‘काश्मीर भारतापेक्षा चीनकडे जास्त सुखी राहील’, फारूक अब्दुल्लांची वादग्रस्त वक्तव्ये
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारत १९४७ मध्ये इंग्रजांपासून स्वतंत्र झाला. पण, जम्मू आणि काश्मीर हे शहरं अशी होती जिथे तेव्हा सुद्धा राजकीय अस्थिरता होती, लोकांमध्ये संभ्रम होता. आपण नेमकं कोणत्या बाजूला आहोत ? किंवा कोणत्या बाजूला गेल्यास आपलं भलं होईल ? असे प्रश्न काश्मीरच्या लोकांच्या मनात घर करून होते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
हा संभ्रम कायम ठेवण्यात, किंबहुना वाढवण्यात ओमर अब्दुल्ला आणि त्यांच्या परिवाराने नेहमीच खतपाणी घातलं. आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेला योग्य दिशा दाखवणे हे खरं तर एका नेत्याचं काम असतं. पण, लोकांचा विश्वास असतांनाही, हातात एकहाती सत्ता असतांना देखील काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी कधीच लोकहिताचे निर्णय घेतले नाहीत.
सतत लोकांना धर्माच्या नावाखाली एकमेकांपासून दूर करणे, देशविरोधी विधान करणे यामुळे एक राज्य म्हणून काश्मीर मध्ये कधीच स्थैर्य आलं नाही, औद्योगिक प्रगती झाली नाही. ८४ वर्षांच्या फारूक अब्दुल्ला यांनी स्वतंत्र भारताच्या ७५ वर्षात कोणते ५ वादग्रस्त विधान केले आहेत ? याचा एक आढावा घेऊयात.
१. ‘जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फ्रन्स’चे प्रेसिडेंट फारूक अब्दुल्ला यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये लोकांचा रोष पत्करला होता जेव्हा त्यांनी हे विधान केलं होतं की, “पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओके ही पाकिस्तानची जागा आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं तरीही त्यामध्ये काहीही फरक पडणार नाही.” असं विधान करून त्यांनी काश्मीरच्या लोकांच्या मनात पाकिस्तानच्या वर्चस्वाची भावना निर्माण केली.
आपल्या विधानात फारूक अब्दुल्ला यांनी पुढे असंही म्हंटलं होतं की, “दोन्ही देश एकत्र येऊन बोलल्या शिवाय या समस्येवर तोडगा निघणार नाही आणि तोपर्यंत काश्मीरच्या लोकांना शांततेत जगता येणार नाही.”
२. जानेवारी २०१८ मध्ये फारूक अब्दुल्ला यांनी पाकिस्तान या विषयावर पुन्हा एकदा भाष्य केलं आणि हे विधान केलं की, ” पाकिस्तानच्या अधोगतीला भारत सुद्धा तितकाच जबाबदार आहे.”
फारूक अब्दुल्ला यांच्या मते, “पाकिस्तानला असं वाटतं की, बांगलादेश हा वेगळा देश निर्माण करून भारताने त्यांच्या देशात फुट पाडली आहे. भारताने जरी यात छोटी भूमिका बजावली असली तरी त्यांच्या देशाच्या सर्वात मोठ्या दुःखाला आपण कारणीभूत आहोत हे सत्य आहे.”
एका भाषणात बोलतांना फारूक अब्दुल्ला यांनी भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्याचा देखील उल्लेख केला होता. अटलजींनी जेव्हा पाकिस्तान सोबत सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा त्यांनी एक विधान केलं होतं की, “आपण मित्र बदलू शकतो, शेजारी नाही. शेजारी देशांनी जर एकत्र येऊन काम केलं तर दोघांचीही प्रगती होऊ शकते, शांतता प्रस्थापित होऊ शकते.”
अटलजींनी भारत-पाक संबंध सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नानंतरही पाकिस्तानने त्यांचे जे रंग दाखवले ते माहीत असूनही फारूक अब्दुल्ला यांनी ती आठवण काढली होती आणि तत्कालीन पंतप्रधानांना पुन्हा तसं वातावरण निर्माण करण्याचा चुकीचा सल्ला दिला होता.
