' एकेकाळी जिनांचा तीव्र विरोध करणारा संघ आज प्रदर्शनात त्यांना मानाचे स्थान देत आहे – InMarathi

एकेकाळी जिनांचा तीव्र विरोध करणारा संघ आज प्रदर्शनात त्यांना मानाचे स्थान देत आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारताची फाळणी झाली आणि संपूर्ण देशाला याचा हादरा बसला, सख्खे शेजारी, एकमेकांच्या ताटात जेवणारे लोक एकमेकांच्या जीवावर उठले होते. फाळणी काळात हिंदू मुस्लिम दंगली मोठ्या प्रमाणावर उसळल्या होत्या. ब्रिटिशांनी देश सोडता सोडता फाळणीचा प्रस्ताव टाकला आणि एकच खळबळ माजली होती.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

फाळणीच्या कमिटीमध्ये माउंट बॅटन, पंडित नेहरू, महात्मा गांधी, आणि मोह्हमद अली जिना, फाळनीच्या चर्चेमध्ये मुस्लिम, शीख समुदायाने  स्वतंत्र राष्ट्र्राची मागणी मोठ्या प्रमाणावर केली होती. मुस्लिम राष्ट्राची संकल्पना आधीपासूनच जिना यांनी लावून धरली होती, आणि अखेर त्यांच्या मनासारखे झाले आणि पाकिस्तान हा वेगळा देश निर्माण झाला.

 

india-partition-riots-inmarathi

 

एकीकडे मुस्लिम लीगची स्थापना झाली होती तर दुसरीकडे हिंदू विचारसरणीवर आधारित आरएसएस या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचा मुख्य उद्देश होता की इतिहासात हिंदू धर्मावर झालेल्या मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकांच्या अत्याचार, पाश्चात्य संस्कृतीचे नको इतके अनुकरण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अल्प संख्यांक लोकांचे नको इतके लाड, इतकी सगळी कारणे यामागे आहेत.

आज यांच आरएसएस संघटनेचे अनेक कार्यक्रम देशभरात राबवले जातात. ११ ते १३ मार्च दरम्यान हे प्रदर्शन असून हे प्रदर्शन चांगलेच चर्चेत येणार आहे कारण या प्रदर्शनात चक्क मोहम्मद अली जिना यांचा फोटो लावला आहे, काय आहे नेमकी भानगड जाणून घेऊयात…

 

rss fake photo inmarathi

प्रदर्शन नेमके कशासाठी?

राज्याच्या संस्कृतीची, इतिहासाची ओळख व्हावी यासाठी आरएसएसने यंदाचे प्रदर्शन गुजरात राज्यात अहमदाबाद जवळ असलेल्या पिराना गावात भरवणार असून यात देशभरातुन १४०० वर कार्यकर्ते जमणार असे बोलले जात आहे.

गुजरात राज्यातील अनेक कलागुणांना वाव देणारे हे प्रदर्शन असून यात भरतकाम, लोकसंस्कृती, वन्यजीव, परफॉर्मिंग आर्ट, ऐतिहासिक क्षणांची माहिती अशा भरगच्च कार्यक्रमांनी हे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे.

 

bharatkam im

 

जीनांचा फोटो?

एकीकडे स्थानिक कलाकारांच्या कलाकरीचे कौतुक तर केले जाणारच आहे, तर दुसरीकडे गुजरातमधील २०० प्रतिष्ठित लोकांचे फोटो असलेला एक मोठा बोर्ड लावला गेला असून त्यात महात्मा गांधींपासून टाटा ते अगदी अंबानींपर्यंत अशी मातब्बर मंडळी आहेत. आता याच २०० लोकांमध्ये जिनांना स्थान दिले आहे.

 

jinnah featured inmarathi

 

जीनांच्या फोटोखाली एक वाक्य ही लिहले आहे एक बॅरिस्टर जो कट्टर देशभक्त होता नंतर त्याने धर्माच्या नावावर भारताची फाळणी केली. अशा शब्दात लिहल्याने विरोधकांना देखील एक प्रकारे टोला लगावला गेला आहे.

कार्यक्रमाचे समन्वयक शिरीष काशीकर यांनी आपली प्रतिक्रियेत असं म्हंटले आहे की आम्हीच अशाच लोकांची नावे घेतली आहेत ज्यांनी भारत देशासाठी योगदान दिले आहे. हा आरएसएसचा कार्यक्रम आहे आमच्या विचारधारेशी जे सहमत आहेत त्यांनाच आम्ही घेऊ असे काही नाही.

 

rss 2 im

 

मोहम्मद अली जिना हा आपल्याकडे एक वादग्रस्त विषय आहे, भाजपच्या नेत्यांनी अनेकदा जिना यांच्यावर टीका केली होती. मात्र आरएसएसने त्यांचा फोटो वापरल्याने हा विषय एका वेगळ्या वळणावर जाऊ शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?