' ‘गोव्यात ममता दीदींचे सरकार येऊ नये’, यासाठी भाजपने आखली ही रणनीती – InMarathi

‘गोव्यात ममता दीदींचे सरकार येऊ नये’, यासाठी भाजपने आखली ही रणनीती

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महाराष्ट्राच्या राजकारणातील इतिहासात कधीच न घडलेला एक प्रयोग तीन वर्षांपूर्वी झाला होता. भाजप आणि शिवसेना जे एकमेकांशी भावांसारखे वागायचे ते विभक्त झाले आणि महाविकास आघाडी नावाचं एक तीन पक्षांचं सरकार अस्तित्वात आलं. महाराष्ट्राच्या जनतेला देखील हा मोठा धक्का होता, अनेक वाद होऊन देखील हे सरकार तीन वर्ष सत्तेत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

खरं तर राजकारणी लोकं कायमच म्हणत असतात की राजकारणात कोणीच कोणाचा क्षत्रू नसतो कोणीच कोणाचा मित्र असतो. वेळेनुसार आणि परिस्थितिनुसार निर्णय घ्यायचे असतात. त्यामुळेच राजकारणात बदल होतच असतात.

 

mahavikas aghadi inmarathi

 

सध्या ५ राज्यांच्या निवडणूका पार पडल्या, एक्सिट पोलच्या माहितीनुसार तीन राज्यांमध्ये पुन्हा एकदा भाजप सरकार येणार अशी चर्चा आहे, त्यातीलच एक राज्य म्हणजे आपल्या शेजारचं गोवा…

गोव्यात अनेकवर्ष काँग्रेसची सत्ता होती मात्र मनोहर पर्रीकरांनी गोव्यात भाजपला सत्तेत आणून एक गोव्याच्या राजकरणात एक मोठा बदल केला, त्यांच्या मृत्यूनंतर गोवेकरच नव्हे तर संपूर्ण देश हळहळला होता. यातच त्यांच्या मुलाला तिकीट नाकारल्याने गोवेकर भाजपवर नाराज आहेत.

 

Manohar-Parrikar-inmarathi08
indianexpress.com

एक्सिट पोलच्या माहितीनुसार गोव्यात भाजपला १३ जागा मिळतील, बहुमतासाठी २१ वर जागा लागतात त्यामुळे भाजपला साहजिकच कोणाच्या तरी पाठिंब्याची गरज भासणार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की सरकार स्थापनेसाठी आम्ही MGP ( महाराष्ट्र गोमंतक पार्टी ) शी चर्चा करू.

मुख्यमंत्र्यांनी जरी हे माध्यमांशी बोलताना चर्चा करू असे जरी सांगितले तरी ज्या पक्षाशी ते चर्चा करणार आहे तो MGP फारसा भाजप सोबत आणि खास करून प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सरकारसोबत जाण्यास फारसा उत्सुक नाही.

 

pramod im

 

२०१७ मध्ये MGP ला मिळाला भाजपकडून धक्का :

राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष यांच्यात राष्ट्रीय पक्षाचे वर्चस्व कायमचं असते. २०१७ सालच्या निवडणुकांमध्ये भाजपला काँग्रेसपेक्षा कमी जागा मिळाल्या होत्या. तेव्हा भाजपने याच MGP ची मदत घेऊन सरकार बनवले होते आणि  मुख्यमंत्रीपदावर पुन्हा एकदा दि. मनोहर परिर्कर विराजमान झाले, मात्र त्यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाले.

प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्र्यांची सूत्र हाती घेतल्यानंतर MGP ला सरकारमधून काढून टाकले, असा आरोप MGP चे नेते ढवळीकर यांनी केला होता. त्यामुळे सरकारमधून काढून टाकल्याने त्यांच्या मनात प्रमोद सावंत यांच्याविषयी नाराजी आजही आहे त्यामुळे ते देखील माध्यमांशी बोलताना असे म्हणाले की आम्ही प्रमोद सावंत यांना पाठिंबा देणार नाही उलट आम्ही आमच्या मित्रपक्षाशी म्हणजे तृणमूलशी चर्चा करून निर्णय घेऊ.

 

tmc 1 im

 

प्रमोद सावंत यांनी आधीच MGP ला सरकारमधून काढल्याचे स्पष्टीकरण दिले होते त्यांचं असं म्हणणं होते की २०१९ सालच्या पोटनिवडणुकींमध्ये MGP ने आमच्या विरोधात उमेदवार उभे केले होते. मात्र प्रमोद सावंत सरकार स्थापन करण्यासाठी पुन्हा एकदा MGP शी चर्चा करण्यास तयार आहेत.

गोवा निवडणुकांचे निकाल उद्या म्हणजे १० मार्च रोजी लागणार आहेत, त्यामुळे गोवेकरच नव्हे तर संपूर्ण देशाचे या निवडणुकांच्या निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे. निकालानंतरच सत्ता स्थापनेसाठीची रस्सीखेच आपल्याला पहायला मिळेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?