' वाईनच्या ग्लासची उंची एवढी का असते? यामागे आहे एक कारण – InMarathi

वाईनच्या ग्लासची उंची एवढी का असते? यामागे आहे एक कारण

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

दारू, दारू, दारू…..ऐकलं तरी तळीराम लगेच मूडमध्ये येतात. अनेक लोक दारू चांगली की वाईट यावर बोलतात, तर काही त्याचे फायदे काय आणि तोटे काय हे सांगतात, पण पिणाऱ्याला वाईन असो की दारू दोन्ही चांगलीच लागतात. मग त्याला कोरी द्या, मिक्स द्या अथवा अजून काही टाकून द्या.

बरं प्रत्येक पिणाऱ्याचा स्वतःचा असा ब्रँड ठरलेला असतो. वाईनच्या बाबतीत आपण खूप गोष्टींचा विचार करतो, पण कधी त्याच्या बाजूला असणाऱ्या गोष्टींचा विचार केला आहे का? जसे की वाईनचा रंग, त्यासाठी वापरले जाणारे ग्लास.

अजून एक गोष्ट म्हणजे ज्या ग्लासमधून वाईन पितो त्याची उंची किती आणि का असते? आजच्या लेखात आपण याविषयीच माहिती जाणून घेणार आहोत.

 

wine im

 

वाईन ग्लासची खरेदी करतांना अनेक पैलूंवर लक्ष देणे गरजेचे असते. वाईन ग्लासच्या आकाराबरोबरच दुसरा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे ग्लासची ऊंची. ज्याप्रमाणे काचेच्या ग्लासची रुंदी आणि गोलाकार वक्र तुमच्या पिण्याच्या अनुभवावर परिणाम करते. त्याचप्रमाणे, वाइन ग्लासच्या स्टेमचा आकार आणि उंची देखील परिणामकारक ठरते.

काही शतकांपूर्वी म्हणजेच १७०० च्या जवळपास मद्य पिण्यासाठी लेदर कप ज्याला “पिगिन्स” असे म्हणतात, हे वापरले जायचे. आजचे काचेचे भांडे हे १७०० च्या दशकात वापरल्या जाणाऱ्या लेदरच्या कपपेक्षा सात पटीने मोठे आहे डेव्हिड मॅसिफॉन सांगतात की, ‘आज आपल्याला माहीत असलेले वाइन ग्लासेस प्रथम १७व्या ते १८व्या शतकाच्या उत्तरार्धात बनवले गेले होते.’

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सजावट व्यतिरिक्त, वाइन ग्लासेसमध्ये लांब दांडी असण्याची अनेक कारणे आहेत:

 

wine inmarathi

 

१) दांडी असण्याने वाइन ग्लास पकडण्यासाठी एक चांगली पकड मिळते.

२) तसेच दांडीमुळे वाइनचे तापमान थंड राहते, यामागचे कारण म्हणजे जर आपण एकदम ग्लासच्या बाऊलला धरले तर आपल्या शरीराच्या उष्णतेने वाइन गरम होण्याचा धोका असतो, त्यामुळे वाइन ग्लासला लांब दांडी असते.

याचबरोबर वाइन ग्लासचे अनेक प्रकार आहेत, जसे की :-

● कॅबरनेट (Cabernet)

रेड वाईन ग्लासेसपैकी कॅबरनेट प्रकारातील ग्लास हे सगळ्यात जास्त उंच असतात, कॅबरनेट वाइन ग्लासेस विशेषतः वाइनचा वास अधिक प्रमाणात घेता येईल यासाठी तयार केले जातात. यामुळे वाइन घेण्याचा एक वेगळाच आनंद मिळतो. याव्यतिरिक्त, काचेचा वाडगा खूप रुंद असल्यामुळे, ते वाइन पिणाऱ्यासाठी सोईस्कर ठरते.

● शेरी (Sherry)

 

wine glass im

 

पेयाचा आनंद घेत असताना त्याच्या गुणवत्तेचे रक्षण करण्यासाठी या ग्लासची दांडी खूप लांब ठेवली जाते, तसेच या ग्लासच्या वरचा भाग अगदी निमुळता असतो.

वाइनचा सुगंध येण्यासाठी हे ग्लास मदत करतात.

● फ्लूट (Flute)

इतर सर्व वाइन ग्लासेसपेक्षा हे ग्लास उंच आणि पातळ असतात, हे कार्बोनेशनचे म्हणजेच वाइन मधील गॅसेसचे बाहेर निघण्यापासून संरक्षण करते आणि तुमची वाइनची गुणवत्ता टिकून राहिल याची काळजी घेते.

लांब स्टेम हे सुनिश्चित करते, की आपल्या हाताची उष्णता आपल्या पेयाच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम करणार नाही.

● विंटेज (Vintage)

 

wine glass im1

 

व्हिंटेज वाइन ग्लास हे दिसायला तर खूप आकर्षक असतात, परंतु ते वाइन पिण्यासाठी योग्य नसल्याचे अनेकांचे मत आहे. या ग्लासमध्ये काही वाइन चांगल्या लागतात, तर काहींची चव अगदीच बिघडते.

असे असूनही, बरेच लोक हेच ग्लास निवडतात कारण ते दिसायला खूप आकर्षक आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?