यंदाच्या ऑस्करमध्ये बाजी मारलेल्या ‘कोडाचं’ कनेक्शन एका बॉलीवूडच्या सिनेमाशी आहे
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
जगात भारी गोष्टींची यादी बनवायची ठरवली तर त्यात अकादमी अर्थात ऑस्कर पुरस्कारांचा क्रमांक खूप वरचा असेल यात शंकाच नाही. सर्व सिने पुरस्कारांत जगात भारी असा हा पुरस्कार खरोखरच जगातल्या भारी चित्रपटांसाठी दिला जातो आणि म्हणून केवळ नामांकन मिळालेले चित्रपटही जगात भारी समजले जातात. तर यंदाच्या या जगात भारी पुरस्कार सोहळ्यात जगातला या वर्षीचा भारी चित्रपट म्हणून CODA या चित्रपटाला गौरविण्यात आलं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
जगभरात या चित्रपटाचं कौतुक होऊ लागलं. ज्यांना या विषयी ऐकूनही माहित नव्हतं ती मंडळी गुंगल घाटावर धावून धावून माहितीच्या घागरी भरभरुन आणू लागले आणि मग अचानक एक गोष्ट लक्षात आली की, अरेच्चा! ये तो बिल्कुल भी नया नहीं है.
भारतीय प्रेक्षकांत कोडा वेगळ्याच कारणानं चर्चेत आला. ही वेगळी चर्चा का चालू झाली हे आपण पाहूच पण त्याआधी CODA चं थोडक्यात कथानक काय आहे हे पाहू. कारण ऑस्कर पुरस्कार हे नेहमीच “हटके” प्रयत्नांचं कौतुक करतात.
यंदा CODA नं पुरस्कार पटकावून या “हट के” कथेला जगभरात पोहोचविलं आहे. तर थोडक्यात सांगायचं तर हे कथानक अशा नायिकेभोवती फ़िरतं जिला संगीताची आवड आहे. (यात काय विशेष वेगळं, नाही का?). घरची परिस्थिती ठिक ठाक आहे त्यामुळे ही नायिका रुबी कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी काम करते.सकाळी अर्थार्जन आणि नंतर शाळा असं तिचं आयुष्य चालू आहे. हे सगळं करताना गाणं शिकण्याची, गाण्याची उर्मी तिला स्वस्थ बसू देत नाही आणि इथू सुरु होतो तिचा एक वेगळा प्रवास ज्यात तिला तिचा गायक प्रयकर साथ देतो.
इथंपर्यंत कथा ऐकून तुम्हाला वाटलं असेल की, या सगळ्याचा आणि या खास लेखाचा काय संबंध? तर तो संबंध असा आहे की, या नायिकेच्या कुटुंबात ती एकमेव “ऐकू, बोलू” शकणारी सदस्य आहे. मुकबधीर आईवडिलांची मुलगी रुबीची गोष्ट म्हणजे यंदाचा सर्वोत्कृष्ट CODA चित्रपट. मंडळी आलं का लक्षात?
आपल्या बॉलिवुडच्या खामोशी द म्युझिकलवर बेतलेला CODA यंदा जगात भारी सिनेमा ठरला आहे. मात्र हा चित्रपट २०१४ च्या ला फॅमिली बेलियर चा रिमेक असल्याचं CODA कारांचं म्हणणं आहे.फॅमिलीची नायिका पॉला ही सोळा वर्षांची असून कर्णबधीर पालक आणि भाऊ यांची सामान्य जगाला जोडणारी दुभाषी आहे.
गाता गळा असणार्या पॉलाला एक दिवस एक संगित शिक्षिका भेटते आणि इथून पुढे तिचं आयुष्य बदलतं. मात्र आपला आवाज सारं जग ऐकत असताना, कौतुक करत असताना आपले आईवडिल ऐकू शकत नाहित ही वेदना तिला बेचैन करते आहे. पॉला प्रमाणेच CODA ची रुबी देखिल सतरा वर्षांची आहे जिचे पालक कर्णबधीर आहेत. तिचा कार्यक्रम ज्या दिवशी आणि ज्या ठिकाणी आहे तिथे तिचे कर्णबधीर पालक येतात मात्र त्यांना प्रवेश नाकारला जातो. अखेरीस ते येतातही मात्र समोर रुबी गाताना त्यांना फ़क्त “दिसते” ऐकता येत नाही.
