलं याविषयी ते तिथे बोलतील.
या पोर्टलने घेतलेल्या मुलाखतीदरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री म्हणाले, “हो. मला आणि माझ्या पत्नीला ब्रिटिश संसदेत आमंत्रित केलं गेलं आहे. पुढल्या महिन्यात आम्ही तिथे जाणार आहोत. काश्मिरी पंडितांवर झालेला अत्याचार आणि संहार जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा या उद्देशाने हा चित्रपट बनवला गेला होता. आम्हाला आमचा हा उद्देश सफल होतोय याचा मला आनंद आहे.”
ते पुढे म्हणाले, “हा चित्रपट देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यात अगदी सहज पोहोचतो आहे. यासाठी आम्ही काही केलेलं नाही. कारण, लोकांना प्रभावित करण्याचं सामर्थ्य आमच्याकडे नाहीये. हे सगळं परमेश्वराच्या हातात आहे. आम्ही केवळ एक माध्यम आहोत.”
अभिषेक अग्रवाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, चित्रपटाला मिळालेलं यश पाहता हा चित्रपट वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
ट्रेड ऍनॅलिस्ट तरण आदर्श यांना न्यूज १८ने या आठवड्याच्या सुरुवातीला हा चित्रपट सगळे विक्रम मोडून सर्वाधिक कमाई केलेल्या १० चित्रपटांच्या यादीत स्थान पटकावेल का अशी विचारणा केली होती. इतक्या लवकर याविषयी काही सांगता येणार नाही पण येत्या काही दिवसांत ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट नक्कीच विक्रम तोडेल अशी प्रतिक्रिया त्यांनी यावर दिली.
–
- १९९० साली ज्या पंडितांनी काश्मीर सोडलं नाही, त्यांच्यासमोर उभं ठाकलं भयंकर संकट
- कश्मिर फाईल्स मधले ७ सीन्स सेन्सॉरने हटवले, नाहीतर वाद आणखीन चिघळला असता!
–
ते म्हणाले, “हो. काहीच सांगता येत नाही. बॉक्स ऑफिसवर काय होईल याचा अंदाज बांधता येत नाही. एखाद्या मोठ्या चित्रपटासाठी १०० कोटी कमावणं ही गोष्ट महत्त्वाची नाही, पण तुमच्या चित्रपटासारख्या चित्रपटाला यासाठी श्रेय दिलं गेलं पाहीजे असं मला मनापासून वाटतं. २०० कोटींची कमाई झाली आहे त्यामुळे आपल्याला वाट बघून काय होतंय हे पाहायचं आहे. पण येत्या काही दिवसांत बरेच विक्रम मोडले जातील असं मला मनापासून वाटतं.”
प्रचंड मोठ्या समूहाला खेचून आणण्याची किती विलक्षण ताकद चित्रपटात असते हे ‘द काश्मीर फाईल्स’च्या यशाकडे पाहून आपल्या नव्याने लक्षात आलंय. यापुढेही वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी, कलाकारांनी आपापल्या कलाकृतींतून आपल्याला माहीत नसलेले असे महत्त्वाचे विषय लोकांसमोर आणण्याचं धाडस करावं ही अपेक्षा आणि सदिच्छा!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.