' दाऊद इब्राहिम ते छोटा राजन, या १० अंडरवर्ल्ड डॉन्सची खरी नावं माहिती आहेत का? – InMarathi

दाऊद इब्राहिम ते छोटा राजन, या १० अंडरवर्ल्ड डॉन्सची खरी नावं माहिती आहेत का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५० साली मुंबईमध्ये दारू वर बंदी आणली गेली. यानंतर मुंबई मध्ये असणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी स्वतःच्या दारूच्या भट्टी सुरु केल्या आणि याचसोबत दारुची तस्करी देखील सुरुवात केली. या सर्व अवैध कामांना पोलिसांचे संरक्षण होते, असेही अनेकदा म्हटले जाते. हळूहळू हा व्यवसाय वाढत गेला आणि नंतर या संपूर्ण व्यवसायावर ताबा मिळवण्यासाठी गुंडानी एकमेकांना मारायला सुरुवात केली आणि येथूनच मुंबईमध्ये गैंगवॉर सुरु झाले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

बघता बघता अंडरवर्ल्ड वाल्यांनी बॉलीवुड, व्यापार वर्ग आणि इतर लोकांचे अपहरण करने आणि त्यांच्याकडून हफ्ते गोळा करणे सुरु केले. मुंबई अंडरवर्ल्डमध्ये आतापर्यंत असे अनेक डॉन आहेत ज्यांच्या रक्तरंजित कहाण्या खूप गाजल्या आहेत.

१९६०-७० पर्यंत करीम लाला, वरदराजन मुदलियार आणि हाजी मस्तान नावाचे तीन डॉन मुंबई अंडरवर्ल्डवर हुकूमत चालवत असत. तर यांच्यानंतर आले ते म्हणजे दाऊद, छोटा राजन, बडा राजन, मन्या सुर्वे, इत्यादी. परंतु यातील बहुतेक डॉन खोटे नाव वापरत असत.

चला तर मग जाणून घेऊया अंडरवर्ल्ड मधील या १० डॉनची खरी नावे :-

 

dawood-ibrahim InMarathi

 

१. दाऊद इब्राहिम
मुंबईतील डोंगरी येथे राहणारा दाऊद इब्राहिम हा दहशतवादी, गँगस्टर आणि ड्रग तस्कर आहे. त्याचे पूर्ण नाव दाऊद इब्राहिम कासकर आहे, तसेच हा ७० च्या दशकात मुंबईत सुरू झालेल्या डी-कंपनीचा प्रमुख आहे.

२. छोटा शकील
डी-कंपनीचा हा एक प्रमुख म्होरक्या आहे. छोटा शकीलचे खरे नाव मोहम्मद शकील बाबू मियाँ शेख आहे.

३. टायगर मेमन

 

tiger memon im

१९९३ च्या मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामधील टायगर मेमन हा एल प्रमुख आरोपी आहे. याचे खरे नाव इब्राहिम मुस्ताक अब्दुल रज्जाक मेमन आहे.

४. करीम लाला
अंडरवर्ल्ड माफिया डॉन करीम लाला याचे खरे नाव अब्दुल करीम शेर खान आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात अजय देवगणची यांची भूमिका साकारली आहे.

५. हाजी मस्तान

haji mastan im

 

माफिया डॉन हाजी मस्तानचे खरे नाव मस्तान मिर्झा आहे. त्यांना सुलतान मिर्झा या नावानेही ओळखले जाते. वन्स अपॉन अ टाइम या चित्रपटात अजय देवगणने हाजी मस्तानची भूमिका केली होती.

६. अबू सालेम
गँगस्टर आणि दहशतवादी अबू सालेमचे खरे नाव अकील अहमद आझमी आहे. याला अबू समाना असेही म्हणतात. हा देखील १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणात प्रमुख आरोपी आहे.

७. छोटा राजन

 

chhota rajan inmarathi

मुंबईत घडणाऱ्या बहुतांश गुन्हेगारी घटनांमागेमागे छोटा राजनचे हात असायचे. याचे खरे नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे आहे.

८. मन्या सुर्वे
मुंबईतील निडर आणि अंडरवर्ल्ड डॉन मन्या सुर्वेचे खरे नाव मनोहर अर्जन सुर्वे आहे. अभिनेता जॉन अब्राहमने शूटआउट अॅट वडाळा या चित्रपटात यांची व्यक्तिरेखा साकारली होती.

९.  अरुण गवळी

arun gawli featured IM

गँगस्टर, राजकारणी नेता आणि अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याचे खरे नाव अरुण गुलाब अहिर आहे.

१०. बडा राजन
मुंबई अंडरवर्ल्ड डॉन बडा राजनचे खरे नाव राजन महादेवन नायर असून तो मूळचा केरळचा आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?