' ऑस्कर सोहळ्यातल्या विल स्मिथच्या वर्तणूकीमागे ‘ही’ कारणं असू शकतात! – InMarathi

ऑस्कर सोहळ्यातल्या विल स्मिथच्या वर्तणूकीमागे ‘ही’ कारणं असू शकतात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ऑस्कर पुरस्कार सोहळ्याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलेलं असतं,  जगाच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या कलाकृती इथे सादर होतात आणि त्यांचा सन्मानदेखील केला जातो. पुरस्कार मिळणं दूरच राहिलं, ऑस्करसाठी नामांकन मिळालं तरी लोकं त्यात धन्यता मानतात!

अशाच कालच्या ऑस्कर २०२२ च्या सोहळ्याला गालबोट लागलं ते एका विनोदामुळे. क्रिस रॉक या अमेरिकन कॉमेडियनने ऑस्करच्या सूत्रसंचालनादरम्यान हॉलीवूडमधला प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथच्या बायकोच्या आजाराविषयी एक विनोद केला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

विल स्मिथच्या बायकोला alopecia हा आजार आहे ज्यामध्ये डोक्यावरचे केस विरळ होतात किंवा गळतात.

याविषयीच क्रिसने लाईव्ह सोहळ्यात एक विनोद केला, सुरुवातीला विल स्मिथने याला हसून दाद दिली पण नंतर काहीच क्षणात तो स्टेजवर गेला आणि त्याने क्रिस रॉकच्या चक्क थोबाडीत मारली.

 

will smith slap IM

 

लाईव्ह शोमध्ये हे असं काही पाहून सगळेच दंग होते, नंतर विल आपल्या जागेवर येऊन बसला आणि यापुढे माझ्या बायकोचे नाव घ्यायचे नाही अशी ताकीदही त्याने क्रिसला दिली.

या घटनेनंतर सगळीकडेच याची चर्चा होऊ लागली. हॉलिवूडमधल्या कित्येक मोठमोठ्या लोकांनी विल स्मिथच्या या वर्तणूकीवर टीका केली तर काहींनी विल स्मिथला पाठिंबा दिला.

सर्वप्रथम जेव्हा हे लोकांनी लाईव्ह शोमध्ये पाहिलं तेव्हा सगळ्यांना हे ठरवून केलंय असंच वाटलं, पण नंतर यावर जसजसं स्पष्टीकरण आलं तसं यामागची पार्श्वभूमी लोकांच्या समोर आली.

याबद्दल विल स्मिथनेदेखील क्रिस रॉकची जाहीर माफी मागितली. “कोणत्याही प्रकारची हिंसा ही विनाशकारी असते, ऑस्कर सोहळ्यातील माझे वर्तन चुकीचे आणि अक्षम्य होते. माझ्या पत्नीच्या वैद्यकीय स्थितीची खिल्ली उडवल्याने माझ्या सहनशक्तिचा अंत झाला आणि म्हणून मी हे पाऊल उचलेले याचा मला खेद आहे!” असं म्हणत विलने याबाबत माफीदेखील मागितली आहे.

 

will smith 3 IM

 

पण तुम्हाला माहीत आहे का की विल स्मिथ आणि क्रिस रॉक यांच्यातले हे वाद काही आजच घडलेली घटनेमुळे नाहीत. याआधीसुद्धा क्रिस रॉकने टॉक शो आणि सूत्रसंचालनाच्या माध्यमातून विल स्मिथ आणि त्याच्या बायकोला टोमणे मारले आहेत.

१९९७ साली क्रिस रॉक शोमध्ये विल स्मिथची पत्नी Jada smith ला बोलावण्यात आलं होतं, आणि त्यावेळेससुद्धा हा टॉक शो संपल्यानंतर क्रिसने एक शॅंपेनची बाटली jada ला भेट म्हणून दिली कारण तिने संपूर्ण शोमध्ये विल स्मिथबद्दल काहीही भाष्य केलं नव्हतं म्हणून.

या शोची क्लिप तुम्ही यूट्यूबवर बघू शकता, यातून क्रिसने कशाप्रकारे विल स्मिथवर निशाणा साधला होता याचादेखील तुम्हाला अंदाज येईल.

 

 

तसंच आणखीन एका टॉक शोमध्ये क्रिसने विल स्मिथवर एक विनोद केला कारण विल स्मिथ हा त्यांच्या इंडस्ट्रीतल्या बऱ्याच मित्रांना मिळालेल्या यशामुळे चिंतीत होता आणि यामुळेच विल आणि इंडस्ट्रीतल्या लोकांमध्ये कटुता आली असं क्रिसने स्पष्ट केलं!

अमेरिकेमध्ये ब्लॅक आणि व्हाईट मुद्दा सतत चर्चेत असतोच आणि सिनेमा आणि पुरस्कार सोहळ्यामधून तर त्यावर भाष्य केलंच जातं. २०१६ च्या ऑस्कर दरम्यानसुद्धा हा वाद ऐरणीवर आला होता.

ऑस्कर नॉमिनेशनमध्ये वैविध्य नसल्याने काही मोठ्या स्टार्सनी त्यावेळच्या ऑस्करवर बहिष्कार घातला होता. यामध्ये विल स्मिथच्या पत्नीचासुद्धा सहभाग होता. तेव्हाच्या शोमध्येसुद्धा क्रिस रॉकने हा मुद्दा उचलून विल स्मिथच्या पत्नीवर आणि एकंदरच boycott करणाऱ्या लोकांवर टिप्पणी केली होती!

 

chris rock IM

 

खरंतर हे सगळे वाद आपल्याला TRP साठी केलेला खेळ वाटू शकतात, पण विल स्मिथने यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात क्रिस रॉकला थोबडवण्यामागे ही काही कारणं असू शकतात त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

आपल्याला विल स्मिथचं वर्तन दिसतं, पण त्यामागची ही पार्श्वभूमी फारशी कोणाला ठाऊक नसते.

एखादी गोष्ट मनात साचून राहते आणि नंतर त्याचा स्फोट होतो असंच काहीसं विल स्मिथच्या बाबतीत झालं असेल आपण म्हणू शकतो, पण ऑस्करसारख्या मोठ्या मंचावर एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीने असं वागणं योग्य आहे का? हे प्रश्नचिन्ह उभं राहतंच.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?