' मार्केटिंग करावं तर असं!! सॅन्डविच विकण्यासाठी तरुणाने वापरली भारी शक्कल…. – InMarathi

मार्केटिंग करावं तर असं!! सॅन्डविच विकण्यासाठी तरुणाने वापरली भारी शक्कल….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘खाण्यासाठी जन्म आपुला’, ‘आधी पोटोबा मग विठोबा’ या म्हणी भारतीयांना अगदी चपखल लागू होतात. आपण खाण्याचे शौकीन आहोत यात काही वादच नाही. खाद्यपदार्थांचं वैविध्य जितकं भारतात आहे तितकं जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठेही सापडणार नाही असं आपण अभिमानाने म्हणतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अगदी एका प्रांतातला एक पदार्थही त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतींनी केला जातो. सगळ्यात जमेची बाब ही, की अगदी बड्या रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांपासून ते सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल इतक्या माफक दरांमध्ये आपल्याकरता मुबलक प्रमाणात स्ट्रीट फूडही उपलब्ध असतं.

 

idore food stall inmarathi

 

स्ट्रीटफूडचा आपल्याकडे स्वतंत्र फॅन क्लब आहे. आता तर फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युबवरून बसल्या जागी आपल्याला देशाच्या कानाकोपऱ्यातल्या स्ट्रीटफूडविषयी रेसिपीजपासून अगदी सगळी इत्यंभूत माहिती मिळते, पण आपल्या जिभेचे चोचले पुरेपूर पुरवणाऱ्या या स्ट्रीटफूडची विक्री नेहमीच्या गाडी किंवा स्टॉल्सवर न होता एखाद्या हटके पद्धतीने होत असेल तर?

 

मोठमोठ्या रेस्टॉरंट्समध्ये पदार्थांच्या दर्जाबरोबरीने तो कसा सर्व्ह केला जातोय यालाही तितकंच महत्त्व दिलं जातं. पदार्थ त्याच त्याच प्रकारे सर्व्ह न करता आपल्या कल्पकतेच्या जोरावर स्ट्रीटफूड विक्रेतेही एकेक करत वैयक्तिक पातळीवर शक्कल लढवून स्ट्रीटफूड सर्व्ह करू लागले तर?

आपल्याला बघताना ते छान वाटेलच पण असं करण्याकरता त्या विक्रेत्याकडे नुसतीच नाविन्यपूर्ण कल्पना असून उपयोगाचं नाही तर तितकंच आर्थिक पाठबळही असावं लागेल. सुरतच्या एका सॅन्डविच विक्रेत्याने मात्र ही कमाल करून दाखवलीये.

हा पठ्ठ्या केवळ स्टेट्स सिम्बॉल म्हणून नाही, तर चक्क आपले सँडविचेस विकण्यासाठी बुलेट वापरतो. सध्या हा सॅन्डविचवाला सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

 

sandwich bullet im

हा स्टॅन्डविच विक्रेता सुरतमध्ये ‘सॅन्डविचवाले बुलेट राजा’ या नावाने प्रसिद्ध आहे. विशेष गोष्ट अशी, की हा विक्रेता कुठल्या गाडीवर किंवा स्टॉलवर सॅन्डविच न विकता बुलेटवरून सॅन्डविच विकायला निघतो आणि आणि ‘व्हीआयपी’ रोडवर आपला ‘बुलेट स्टॉल’ लावतो.

‘बुलेट स्टॉल’? हा काय प्रकार आहे? असा प्रश्न तुम्हाला सहाजिकच पडला असेल. तर ‘हॅप्पी’ नावाच्या या मनुष्याने बुलेटमध्ये आवश्यक ते बदल करून त्यात एक ‘चारकोल स्टोव्ह’ बनवलाय. त्याचं ‘चारकोल स्टॅन्डवीच’ सुरतभर प्रसिद्ध आहे. हा सॅन्डविचवाला कोळशावर सँडविचेस ग्रील करतो.

त्याची सॅन्डविच बनवण्याची पद्धतही आपल्या नेहमीच्या सँडविचेसपेक्षा काहीशी वेगळी आहे. आपण नेहमी खातो त्या सॅन्डविचमध्ये असलेले काकडी, बीट, बटाटा हे घटक त्याच्या सॅन्डविचमध्ये नसतात.

 

sandwich im

 

सॅन्डविचला चटणी लावल्यावर तो त्यात सिमला मिरची, कांदा, कोथिंबीर आणि पातीचा कांदा घालतो. सॅन्डविच कोळशावर भाजून झालं की तो त्यावर चीज घालतो आणि ‘फूड ब्लो टॉर्च’ने ते वितळवतो. तो सॅन्डविचवर त्याचा स्पेशल मसालाही घालतो. हॅप्पीच्या स्टॉलवर सॅन्डविच खाण्याऱ्यांची भलीमोठी रांग असते. या ‘बुलेट राजा’चे सँडविचेस सोशल मीडियावर सध्या चांगलाच धुमाकूळ घालत आहेत.

फेसबुकच्या ‘स्ट्रीट फूड रेसिपीज’ या पेजवर हॅप्पी चारकोल बुलेट सॅन्डविचचा व्हिडियो शेअर केला गेला आहे. लोकांना हा व्हिडीओ तर आवडतो आहेच, पण हॅप्पी चं सॅन्डविच बघून त्यांच्या तोंडाला पाणीही सुटतंय.

 

sandwich bullet im 1

 

हा व्हिडीओ एकमेकांना शेअर करण्याच्या बरोबरीनेच लोक या व्हिडियोवर वेगवेगळ्या रिऍक्शन्स आणि कमेंट्स करत आहेत. आम्ही असं सॅन्डविच यापूर्वी कधी खाल्लेलं नाही असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे.

नुसतं सॅन्डविच खायला म्हणून आपण काही उठून सुरतला जाणार नाही. पण आपण राहतो त्याच्या आसपासच्या आणि सहज प्रवास करून जाता येईल इतपत दूर असलेल्या खाऊगल्ल्यांमध्ये, स्ट्रीटफूड विक्रेत्यांपैकी कुणी असे काही अतरंगी कॉम्बिनेशन्स करून पदार्थ बनवतंय का? आपल्या खास अंदाजात ते विकतंय का? हे तर आपण सोशल मीडियावरून आणि प्रत्यक्ष जाऊनही नक्कीच धुंडाळू शकतो.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?