गाता गाता रुबीचं लक्ष त्यांच्याकडेही आहे. आपल्या आईवडिलांच्या आजूबाजूचे आपलं गाणं आनंदानं ऐकत असताना, कौतुकाची टाळी वाजवत असताना आपले आईवडिल मात्र ऐकता न आल्यामुळे त्यांचा आनंदत तिला अर्धवट वाटतो आणि मग ती आपसूकपणे त्यांच्याशी सांकेतिक भाषेत गाण्यातून बोलू लागते. आता त्यांना ती गाताना नुसती दिसत नाही तर “ऐकायलाही” येते.
१९९६ साली आलेल्या संजय लीला भन्साळी या गुणी दिग्दर्शकानं हीच कथा लिहून आपला पहिला चित्रपट प्रदर्शित केला, खामोशी द म्युझिकल. या चित्रपटासाठी त्याची पहिली पसंती होती त्याची प्रचंड आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षित. मात्र काही कारणांमुळे माधुरीला घेणं शक्त झालं नाही आणि ही भूमिका मनिषा कोईरालाकडे आली.
आपल्या करियरच्या उताराला लागलेल्या मनिषानं या भूमिकेचं सोनं केलं. पुढे या भूमिकेचा तिचं करियर उभारी घ्यायला फ़ारसा उपयोग झाला नाही हा भाग वेगळा. मात्र बॉलिवुडमधे पहिल्यांदाच मुख्य प्रवाहात वेगळा विषय मांडण्याचं धाड संजय लीला भन्साळी या तरूणानं केलं. पुढे साधारण दशकभरानंतर फ्रेंचमधे ला फ़ॅमिली बेलियार प्रदर्शित झाला होता, ज्याचं कथानक खामोशीशी मेळ खाणारं होतं.
या चित्रपटाला ४० व्या सीझर पुरस्कारांत सहा नामांकनं मिळाली होती आणि लुआनला एमरेसाठी सर्वोत्कृष्ट आशादायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. खामोशी द म्युझिकलला त्या वर्षीचे भारतातील प्रतिष्ठीत फ़िल्मफ़ेअर पुरस्कर याप्रमाणे मिळाले होते, सर्वोत्कृष्ट चित्रपट (संजय लीला भन्साळी, सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शन (नितिन देसाई), सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनिंग (जितेंद्र चौधरी) आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मनिषा कोईराला).
–
- संजय लीला भन्साळीला देवदासची प्रेरणा चक्क वडिलांमुळे मिळाली होती
- सलमान ते राणी; सर्व स्टार्स अंडरवर्ल्डच्या मुठीत, पण निडरपणे सामना करणारी एकटी प्रिती!
–
म्हणूनच यंदाच्या जगात भारी ऑस्कर विजेत्या चित्रपटाचं मूळ भारतीय कथानक चित्रपट गृहात झळकून दोन दशकं ओलांडून गेलेली आहेत. ऑस्कर इतिहासात बहुदा प्रथम असं घडलं असावं की भारतीय चित्रपटाच्या कथानकाशी मेळ खाणारा चित्रपट इथे पुरस्काराची बाजी मारुन गेला आहे.
१९९८ साली बियॉण्ड द सयलेन्स आलेला चित्रपट देखिल कर्णबधीर पालकांच्या “नॉर्मल” मुलीची गोष्ट होता. शारैक व्यंग्य असणार्या पालकांना आपल्या मुलीचं संगोपन करताना येणार्या अडचणी आणि अखेरीस तिला तिच्या अवकाशात मुक्त विहार करु देण्यासाठी झालेला त्यांचा मानसिक संघर्ष अशी या बियॉण्ड द सायलेन्सची गोष्ट होती.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.