३. नोव्हेंबर २०१८ मध्ये जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला हे एका प्रचार सभेत बोलतांना असं म्हणाले की, “तुम्ही (भारताने) एक पाकिस्तान तयार केला आहे. अजून किती पाकिस्तान निर्माण करण्याची तुमची इच्छा आहे ? भारताचे अजून किती तुकडे करण्याची तुमची इच्छा आहे ?”
–
- काश्मीर फाईल्सबद्दल अविनाश धर्माधिकारी सरांचं मत विचारात पाडणारं आहे
- काश्मीर फाईल्सप्रमाणे हिंदूंवर अन्याय झालेल्या या ज्वलंत विषयांवर चित्रपट यावेत, प्रेक्षकांची मागणी
–
फारूक अब्दुल्ला यांनी केवळ भारताला उद्देशूनच वादग्रस्त विधानं केली नाहीत, तर पाकिस्तानला उद्देशून सुद्धा काही चिथावणीखोर विधानं केली होती. भारताच्या राष्ट्रीय वृत्तवाहिनी सोबत बोलतांना फारूक अब्दुल्ला एकदा बोलले होते की, “पाकिस्तान, तुम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का ? पीओके तुमच्या हक्काचा आहे.”
“काश्मीरच्या लोकांनी पाकिस्तानच्या हाताने मरावं का ?” असा प्रश्न देखील फारूक अब्दुल्ला यांनी आपल्या देशाला केला होता.
४. सप्टेंबर २०२० मध्ये फारूक अब्दुल्ला बरळले होते की, ” काश्मीरचे लोक हे भारतापेक्षा चीनच्या नेतृत्वाखाली जास्त सुखी राहू शकतील. काश्मीरच्या लोकांना ते ‘भारतीय’ आहेत असं अजिबात वाटत नाही. काश्मीरचे लोक हे स्वतःकडे नेहमीच एक ‘गुलाम’ म्हणून बघतात. दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून आम्हाला या देशात अजून किती वर्ष जगावं लागणार आहे हा एक प्रश्नच आहे.”
५. ऑक्टोबर २०२० मध्ये जेव्हा संपूर्ण देश काश्मीर मधून कलम ३७० काढून टाकल्याचं स्वागत करत होता तेव्हा फारूक अब्दुल्ला मात्र या गोष्टीने प्रचंड नाखूष होते. या निर्णयामुळेच भारत आणि चीनमधील संबंध बिघडत आहेत असं फारूक अब्दुल्ला यांचं म्हणणं होतं. “लडाख मध्ये निर्माण झालेला तणाव हा ३७० कलम हटवण्याचा परिपाक आहे ” असं त्यांचं मत त्यांनी जाहीर केलं होतं. फारूक अब्दुल्ला यांनी अशी वादग्रस्त इच्छा व्यक्त केली होती की, ” येत्या काही वर्षात चीन भारतावर दबाव आणेल आणि कलम ३७० हे काश्मीर मध्ये परत लागू केलं जाईल.”
फारूक अब्दुल्ला यांच्यासारख्या राजकीय व्यक्तींमुळेच काश्मीरमध्ये बंडखोरी उदयास आली असं म्हणावं लागेल. ज्या देशाचे तुम्ही नागरिक आहात त्या देशाप्रती आपलं मत चांगलं असावं, बहुमताने निवडून आलेल्या नेतृत्वावर विश्वास असावा हे कधीतरी फारूक अब्दुल्ला यांना कळेल अशी आशा करूयात.
“आपलं घर हे आपलं असतं आणि शेजारी हा शेजारीच असतो आणि पाकिस्तान सारखा शेजारी असल्यापेक्षा शेजार नसलेलं बरं” हे संपूर्ण देशाचं मत जेव्हा फारूक अब्दुल्ला यांना कळेल तेव्हाच ते बदलतील हे ही तितकंच खरं आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.