आपल्या लाडक्या क्रिकेटर्सचा पगार पाहून तुमचे डोळे चक्रावतील!
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
फुटबॉल नंतर जगातील सर्वात जास्त लोकप्रिय असणारा खेळ आहे क्रिकेट! या खेळात पैसा आहे आणि प्रसिद्धी सुद्धा आहे. हेच कारण आहे की यामुळे भारतातील बहुतांश तरुण क्रिकेट मध्ये आपले करियर करू इच्छितात. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड प्रत्येक खेळाडूला त्याच्या कामगिरीनुसार मानधन देते. हे मानधन यासाठी दिले जाते जेणेकरून खेळाडू क्रिकेटच्या मैदानात चांगले प्रदर्शन करतील आणि भारतीय क्रिकेट यशाच्या शिखरावर घेऊन जातील.
नुकतीच भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने आपल्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या मानधनात दुप्पटीने वाढ केली आहे. BCCI ने आपल्या खेळाडूंना तीन श्रेणींमध्ये विभागले आहे. या श्रेणी पुढीलप्रमाणे – A,B आणि C! या श्रेण्यांनुसार भारतीय खेळाडूंना मानधन दिले जाते.
१. A श्रेणीमध्ये येणाऱ्या खेळाडूंना वार्षिक मानधन २ कोटी रुपये आहे.
२. B श्रेणीमध्ये येणाऱ्या खेळाडूंना वार्षिक मानधन १ कोटी रुपये आहे.
३. C श्रेणीमध्ये येणाऱ्या खेळाडूंना वार्षिक मानधन ५० लाख रुपये आहे.
जो खेळाडू सर्वात उत्तम प्रदर्शन करत असेल त्याला A श्रेणीमध्ये स्थान दिले जाते आणि सर्वात जास्त मानधन दिले जाते. आतापर्यंत या श्रेणीमध्ये कोहली, धोनी, अश्विन आणि रहाणे हे चारच खेळाडू होते, परंतु आता यामध्ये अजून ३ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. नवीन करार ऑक्टोबर २०१६ पासून लागू करण्यात आला आहे.
A श्रेणीमध्ये असलेले खेळाडू: (गेल्या करारामध्ये या श्रेणीमध्ये ४ खेळाडू होते आणि आता ७ खेळाडू आहेत)
१. विराट कोहली
२. महेंद्रसिंग धोनी
३. अजिंक्य रहाणे
४. रविचंद्रन अश्विन
५. रवींद्र जडेजा
६. मुरली विजय
७. चेतेश्वर पुजारा
B श्रेणीमध्ये असलेले खेळाडू: (गेल्या करारामध्ये या श्रेणीमध्ये १० खेळाडू होते आणि आता ९ खेळाडू आहेत)
१. रोहित शर्मा
२. लोकेश राहुल
३. युवराज सिंह
४. इशांत शर्मा
५. भुवनेश्वर कुमार
६. मोहम्मद शमी
७. रिद्धीमान साहा
८. उमेश यादव
९. जसप्रीत बुमरा
C श्रेणीमध्ये असलेले खेळाडू: (गेल्या करारामध्ये या श्रेणीमध्ये १२ खेळाडू होते आणि आता १६ खेळाडू आहेत)
१. शिखर धवन
२. अमित मिश्रा
३. अंबाती रायडू
४. आशिष नेहरा
५. मनीष पांडे
६. अक्षर पटेल
७. हार्दिक पंड्या
८. करूण नायर
९. पार्थिव पटेल
१०. यजुवेन्द्र चहल
११. जयंत यादव
१२. मनदीप सिंह
१३. धवल कुलकर्णी
१४. शार्दुल ठाकूर
१५. रिषभ पंत
१६. केदार जाधव
कसोटी सामना, एकदिवसीय सामना आणि T-२० (आंतरराष्ट्रीय) मध्ये एका सामन्यासाठी किती मानधन दिले जाते?
१. प्रत्येक खेळाडूला १ कसोटी सामना खेळण्यासाठी १५ लाख रुपये मिळतात.
२. प्रत्येक खेळाडूला १ एकदिवसीय सामना खेळण्यासाठी ६ लाख रुपये मिळतात.
३. प्रत्येक खेळाडूला १ T-२० सामना खेळण्यासाठी ३ लाख रुपये मिळतात.
इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की खेळाडूंना करारानुसार मिळणारे मानधन आणि प्रत्येक सामन्यासाठी मिळणारे मानधन (सामना फी) वेगवेगळे असते.
खेळाडूंना मिळणारा बोनस:
जर एखाद्या खेळाडूने एकदिवसीय किंवा कसोटी सामन्यात शतक झळकावले तर त्याला ५ लाख रुपये वेगळे बोनस म्हणून दिले जातात मग तो कोणत्याही श्रेणीमधील का असेना. कसोटी सामन्यात दुहेरी (डबल) शतक बनवल्यावर त्या खेळाडूला ७ लाख रुपये, ५ बळी घेतल्यावर ५ लाख आणि कसोटी सामन्यात १० बळी घेतल्यास ७ लाख रुपये बक्षीस म्हणून वेगळे दिले जातात.
संघाच्या कामगिरीचा बोनस :
खेळाडूंच्या प्रदर्शनाच्या आधारावर BCCI खेळाडूंना प्रदर्शन पुरस्कार सुद्धा प्रदान करते. ज्या अंतर्गत एखाद्या खेळाडूने सर्वोत्तम ३ संघांविरुद्ध अर्धशतक किंवा शतक ठोकल्यास त्या खेळाडूच्या मानधनात ३०% ते ६०% वाढ केली जाते.
आता तुम्ही म्हणाला रिटायर झालेल्यांच काय? जसं की सचिन, सेहवाग, सौरव….तर यांना देखील निवृत्ती घेतल्यानंतर BCCI कडून पेन्शन मिळते. या मानधनाव्यतिरिक्त खेळाडूंना जाहिरातदारांकडून सुद्धा बक्कळ पैसा मिळतो. आता तुम्हाला कळलं असेल की भारतात तरुण वर्ग इतर कोणत्याही खेळापेक्षा क्रिकेटला महत्त्व का दिले जाते? एकीकडे क्रिकेटमध्ये एवढा पैसा असतात, भारतातील इतर खेळ मात्र दारिद्र्यरेषेखालील गरिबासारखे जीवन जगत आहेत ही दुर्दैवी गोष्ट म्हणावे लागेल.
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page